Jodvi  Esakal
संस्कृती

Adhik Maas 2022: अधिक मासात महिला जोडवी का बदलतात?

जोडवी चांदीचीच का घातली जातात तर चांदी हा धातू उर्जा वाहक आहे.

सकाळ डिजिटल टीम

हिंदू सण आणि महिन्यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे, नात्यातील ऋणानुबंध आपसूक दृढ होतात. हिंदू संस्कृती प्रत्येक नात्याला मानाने वागवण्यास शिकवते. मग ते नाते पतीपत्नीचे असो वा सासर- माहेर दोन्हीकडचे असो, नात्यांमधील प्रेम अबाधित ठेवण्याचे काम हे महीने आणि उत्सव करत असतात , अधिक मास म्हणजेच धोंड्याचा महिना हा देखील असाच एक नात्याचा धागा जपणारा महिना आहे. तो धागा म्हणजे सासू सासरे आणि जावयाचे नाते. आपल्या मुलीचा नवरा प्रत्येक आईवडिलांना 'नारायणा' समान भासतो. अधिक मास हा श्री विष्णुच्या उपासनेचा असल्यामुळे, नारायणरूपी जावयाला मुलीचे आईवडील घरी बोलावून त्याला मानाने वाण देतात. त्यामुळेच या महिन्यात जावयाला अधिक महत्व देण्याची पद्धत आहे.

यंदा अधिकमास आल्याने आषाढानंतर अधिक मास आणि मग श्रावण महिना सुरू होणार आहे. हा अधिकमास फार पवित्र समजला जातो. अधिकमास हा पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जातो. पुरुषोत्तम म्हणजे नारायण. विवाह प्रथेनुसार जावयाला नारायण असे संबोधले जाते. त्यानुसार विवाह संस्कार होतात. त्यामुळे मुलीच्या आई वडिलांसाठी जावई हा नारायण असतो.

आता बघू या अधिक मासात महिला जोडवी का बदलतात?

जोडवी चांदीचीच का घातली जातात तर चांदी हा धातू उर्जा वाहक आहे. चांदी जमिनीला टेकल्यामुळे जमिनीतील ऊर्जा शरीरात प्रवेश करते त्यामुळे दोन्ही पायातील जोडवी शरीरात उर्जेचा समतोल राखण्यास मदत करतात.नववधूच्या अंगावर पहिला दागिना चढतो तो म्हणजे पायातली जोडवी. जोडवी हा एक सौभाग्य अलंकार आहे. आजकालच्या फॅशनच्या युगात तर तो खूपच लोकप्रिय झालाय.जोडवी अंगठ्या शेजारील बोटात घातली जातात याला शास्त्रीय कारण आहे. 

अंगठ्या शेजारील बोटांमधली नस आणि स्त्रीचे गर्भाशय यांचा थेट संबंध असतो म्हणून अंगठ्या शेजारील बोटात जोडवी घातली जातात. या बोटात जोडवी घातल्यामुळे रक्तदाब संतुलित राहतो आणि महिलांचे गर्भाशय नियंत्रित राहते. जोडवी हि ॲक्युपंक्चर चे काम करतात.अधिक महिन्यात सुहासिनी महिला आपली जोडवी बदलतात कारण लग्न झालं की स्त्रीच्या सौंदर्यात भर पडते ती सौभाग्य अलंकाराची मंगळसूत्र, चुडा, कपाळावरती कुंकू आणि पायातली जोडवी या मुळेच म्हणून जोडवी बदलतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway News: प्रदूषणाला रेल्वेचं जोरदार उत्तर! आता पैसा अन् वेळही वाचणार; भारतीय रेल्वेची नवी वाहतूक क्रांती सुरू, योजना काय?

Pune Court Decision: पतीला जीव देण्यास प्रवृत्त केलं, पत्नीला सात वर्षांची सक्तमजुरी! दुसरा विवाह अन्...

Latest Marathi Breaking News Live Update: शिवसेनेच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार - फडणवीस भेट

Akola News : सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे खाजगीकरण करण्याचा डाव; आ. साजिद खान यांचा स्फोटक आरोप

Leopard Attack : दोन बिबट्यांचा मेंढ्यांच्या कळपावर हल्ला; जीव धोक्यात घालून मेंढपाळ महिलेने केला प्रतिकार

SCROLL FOR NEXT