Sawai Mahotsav esakal
संस्कृती

Sawai Mahotsav : यंदाचा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव १४ ते १८ डिसेंबर दरम्यान

६८ वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Sawai Gandharva Bhimsen Mahotsav : संगीतप्रेमींचे आराध्य दैवत असणाऱ्या भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी आपल्या गुरूंना वंदन करण्यासाठी सुरू केलेला सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव कोरोनामुळे गेली दोन वर्ष रद्द झाला होता.

मात्र यंदा परिस्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात आल्याने ६८ वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित करण्यात येणारा हा महोत्सव दिनांक १४ ते १८ डिसेंबर दरम्यान होणार आहे.

महोत्सव मुकुंदनगर येथील कटारिया शाळेच्या प्रांगणात संपन्न होणार असल्याची माहिती मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी कळवली आहे. यंदाचा महोत्सवात भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांची जन्मशताब्दी साजरी करण्यात येईल. याआधीचा महोत्सव डिसेंबर २०१९ मध्ये आयोजित करण्यात आला होता.

पं. भीमसेन जोशी यांनी १९५३ पासून त्यांचे गुरु सवाई गंधर्व यांच्या स्मरणार्थ ‘सवाई गंधर्व’ महोत्सवाचे आयोजन करण्यास सुरवात केली. पंडितजींच्या निधनानंतर या महोत्सवाचे नामकरण ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ असे करण्यात आले. सांस्कृतिक विश्वातील हा एक अग्रणी महोत्सव मानला जातो. आजवर अनेक दिग्गज कलाकारांनी या महोत्सवात सादरीकरण केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

Gadchiroli Threat: एटापल्लीतील जेएसडब्ल्यू अधिकाऱ्यांना ठार मारण्याची धमकी; ‘लाल सलाम’ पत्रकामुळे गडचिरोलीत खळबळ

SCROLL FOR NEXT