Adhik Maas Samapti  esakal
संस्कृती

Adhik Maas Samapti : पुरुषोत्तमी अमावस्येसह अधिकमासाची समाप्ती; करा हे उपाय मिळेल पितृदोषातून मुक्ती

अधिकमासात आलेल्या या अमावस्येला पुरुषोत्तमी अमावस्या म्हणतात.

धनश्री भावसार-बगाडे

Purushottami Amavasya Pooja Vidhi In Marathi :

दि. १६ ऑगस्टला पुरुषोत्तमी अमावस्या आहे. हिंदू धर्मात अमावस्या तिथीला विशेष महत्व आहे आणि अधिकमासातील अमावस्येला पुरुषोत्तम अमावस्या म्हणतात. या दिवशी पितरांना तर्पण आणि दानधर्म केल्यास विशेष फळ मिळते.

या दिवशी भगवान शंकराची विधिवत पूजा केल्याने ग्रह-नक्षत्रांचे अशुभ प्रभाव दूर होऊन पितृदोष समाप्त होतो. काही गोष्टी शिवलींगावर अर्पण कराव्या ज्यामुळे संकटे दूर होतात.

ज्योतिषशास्त्रात पितृदोष घालवण्यासाठी या खास दिवशी काही विशेष उपाय सांगण्यात आले आहेत. जाणून घ्या उपाय

पाप दोष निवारणासाठी

पुरुषोत्तमी अमावस्येला शिवलिंगावर मध आणि पांढरे तीळ अर्पण करणे खूप शुभ मानले जाते. यामुळे समाजात मान, सन्मान वाढतो. यासोबत पितृदोष दूर होतो आणि बीपी, मधुमेहाचे आजार दूर राहतात. यामुळे सर्व पाप नष्ट होतात व सुदृढ आरोग्य प्राप्त होते असे मानले जाते.

पितृदोष निवारणासाठी उपाय

पुरुषोत्तमी अमावस्येच्या दिवशी शिवलिंगावर चांदीचा नाग आणि पाणी व बेलपत्र अर्पण करावे. असं केल्याने सर्प दोषासह पितृदोष संपतो. पितरांचा आशीर्वादही प्राप्त होतो. असे मानले जाते की चांदीचा नाग अर्पण केल्याने सुख, समृद्धी आणि संपत्तीचा मार्ग सापडतो.

अडचणी दूर करण्यासाठी

रुईचे पान भगवान शंकराला प्रिय आहे, म्हणून पुरुषोत्तमी अमावस्येच्या दिवशी शिवलिंगावर रुईचे पान अर्पण करावे. यामुळे मानसिक आणि शारीरिक समस्या दूर राहतात आणि ग्रहांचा शुभ प्रभावही मिळतो. तसेच भगवान शंकराच्या कृपेने जीवनातील सर्व संकटे दूर होतात.

आर्थिक संकटं दूर करण्यासाठी

यादिवशी शिवलिंगावर ऊसाचा रस अर्पण करणे लाभदायक ठरते. असे केल्याने पितरांचे दोष दूर होतात आणि संसारिक सुखाची प्राप्ती होते. शिवलिंगावर ऊसाचा रस अर्पण करताना ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा. यामुळे आर्थिक संकटे दूर होतात. सुख समृद्धी नांदते असे मानले जाते.

ग्रहदोष दूर करण्यासाठी

शक्य असल्यास १०८ बेलपत्रावर गोपी चंदनाने राम लिहून ओम नमः शिवाय मंत्राचा उच्चार करत शिवलिंगावर अर्पण करा. जर १०८ बेलपत्र शक्य नसेल तर ११ बेलपत्रदेखील अर्पण करू शकतात. यामुळे ग्रहदोष, पितृदोषही दूर होतात. हा उपाय पंचमी, त्रयोदशी आणि चतुर्थी तिथीलाही केला जाऊ शकतो.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राला मिळणार १२ नवे IPS अधिकारी; पाच महिला अधिकाऱ्यांचा समावेश, ३१ ऑगस्टपासून सांभाळणार जबाबदारी, वाचा यादी

नेपाळमध्ये निसर्गाचा कहर! भोटेकोशी नदीला महापूर, गाड्या-इमारती क्षणार्धात वाहून गेल्या, धक्कादायक VIDEO समोर...

"मी फक्त 50 रुपयांत केस कापतो"; कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचं विधान; संपत्तीबाबत भाजपचा खुलासा

Electric Short Circuit: राजुरीत शॉर्टसर्किटमुळे दिड एकर ऊस जळून खाक; शेतकरी हाडवळे यांचे लाखो रुपयांचे नुकसान, महावितरणकडून भरपाईची मागणी

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

SCROLL FOR NEXT