Akshaya Tritiya 2025 sakal
संस्कृती

Akshaya Tritiya Shopping: अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने बाजारात गर्दी; नवीन वस्तू आणि सोने खरेदीला प्राधान्य

Akshaya Tritiya 2025: अक्षय तृतीयेच्या निमित्ताने बाजारात गर्दी झाली असून, लोक नवीन वस्तू आणि सोने खरेदीसाठी प्राधान्य देत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Akshaya Tritiya Brings Excitement to Markets with Increased Gold and New Item Purchases: अक्षय तृतीया! सनातन परंपरेचा मंगल दिन, श्रद्धा आणि शुभतेने भरलेला सोहळा. येत्या बुधवारी (ता.३०) हा पवित्र सण मोठ्या भक्तिभावाने साजरा होणार आहे. बाजारपेठा साहित्याने सजलेल्या आहेत. मातीची मडकी, पळसाच्या पत्रावळ्या, वाळा, कळस, कच्ची कैरी आणि पूजेचं विविध साहित्य घेण्यासाठी नागरिकांची उत्साही गर्दी पाहायला मिळते आहे.

अक्षय तृतीया म्हणजे शुभ आरंभाचा दिवस. या दिवशी केलेले कोणतेही कार्य ''अक्षय'' फल देते, अशी श्रद्धा आहे. म्हणूनच विवाह, गृहप्रवेश, सोने खरेदी यासाठी या दिवशी विशेष महत्त्व असते. भगवान श्रीविष्णू आणि देवी लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते. सहस्रनाम वाचन, दानधर्म, आणि पितर पूजनाने घराघरात आध्यात्मिक वातावरण भरून राहाते.

पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी नवीन मातीच्या मडक्यांत पाणी भरून त्यात वाळा टाकला जातो. या वाळ्याच्या सुवासिक झुळुकीत कृतज्ञतेची भावना दरवळते. पळसाच्या पत्रावळींवर डाळभात, मुगवडीची भाजी, कुरडया, पापड, भजी, आमरस असा पारंपरिक बेत सजतो. आमरसात चारोळी, खोबरं, गहुला-कचूळा यांचे रसभरित मिश्रण मिसळून गोडसर चव निर्माण केली जाते.

कावळ्यांसाठी घरावर नैवेद्य ठेवण्याची सुंदर परंपराही या दिवशी जिवंत ठेवली जाते, जरी आज कावळ्यांची संख्या कमी झाली असली तरी. अक्षय तृतीया हा केवळ सण नाही, तर आपल्या संस्कृतीतील श्रद्धा, कृतज्ञता आणि सकारात्मकतेचा उत्सव आहे.

सणाची वैशिष्ट्ये

'अक्षय’ म्हणजे न संपणारी, आणि ‘तृतीया’ म्हणजे अमावस्येनंतरचा तिसरा दिवस. या दिवशी केलेले पुण्य किंवा शुभ कार्य अखंडित (सतत वाढणारं) होते, अशी श्रद्धा आहे. नवीन मातीचं मडके आणून त्यात वाळा टाकून पाणी भरले जाते. पळसाच्या पत्रावळीवर पारंपरिक जेवण बनवले जाते आणि पितरांसाठी नैवेद्य दिला जातो.

पितरांचे आशीर्वाद मिळाल्यास घरात सुख-शांती नांदते, अशी श्रद्धा आहे. या दिवसी सोने खरेदी आणि व्यवसायाची सुरुवात केली जाते. नवीन व्यवसाय सुरू करणे शुभ मानले जाते. काही भागांमध्ये या दिवसानंतर पेरणीसाठी शेतकरी जमिनीत पहिली नांगरटी करतात. निसर्गाशी जोडलेली समृद्धी आणि पावसाच्या शुभेच्छा दिल्या जातात. थोडक्यात, अक्षय तृतीया म्हणजे शुभतेचा, परंपरेचा, श्रद्धेचा, आणि कृतज्ञतेचा अमोल संगम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: एका षटकाने इंग्लंडचा आत्मविश्वास वाढला! आपलाच गोलंदाज भारताचा वैरी ठरला; स्मिथपाठोपाठ हॅरी ब्रूकचे शतक

'राणादा' वारकऱ्यांसोबत दंग, स्वत: हाताने केलं अन्नदान, हार्दिक जोशीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Latest Maharashtra News Updates : : खरीप हंगामात डीएपी या रासायनिक खताची टंचाई; पावसामुळे मशागतीची कामे ठप्प

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

SCROLL FOR NEXT