Ashadhi Ekadashi 2024 esakal
संस्कृती

Ashadhi Ekadashi 2024 : आषाढी एकादशीला काय करावे आणि काय नाही आधीच जाणून घ्या, नाहीतर...

या काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही.

धनश्री भावसार-बगाडे

Do’s and Don’ts on Ashadhi Ekadashi : आषाढी एकादशीला मोठी एकादशी, महाएकादशी किंवा देवशयनी एकादशी असं म्हटलं जातं. कारण या दिवसापासून चातुर्मास सुरू होतो. म्हणजे सृष्टीचे पालन कर्ता भगवान विष्णू या काळात क्षीरसागरात आराम करतात अशी मान्यता आहे.

हा काळ अत्यंत पावन असला तरी या काळात शुभकार्यांचे मुहूर्त नसतात. तर या चार महिन्यांच्या काळात देवाची अधिकाधिक भक्ती करावी असे सांगितले जाते. त्यामुळे या दिवशी काय करावे आणि काय नाही याची माहिती करून घेणं फार गरजेचं असतं.

काय करावे आणि काय नाही

व्रत पाळावे - या दिवशी भक्त उपवास करतात आणि भगवान विष्णूची प्रार्थना करतात.

तुळशीपत्र - भगवान विष्णूंना तुळशी फार प्रिय आहे असं मानलं जातं. त्यामुळे या दिवशी न विसरता भगवंताला तुळशीपत्र अर्पण करावं. त्याशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते.

अन्न - या दिवशी जे उपवास करत नाहीत त्यांनी तामसिक अन्न सेवन करू नये. मसालेदार, मांस, मासे, अंडी, कांदा, लसूण खाऊ नये. यामुळे नकारात्मकता येते.

दान - या दिवशी उपवास असो वा नसो पण पैसे, वस्त्र, अन्न आणि पाणी यांचे दान करायला हवे. हे अत्यंत पुण्यकर्म मानले जाते.

ब्रह्मचार्य पालन - या दिवशी ब्रह्मचार्य पालन करायला हवे. भाविकांनी मनावर, शरीरावर ताबा मिळवायला शिकले पाहिजे. संपूर्ण दिवस मंत्रजपात घालवावा.

तांदुळ खाऊ नये - या दिवशी भात किंवा तांदळाचे पदार्थ खाऊ नये. कराण एकादशीला भात खाणे वर्ज्य असते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Independence Day Live Update : लाल किल्ल्यावर पंतप्रधान मोदींना मानवंदना

शहर हद्दीतही दोन्ही बाजूला ३० मीटरचेच बंधन! महामार्गांलगतच्या हॉटेल, ढाब्यांवर ६० दिवसांत हातोडा; जिल्हाधिकाऱ्यांकडून ‘कृती दल’ स्थापन, वाचा...

Tricolor Cheese Toast Recipe: या स्वातंत्र्यदिनाला नाश्त्यात करा काहीतरी हटके! १० मिनिटांत बनवा चीजने भरलेला ‘तिरंगा टोस्ट’

Career Horoscope: सरकारी नोकरीत मिळवतात यश; ‘या’ राशींना मिळते नशिबाची साथ, करिअरमध्ये करतात मोठी प्रगती, तुमची रास कोणती?

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : १५ ऑगस्ट २०२६ ते २१ ऑगस्ट २०२६ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT