Ashadhi Amavasya 2024 esakal
संस्कृती

Ashadhi Amavasya 2024 : आषाढी अमावस्येला दीपपूजनाचे काय आहे महत्व? जाणून घ्या दिव्यांची पूजा करण्याची पद्धत

Ashadhi Amavasya 2024 : अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा दिवा हा मांगल्याचे प्रतिक आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Ashadhi Amavasya 2024 : आषाढी एकादशीपासून भगवान विष्णू निद्रासनात जातात. त्या दिवसापासूनच चातुर्मास सुरू होतो. हा चातुर्मास ४ महिन्यांचा असतो. हा चातुर्मास सुरू झाल्यानंतरची पहिली अमावस्या म्हणून आषाढ अमावस्या साजरी केली जाते. श्रावण महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या साजरी केली जाते.

या अमावस्येला आषाढ अमावस्या, दीप अमावस्या म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रात या अमावस्येला गटारी अमावस्या म्हणून ही ओळखले जाते. यंदा ही दीप अमावस्या महाराष्ट्रात ४ ऑगस्टला साजरी केली जाणार आहे. यंदा श्रावण महिना ५ ऑगस्टला सुरू होणार आहे. त्यामुळे, आदल्या दिवशी ४ ऑगस्टला ही दीप अमावस्या मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे.

या दीप अमावस्येला दिव्यांची खास आरास केली जाते आणि त्यांची पूजा केली जाते. या दिवशी दिव्यांची पूजा करण्याचे खास महत्व आहे. अमावस्येला दिव्यांची पूजा करून श्रावण महिन्याचे उत्साहात स्वागत केले जाते. दीप अमावस्येला दिव्यांची पूजा करण्याची योग्य पद्धत कोणती? चला तर मग जाणून घेऊयात.

दीपपूजनाचे काय आहे महत्व?

हिंदू धर्मामध्ये दिव्याला मांगल्याचे आणि शुभ कार्याचे प्रतिक मानले जाते. कोणत्याही कार्याचा शुभारंभ करताना दिवा लावून देवाची मनोभावे प्रार्थना केली जाते. अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा दिवा हा मांगल्याचे प्रतिक आहे. त्यामुळे, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दिव्याचे विशेष महत्व आहे.

दीपपूजन

दिव्याचे हे मांगल्य, समृद्धी आपल्या आयुष्यात नेहमी नांदावी यासाठी आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीप पूजन करून दीप अमावस्या साजरी केली जाते. या दिवशी दिव्यांची पूजा केल्याने, देवाची आपल्यावर कृपा राहते आणि आयुष्यातील अंधकार दूर होऊन, आयुष्य प्रकाशाने उजळते अशी देखील धार्मिक मान्यता आहे. तसेच, या दिवशी दिव्यांची पूजा केल्याने, घरामध्ये सुख-शांती राहते, असे मानले जाते.

दिव्यांची पूजा करण्याची योग्य पद्धत :

  • दीप अमावस्येला पहाटे लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावे.

  • त्यानंतर, घरातील सर्व दिवे काढून एका मोठ्या भांड्यात एकत्र करावे.

  • आता एका मोठ्या भांड्यात गरम पाणी उकळून ते त्या दिव्यांवर टाकावे.

  • या गरम पाण्यात दिवे काही वेळ भिजत घालून, नंतर ते स्वच्छ घासून, पाण्याने धुवून घ्यावेत.

  • आता हे दिवे सुती कापडाने चांगले पुसून घ्या.

  • त्यानंतर, तुमच्या देवघरासमोर पाट किंवा चौरंग मांडून त्याच्याभोवती सुंदर रांगोळी काढून त्यात आकर्षक रंग भरावे.

  • आता त्या पाटावर किंवा चौरंगावर लाल रंगाचे वस्त्र अंथरून, त्यावर दिवे मांडावेत.

  • आता या दिव्यांवर हळदी-कुंकू आणि फुले वाहून पूजा करावी.

  • त्यानंतर, हे दिवे प्रज्वलीत करावेत आणि त्यांना हात जोडून नमस्कार करावा.

  • दीप अमावस्येची पौराणिक कथा वाचावी आणि आरती करावी.

  • त्यानंतर, देवाला दुध-साखरेचा नैवेद्य दाखवावा.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Result: बंगाल निकालाचा 'महासंग्राम'! इतिहास घडणार की परंपरा कायम राहणार? हे ‘गेमचेंजर’ फॅक्टर्स निकाल ठरवणार

‘तुमचे पैसे पडले... म्हणत चार लाखांवर डल्ला! बँकेबाहेरच शेतकर्‍याची फसवणूक; 'एचडीएफसी'समोर दिवसाढवळ्या थरार...

GT vs PBKS: ४७ वर ५ विकेट्स, मग सुर्यांश शेडगे ठरला पंजाबसाठी संकटमोचक; गुजरातच्या वेगवान माऱ्यासमोर श्रेयस अय्यरचे शिलेदार ढेपाळले

खोटं बोलून नदी किनारी नेलं; नंतर जावयानं सासूला क्रूरपणे संपवलं, संतापजनक कारण समोर

Velhe Nasrapur Protest: नसरापूर अत्याचार प्रकरणाचा राजगड तालुक्यात तीव्र पडसाद; वेल्हे-पानशेतसह परिसर कडकडीत बंद

SCROLL FOR NEXT