Apara Ekadashi 2024 Sakal
संस्कृती

Apara Ekadashi 2024: अपरा एकादशीला चुकूनही करू नका 'या' गोष्टी, भगवान विष्णू होतील नाराज

Apara Ekadashi 2024: आज अपरा एकादशी आहे. या दिवशी मनोभावे भगवान विष्णूची पुजा केल्यास त्यांचा आशिर्वाद कायम तुमच्यावर राहतो.

Puja Bonkile

Apara Ekadashi 2024: अपरा एकादशी 2 जून रोजी साजरी केली जात आहे. हिंदू धर्मात एकादशीला खूप महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णूची मनोभावे पुजा केल्यास सर्व इच्छा पुर्ण होतात. तसेच कोणत्याही समस्यांना सामोरे जावे लागत नाही. सर्व एकादशींपैकी अपरा एकादशी अत्यंत फलदायी मानली जाते. या दिवशी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे हे जाणून घेऊया.

पुढील चुका करू नका

एकादशीच्या दिवशी उशिरापर्यंत झोपू नका. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून पुजा करावी.

एकादशीला खाण्यापिण्याची अत्यंत काळजी घेतली जाते. मासंहार किंवा मद्यपान करणे टाळावे.

आज घर झाडताना मुंग्या किंवा लहान जीवांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी.

लसूण, कांदा, मसूर, गाजर, सलगम, कोबी, पालक या गोष्टी आज खाऊ नयेत. एकादशी आणि द्वादशीला वांगी खाणे देखील अशुभ आहे.

या दिवशी भाताचे सेवन करू नका. पौराणिक कथेनुसार महर्षी मेधा यांच्या शरीरातून बार्लीची उत्पत्ती झाली. त्यामुळे एकादशीला जवाचे सेवन निषिद्ध मानले जाते. त्याच वेळी, या दिवशी सोयाबीनचे सेवन करणे देखील हानिकारक मानले जाते.

एकादशीला दिवसा झोपू नका. या दिवशी मन शांत ठेवावे आणि कोणाशीही वाद घालणे टाळावे.

एकादशीच्या दिवशी झाडांची पाने, फुले तोडू नका.

एकादशीच्या दिवशी केस आणि नखे कापू नयेत.

ब्राह्मणाला भोजन व दक्षिणा दिल्याशिवाय एकादशीचे व्रत कधीही मोडू नये. असे केल्याने एकादशीचे व्रताचे फळ मिळत नाही.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"सचिन तेंडुलकरने सर्वांचे आयुष्य उद्ध्वस्थ केले, टेंशन दिले"; Kapil Dev असे का म्हणाले? विराट कोहलीबद्दलही विधान...

Share Market: शेअर मार्केट Crash मध्येही हे 10 शेअर्स ठरले धुरंधर! आठवड्यात 40% रिटर्न; तुमच्याकडे आहेत का?

'ठरलं तर मग'च्या सुमन काकूंना खऱ्या आयुष्यात आहे 'हा' गंभीर आजार; म्हणाल्या- दिग्दर्शकाने हाक मारली तरी...

Latest Marathi News Live Update : इस्रायलमध्ये संशयित इराणी 'क्लस्टर बॉम्ब' हल्ल्यात बालवाडीचे नुकसान

Mumbai News: मुंबईतील ट्रायडंट हॉटेल अडचणीत! बेकायदेशीर बांधकाम पाडण्याचा आदेश; बीएमसीचा अल्टिमेटम, प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT