Anant- Radhika Wedding Muhurta sakal
संस्कृती

Anant- Radhika Wedding Muhurta : अनंत-राधिकाच्या लग्नासाठी अंबानींनी 12 जुलै तारीखच का निवडली? काय आहे या दिवसाचे महत्व

अत्यंत धार्मिक असलेल्या अंबानी परिवाराने या विवाह सोहळ्यासाठी 12 जुलै रोजी तारीख का निवडली, काय आहे या तारखेचे महत्व… जाणून घेऊया.

सकाळ डिजिटल टीम

जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबापैकी एक असलेल्या अब्जाधीश मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याचा विवाह राधिका मर्चंटशी येत्या 12 जुलै रोजी होत आहे. या लग्न सोहळ्याची तयारी अनेक महिन्यांपासून सुरु आहे.

अंबानी यांच्या अँटिलिया ह्या घरी लगीनघाई सुरू आहे. नुकतंच हळदीचा कार्यक्रम पार पडला. हा विवाह समारंभ मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये होणार आहे. अत्यंत धार्मिक असलेल्या अंबानी परिवाराने या विवाह सोहळ्यासाठी 12 जुलै रोजी तारीख का निवडली, काय आहे या तारखेचे महत्व? चला तर मग जाणून घेऊया.

12 जुलैला काय आहे खास?

अंबानी परिवाराने अनंत अंबानी याच्या विवाहासाठी 12 जुलैचा मुहूर्त पाहिला आहे. हा खूप खास दिवस आहे. या दिवशी दुपारी 12 वाजून 32 मिनिटांनी हिन्दू वर्ष विक्रम संवत 2081 ची सप्तमी तिथी सुरु होते. ही तिथी परिणय बंधन म्हणेजच लग्नासाठी सर्वोत्तम मानली जाते. 12 जुलैच्या सप्तमी तिथीला, अनंत अंबानी-राधिका मर्चंटचा शुभ विवाह ‘परिघ’ योग आणि ‘गर’ करणमध्ये होणार आहे. हा वैदिक ज्योतिषशास्त्रात शुभ कार्यासाठी सर्वोत्तम मानला जातो. तसेच या तिथीला रवि योग आहे, जो शुभ कार्यासाठी चांगला आहे.

अनंत आणि राधिकाच्या लग्नाची तिथी म्हणजेच सप्तमी ही भद्रा आणि पंचक यांच्या प्रभावापासून मुक्त आहे. तसेच राहू काळ दिवसाच्या दुपारीच समाप्त होईल, त्यानंतर दुसऱ्या दिवशीपर्यंत हा दिवस पूर्णपणे निर्दोष काळ आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हा विवाह हस्त नक्षत्रात होईल, जे लग्नासाठी योग्य नक्षत्र आहे. या तारखेचा दिवस शुक्रवार आहे, ज्याचा स्वामी शुक्र ग्रह आहे, जो सौभाग्य, समृद्धी आणि वैवाहिक सुखाचा स्वामी आहे.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा शुभ विवाह मुहूर्त शुक्रवार, १२ जुलै २०२४ रोजी आहे. तर शुभाशीर्वाद मुहूर्त शनिवार, १३ जुलै २०२४ रोजी आहे. तर रिसेप्शन रविवार, १४ जुलै २०२४ रोजी आहे. 

Rain Warning Alert : पावसाचे सावट कायम! हवामान विभागाचा पुन्हा अलर्ट, महाराष्ट्रात इशारा जारी

Factory Work Rule: आता महिलाही कारखान्यांमधील धोकादायक कामे करू शकणार, 'या' २० कामांना मंजूरी, राज्य सरकारचा मोठा निर्णय

Annu Kapoor Final Wish : अन्नू कपूर यांनी सांगितली अंतिम इच्छा, म्हणाले ‘’त्या दिवशी दिवाळी, ईद...’’

Winter Beauty Tips: हिवाळ्यात त्वचेचा ग्लो कायम ठेवायचाय? मग या गोष्टी ठेव लक्षात

Latest Marathi News Live Update : महेश कोठारेंवर ठाकरे गटाची टीका

SCROLL FOR NEXT