Aashadh Deep Amavasya 2022 Esakal
संस्कृती

Aashadh Deep Amavasya 2022 : दीप अमावस्या म्हणजेच हरीयाली अमावस्येचे नेमकं महत्त्व काय आहे ?

लहान मुले ही आपल्या वंशाचा दिवा असल्याचं मानलं जातं म्हणून त्यांना ओवाळण्याची प्रथा आहे.

सकाळ डिजिटल टीम

आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अमावस्येला आषाढी अमावस्या, दीप अमावस्या किंवा हरीयाली अमावस्या असं म्हणतात. श्रावण हा पवित्र महिना सुरु होण्याच्या आदल्या दिवशी ही अमवस्या येत असल्याने घरातील दिव्यांची मनोभाव पूजा केली जाते.श्रावण महिन्यात वेगवेगळ्या सणांना वापरल्या जाणाऱ्या दिव्यांची हा महिना सुरु होण्याआधीच विधीवत पूजा करण्याचा हा सण आहे. ही पूजा केल्याने घरात मांगल्य टिकून राहते असे सांगितले जाते.

दीप अमावस्या या दिवसाचे नेमके महत्व काय ?

दीप अमवास्येच्या दिवशी भगवान शंकर, पार्वती, आणि कार्तिकेय यांची पूजा केली जाते. या दिवशी काही भागात माय माऊल्या भगवान शंकराचे व्रतही ठेवतात. तर विदर्भात या दिवशी महिला तुळशी किंवा पिंपळाच्या झाडाला 108 प्रदक्षिणाही घालतात. या दिवशी पितरांना तर्पण देत पुरणाचा नैवैद्य दाखवल्यास पितर प्रसन्न होतात असं मानलं जातं. गरुड पुराणानुसार जे आषाढ अमावस्या व्रत करतात, पूजा करतात आणि दान करतात त्यांना सर्व प्रकारच्या दोष व पापांपासून मुक्त केले जाते. या दिवशी आपल्या पूर्वजांच्या नावाने दान करणे शुभ मानले जाते. या दिवशी उपवास ठेवल्याने मृत पूर्वजांच्या आत्म्यास शांती मिळते असे मानले जाते.

दीप अमावस्येला झाडं का लावली जातात ?

या दिवशी झाडं लावून ग्रह दोष शांत होतो असंही सांगितलं जातं. म्हणून या दिवशी पिंपळ, केळी, लिंबू किंवा तुळशीचं रोपटं दारात किंवा शेतात लावलं जातं. या दिवशी गंगास्थान करायला आणि दान देण्यालाही फार महत्व असतं. काही भागात या दिवशी माशांना पीठाच्या गोळ्या खायला दिल्या जातात.

दीप अमावस्या कशी साजरी करावी ?

या दिवशी सकाळीच घरातील, दिवे, समई निरांजने, लामण दिवे घासून पुसून स्वच्छ केले जातात. दिवे चकचकीत करुन पाटावर मांडून त्यांची पूजा केली जाते. पाटाभोवती रांगोळी आणि फुलांची सजावट करुन सर्व दिव्यांमध्ये तेल वात लावून प्रज्वलित करुन ही दीप पूजा केली जाते. काही ठिकाणी ओल्या मातीचे दिवे करुन त्यांचीही पूजा केली जाते. हळद, कुंकू, फुले, अक्षता वाहून दिव्यांची पूजा करण्यात येते. अनेकजण कणकेचे उकडलेले गोड दिवे बनवून त्यांचा नैवेद्यही दाखवतात. सायंकाळी सर्व दिव्यांची मनोभावे आरती केली जाते.

दीप अमावस्येच्या दिवशी लहान मुलांना का ओवाळतात ?

दीप अमावास्येच्या दिवशी अनेक भागात संध्याकाळी शुभंकरोती ही प्रार्थना म्हणून लहान मुलांना ओवाळलं जातं. लहान मुले ही आपल्या वंशाचा दिवा असल्याचं मानलं जातं म्हणून त्यांना ओवाळण्याची प्रथा आहे. हिंदू संस्कृतीमध्ये दिव्याला फार महत्वाचं स्थान असून घरातील इडापिडा टळावी, अज्ञानाचा अंधकार दूर व्हावा आणि दिवा प्रकाश देतो तसा ज्ञानाचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यात पडावा या प्रार्थनेसहीत दिव्यांची मनोभावे पूजा केली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : मुंबईतील १४ फुटांवरील झोपड्यांवरील कारवाईला राष्ट्रवादीचा विरोध

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT