Dev Puja Astro Tips  esakal
संस्कृती

Dev Puja Astro Tips : घरात देवपूजा करताना या 11 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा; कधीही वादविवाद होणार नाहीत

सकाळ डिजिटल टीम

Dev Puja : हिंदू संस्कृतीत देवतांची नित्य पुजा- उपासना केली जाते. देवतांची दररोज पुजा- उपासना केल्याने घरात सुख- शांती प्राप्त होते, घरातील वातावरणात चैतन्य निर्माण होते. असे मानले जाते की दररोज नित्य उपासना केल्याने घरातील दारिद्र्य, रोग- पिडांचे हरण होते. घरात होणारे क्लेश, वादविवाद टळतात. यामुळे घरोघरी देवतांचे यथाशक्ती भक्तीभावाने पूजन केले जाते. मात्र देवपूजा करत असताना काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे देवतांची सदैव कृपादृष्टी आपल्यावर राहील. चला तर जाणून घेऊया देवा पुजा करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या.

देवपूजा करीत असताना या 11 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा

1) घरातील देवघराला कळस असू नये.

2) घरात देवपूजा करतांना देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झालेली असणे आवश्यक आहे. भग्न मूर्तिची पूजा कधीही करू नये.

3) देवपूजेच्या वेळेस इतरांशी बोलू नये. देवपूजा करण्यापूर्वी स्वतःच्या कपाळी गंध किंवा कुंकवाचा टिळा अवश्य लावावा. शरीर शुद्धीसाठी भस्मलेपन करावे.

4) देवांचे आसन, आपल्या आसनापेक्षा जास्त उंचीचे असावे.

5) शंख, घंटेशिवाय देवपूजा करू नये. देवघरातील शंखाला अक्षता वाहू नये.

6) देवपूजेसाठी शिळे जल (पाणी) व शिळी फुले व्यर्ज होत, मात्र तुलसीपत्रे व तीर्थोदक, शिळी असली तरी चालतात. याची विशेष काळजी घ्यावी.

7) तर्जनीने (अंगठ्याजवळच्या बोटाने) देवाला गंध वाहू नये. यासह एका दिव्यावरुन दुसरा दिवा प्रज्वलित करु नये.

8) देवघरात देवांच्या तसबीरी (फोटो) लावताना, त्या एकमेकांसमोर लावू नये.

9) देवांची आरती करतांना, निरांजन देवाच्या मस्तकावरून नेऊ नये. देवांचा उजव्या बाजूस तुपाचा व डाव्या बाजूस तेलाचा दिवा लावावा.

10) देवाला अर्पण करावयाच्या नैवेद्यावर तुळशीपत्र ठेवून, नंतर अर्पण करावा. नैवेद्य दाखवताना देवापुढे पाण्याने चौकोन काढून त्यावर तो नैवेद्य ठेवून मगच दाखवावा. देवाला नैवेद्य दाखविल्यानंतर तो लगेच खाऊ नये.

11) देवाला प्रदक्षिणा, नेहमी विषम संख्येत घालावी. जागा नसल्यास स्वतःभोवती उजवीकडून डावीकडे, असे गोल फिरावे.

''वरील 11 गोष्टींचे घरी देवतांची पूजा करताना पालन केल्यास घरात देवतांची सदैव कृपा दृष्टी लाभेल. व आपल्याला जी काही दुःख, संकटे, ताण- तणाव असतील त्याचेही हरण होईल.'' - विजय राजेंद्र जोशी (ज्योतिष अभ्यासक, नाशिक)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT