Magical Mantra esakal
संस्कृती

Magical Mantra : सूर्य देवाचे हे 7 चमत्कारी मंत्र रोज म्हणा, रोगराईतून मिळेल मुक्ती अन् उघडतील नशीबाची दारं

आयुष्यात सुखसमृद्धी आणि समाधानी जीवन जगायचे असेल प्रसिद्ध ज्योतिषींना सांगितेलेल्या सूर्यदेवाच्या या ७ मंत्रांचा जप करा.

सकाळ ऑनलाईन टीम

Magical Mantra : हिंदू धर्मात सूर्यदेवाला विशेष स्थान आहे. रविवार हा सूर्यनारायणाच्या उपासनेसाठी समर्पित आहे. या दिवशी सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करताना काही मंत्रांचा जप करणे शारीरिक आणि मानसिक दृष्टिकोणातून खूप फायदेशीर मानले जाते. या मंत्रांचा नियमित जप केल्याने तुम्ही केवळ निरोगी राहत नाही तर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकता. तुम्हालाही आयुष्यात सुखसमृद्धी आणि समाधानी जीवन जगायचे असेल प्रसिद्ध ज्योतिषींना सांगितेलेल्या सूर्यदेवाच्या या ७ मंत्रांचा जप करा.

1. ॐ हृां मित्राय नम: - तुम्हाला चांगले आरोग्य मिळवायचे असेल आणि तुमची कार्य करण्याची क्षमता वाढवायची असेल तर सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करताना त्यांचा या पहिल्या मंत्राचा नियमितपणे जप केला पाहिजे.

2. ॐ हृीं रवये नम: - पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांच्यामते, जर तुम्हाला क्षयरोगाचा त्रास होत असेल किंवा तुमच्या शरीरातील रक्ताभिसरण सुधारायचे असेल तर सूर्य देवासमोर उभे राहून या मंत्राचा जप करा.

3. ॐ हूं सूर्याय नम: - धार्मिक मान्यतेनुसार मानसिक शांतीसाठी सूर्यदेवाच्या या मंत्राचा जप करावा. यामुळे बुद्धिमत्ताही वाढते.

4. ॐ हृ: पूषणे नम: - ज्योतिषशास्त्रीय मान्यतेनुसार, जर तुम्हाला तुमची शक्ती आणि धैर्य वाढवायचे असेल तर या मंत्राचा जप करा. यामुळे माणसाचे मनही धार्मिक कार्यात गुंतलेले असते. (astrology)

5. ॐ ह्रां हिरण्यगर्भाय नमः - ज्योतिषशास्त्रानुसार या मंत्राचा विशेषत: विद्यार्थ्यांना लाभ होतो. त्यांच्या जपाने शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक शक्तींचा विकास होतो.

6. ॐ सवित्रे नमः - वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार या मंत्राचा जप केल्याने मान-सन्मान वाढतो. यासोबतच सूर्यदेवाची विशेष कृपा राहते. याशिवाय माणसाची कल्पनाशक्तीही वाढते.

7. ॐ अर्काय नमः - धार्मिक मान्यतांनुसार, जर तुम्हाला वेदांचे रहस्य जाणून घ्यायचे असेल तर या मंत्राचा जप करणे फायदेशीर ठरू शकते. याशिवाय या मंत्राचा जप केल्याने मन मजबूत होते. आयुष्यातील सर्व समस्या दूर होतात.

भोपाळचे रहिवासी ज्योतिषाचार्य पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांनी समृद्ध आयुष्यासाठी या मंत्रांचा जप करण्याचा सल्ला दिलाय.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News: शहरातील ३५ पाण्याच्या टाक्यांची होणार दुरुस्ती; चार झोनमध्ये पाणीपुरवठा व्यवस्थापनाचे नियोजन

Nanded Crime: माहूर तालुक्यातील बंद खडी केंद्रावरील गिट्टी साठा बेकायदेशीर; एक कोटी ९९ लाखाचा दंड, तहसीलदारांची कारवाई!

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रांजणगावमध्ये तरुणावर लाकडी बॅटने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

'म्हातारपणात स्वतःची माती कशाला...' प्रसिद्ध अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्रीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...'हे करण्यापेक्षा चारधाम यात्रा...'

Viral status Thackeray group : ‘उद्धवरावांची उद्‌ध्वस्त सेना’ ठाकरेंच्या प्रमुख नेत्याच्या स्टेटसने चर्चा, ५ मिनीटात डिलीटही केलं

SCROLL FOR NEXT