Kande Navami esakal
संस्कृती

Kande Navami : कांदा भजी खाण्याचा आज शेवटचा दिवस ! काय असते कांदे नवमी ? जाणून घ्या महत्व

उद्या पासून ते कार्तिकी पौर्णिमे पर्यंत बऱ्याच घरांमध्ये कांदा लसूण व वांगे खाणं बंद केले जाते

साक्षी राऊत

Kande Navami : आज आषाढ शुद्ध नवमी आहे. काही ठिकाणी यांस कांदे नवमी असेही म्हणतात. आज कांदे, वांगे व लसूण खाण्याचा शेवटचा दिवस. इथून पुढे बरेच जण चातुर्मास पाळतात. (चातुर्मास पाळण्यासाठी). उद्या पासून ते कार्तिकी पौर्णिमे पर्यंत बऱ्याच घरांमध्ये कांदा लसूण व वांगे खाणं बंद केले जाते. (बहुतेक घरात चंपाशष्टी पर्यंत कांदे वांगे लसूण बंद असते.)

आषाढी एकादशी ला जोडलेल्या अनेक गोष्टींमधील एक म्हणजे कांदा नवमी (Kanda Navmi) आषाढी शुध्द एकादशीपासून ते कार्तिकी शुध्द एकादशीपर्यंत चातुर्मास असतो. चातुर्मास म्हणजे वर्षातले चार महिने, कांदा लसुण खाणं बंद करायचं. मग ते बंद करण्यापूर्वी भरपूर खाऊन घ्यावेत यासाठी म्हणून एकादशीपूर्वी आषाढ शुद्ध नवमीला कांदे नवमी साजरी केली जाते.

आषाढ शुद्ध नवमी ही आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षातील नववी तिथी आहे. याला कांदे नवमी असेही म्हणतात. (Ashadhi Wari) यादिवशी कांदे पोहे, कांद्याची साधी भजी, कांद्याची खेकडा भजी, कांद्याचा झणझणीत झुणका, कांद्याची पीठ पेरलेली भाजी, कांद्याचे थालीपीठ, कांद्याची चटणी अशा नानाविध प्रकारांची चटकदार कांद्याचे पदार्थ बनवून मेजवानी करण्याची प्रथा आहे.

कांदा नवमीच्या निमित्ताने जाणून घ्या कांदा भज्यांची भन्नाट रेसिपी

कांदा भजीसाठी लागणारे साहित्य

कांदा भजीसाठी लागणारा मुख्य घटक म्हणजे कांदा. कांदा उभा चिरून तो स्वच्छ धुवून तो सुटा करून त्यामधील सर्वा पाणी काढून त्याला मीठ लावून ५-१० मिनिटे ठेवले जाते आणि त्याला पाणी सुटले की त्यात दाळीचे पीठ घालून त्याचे मिश्रण तयार केले जाते. नंतर त्यात मिर्ची आणि चवीपुरते मीठ घाला.

कांदा भजी कशी बनवायची?

कांदा भजीचे मिश्रण संपूर्ण तयार झाल्यावर कढईत तेल आतून मीडियम आचेवर गरम झाल्यानंतर त्यात भजी तळा. तुमची कुरकुरीत भजी तयार आहेत. ही भजी तुम्ही सॉससोबत किंवा तुम्हाला आवडत्या कॉम्बिनेशसोबत खाऊ शकता. (Recipe)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Rate Hike: पेट्रोल ₹5 तर डिझेल 3 रुपयांनी महाग! नवे दर लागू; महाराष्ट्रात 1 लिटर आता कितीला?

IND vs WI, 3rd ODI: अंशुल कंबोजचं भारतासाठी पदार्पण, सिराजलाही संधी; पण दोघांना वगळलं; पाहा Playing XI

‘सोबत राहा, महिन्याला स्टायपेंड देतो’; विवाहित निर्मात्याची रेणुका शहाणेंना विचित्र ऑफर, प्रस्ताव ऐकून अभिनेत्रीला बसला धक्का

ओये बिर्याणी एक और कॅच छोड़ ना!’ भारतीय फॅन्सनी सैम अयूबची घेतली फिरकी; आधी वैभवला OUT करून पाळणा हलवला, नंतर दोन कॅच सोडले VIDEO व्हायरल

Latest Marathi News Live Update : ठाकरे बंधूंच्या 'गर्जना' मोर्चाला शेकापचा पाठिंबा

SCROLL FOR NEXT