Ashadhi Ekadashi 2024 esakal
संस्कृती

Ashadhi Ekadashi 2024: यंदा आषाढी एकादशी कधी? जाणून घ्या शुभ मुहूर्त अन् महत्व

Ashadhi Ekadashi 2024 : 'विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची'..! संपूर्ण महाराष्ट्रातील वातावरण सध्या भक्तीमय झाले आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Ashadhi Ekadashi 2024 : 'विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची'..! सध्या संपूर्ण महाराष्ट्रातील वातावरण भक्तीमय झाले आहे. पंढरपूरच्या लाडक्या विठूरायाची आस वारकऱ्यांना लागली असून ते विठ्ठलाच्या दर्शनासाठी आतुर झाले आहेत. अवघ्या काही दिवसांवर आषाढी एकादशी येऊन ठेपली असून, सर्व भक्तांना विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ लागली आहे.

हिंदू धर्मामध्ये आषाढी एकादशी तिथीला विशेष असे महत्व आहे. हिंदू पंचांगामध्ये आषाढी एकादशीच्या तिथीला विठुरायाची मोठ्या भक्तीभावाने पूजा आणि आराधना केली जाते. या आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी वारकरी दरवर्षी पायी वारी करतात. या वारीचा महाराष्ट्राला प्राचीन इतिहास लाभला आहे.

पंढरपुरची वारी हा वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव आहे. या दिवसापासून चातुर्मासाला सुरूवात होते. यंदा ही आषाढी एकादशी कधी आहे? त्याची तिथी आणि शुभ मुहूर्त काय? याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

आषाढी एकादशी तिथी

यंदा आषाढी एकादशी १७ जुलैला (बुधवारी) साजरी केली जाणार आहे. हिंदू पंचांगानुसार आषाढी एकादशीची तिथी १६ जुलै (मंगळवारी) रोजी रात्री ८ वाजून ३३ मिनिटांनी सुरू होणार आहे. ही तिथी १७ जुलै(बुधवारी) रात्री ९ वाजून ३३ मिनिटांनी समाप्त होणार आहे. त्यामुळे, उदय तिथीनुसार आषाढी एकदशीची तिथी ही १७ जुलैलाच साजरी केली जाणार आहे.

या दिवशी विठूरायाची आणि भगवान विष्णूंची पूजा केली जाते. उपवास केला जातो. आषाढी एकादशीची तिथी हिंदू धर्मामध्ये सर्वात पवित्र आणि महत्वाची मानली जाते. महाराष्ट्रात या निमित्ताने वारीचा आणि वारकऱ्यांचा मोठा धार्मिक उत्सव पाहायला मिळतो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून आलेले वारकरी या दिवश पंढरपूरला विठूरायाच्या चरणी लीन होतात.

आषाढी एकादशीचा शुभ मुहूर्त

आषाढी एकादशीचा शुभ मुहूर्त हा पहाटे पाच वाजेपासून ते सायंकाळी ४ वाजून ३३ मिनिटांपर्यंत असेल. त्यामुळे, या शुभ मुहूर्तावर तुम्ही विठुरायाची आणि भगवान विष्णूंची पूजा करू शकता.

आषाढी एकादशीच्या निमित्ताने अनेक भाविक पारायण करतात. हे पारायण करण्यासाठीचा शुभ मुहूर्त हा पहाटे ५ वाजून ३५ मिनिटांनी सुरू होणार असून, तो ८ वाजून २० मिनिटांपर्यंत असेल. पारायणाच्या दिवशी द्वादशी समाप्ती ही ८ वाजून ४४ मिनिटांनी होईल.

आषाढी एकादशी तिथीनंतर भगवान विष्णू निद्रावस्थेत जातात. त्याचवेळी चातुर्मासाला सुरूवात होते. त्यामुळे, पुढील ४ महिने देव झोपी जातात, अशी मान्यता आहे. त्यामुळे, या काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माेठी बातमी! 'बिबट्याच्या हल्ल्यातील नुकसान भरपाई वाढणार'; शासनस्तरावर हालचाली सुरु, राज्यभरात हल्ल्यांत वाढ..

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! उद्या मिळणार प्रत्येक शेतकऱ्यास २००० रुपये; शेतकरी सन्मान निधी योजना, राज्य सरकारचाही २००० रुपयांचा हप्ता महिनाअखेर जमा होणार

CA Success Story:'रिक्षा चालकाची लेक बनली सीए'; आई-वडिलांचे स्वप्न सत्यात उतरवलं, भावाचे मिळाले पाठबळ..

अत्याचार पीडितांची चिंता मिटली! ‘या’ क्रमांकावर कॉल केल्यास मिळणार मोफत वकील; केसचा निकाल लागेपर्यंत एक रुपयाही फी म्हणून द्यावी लागणार नाही, वाचा...

मोठी बातमी! ३२ जिल्हा परिषदा, ३३१ पंचायत समित्यांचा बिगुल ५ डिसेंबरपासून; मुंबईसह २९ महापालिकांची निवडणूक ३१ जानेवारीपूर्वीच; प्रोग्राम कसा, वाचा...

SCROLL FOR NEXT