saath chal
saath chal sakal
संस्कृती

पालखी सोहळ्यात ‘सकाळ माध्यम समूह’ आणि ‘फिनोलेक्स केबल्स’चा उपक्रम

सकाळ वृत्तसेवा

पालख्यांचे बुधवारी (ता. २२) पुण्यात आगमन होत आहे. एक मुक्कामानंतर शुक्रवारी (ता. २४) त्या शहरातून प्रस्थान ठेवतील.

पुणे - आषाढी वारीनिमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे औचित्य साधत होणाऱ्या ‘साथ चल’ उपक्रमात सहभागी होण्यासाठी संस्था, संघटनांचा मंगळवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील अनेक शाळा, महाविद्यालये, सामाजिक व सांस्कृतिक संस्था, फिटनेस ग्रुप, औषध विक्रेते आदी विविध क्षेत्रांचा त्यात समावेश आहे.

पालख्यांचे बुधवारी (ता. २२) पुण्यात आगमन होत आहे. एक मुक्कामानंतर शुक्रवारी (ता. २४) त्या शहरातून प्रस्थान ठेवतील. यानिमित्त ‘सकाळ माध्यम समूह’ आणि ‘फिनोलेक्स केबल्स’ यांच्यातर्फे वारकऱ्यांसमवेत आरोग्याचा संदेश देणारा ‘साथ चल’ उपक्रम आयोजित केला आहे. ‘वारी विठुरायाची आणि आरोग्य संगोपनाची’ ही या उपक्रमाची संकल्पना आहे. शुक्रवारी (ता. २४) सकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी कॅंप भागातील पुलगेट येथील महात्मा गांधी बसस्थानकावर हा विशेष उपक्रम होणार आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि त्यातील स्वयंसेवक, तसेच शिवसेनेचे पुणे शहरातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच महाराष्ट्र साहित्य परिषद, अखिल भारतीय नाट्य परिषद (पुणे शाखा), अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, विजय पटवर्धन फाउंडेशन, संवाद, रंगत-संगत प्रतिष्ठान, निळू फुले कला अकादमी, एकपात्री कलाकार परिषद, नंदकिशोर कल्चरल सोसायटी, महाराष्ट्र नटरंग अकादमी, पुणे केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन (मार्केट यार्ड, बिबवेवाडी झोन), ॲक्टिव्ह फिटनेस ग्रुप (धायरी), बाल शिक्षण मंच, ममता संस्था, तुळशीबाग व्यापारी संघ, ख्रिस्ती समुदाय, मुस्लिम समुदाय, स्वच्छ संस्था, सहेली संघ, आर्यन्स वर्ल्ड स्कूल, पूना कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स, डॉ. पी. ए. इनामदार आबेदा इनामदार कॉलेज, कॅम्प एज्युकेशन सोसायटी, आचार्य श्री विजय वल्लभ स्कूल (टिंबर मार्केट), पुणे प्लॉगर्स, सैनिक फेडरेशन, ज्ञानयोग सेवा ट्रस्ट, प्रहार सैनिक कल्याण संघ, ट्रिपी मूव्हमेंट, किर्लोस्कर वसुंधरा ट्रस्ट, नंदनवन तरुण मंडळ (बच्चू अड्डा), शिव तरुण मंडळ (गाडी अड्डा), अशोक चक्र तरुण मंडळ (डवायर लेन), नवनिर्माण तरुण मंडळ (दस्तुर मेहेर रोड), पापा उस्ताद मंडळ (बुट्टी स्ट्रीट), कॅन्टोन्मेंट कामगार मंडळ (अत्रे चौक), छत्रपती शिवाजी मार्केट मंडळ (शिवाजी मार्केट), यंग बॉईज तरुण मंडळ (एमजी रोड), कामाठीपुरा तरुण मंडळ (भोपळे चौक), साईनाथ तरुण मंडळ (केदारी रोड), सुवर्ण तरुण मंडळ (साचापीर स्ट्रीट), जोगेश्वर तरुण मंडळ (भीमपुरा), शिवशक्ती तरुण मंडळ (सेंटर स्ट्रीट), महावीर मित्र मंडळ (सेंटर स्ट्रीट), शिवतेज तरुण मंडळ (बुट्टी स्ट्रीट), उम्मत फाउंडेशन, हिंदवी स्वराज्य संघ, एकता विकास फाउंडेशन, १५ ऑगस्ट प्रतिष्ठान, युवा प्रतिष्ठान, आय. टी. शेख फाउंडेशन, फूड बॅक संस्था, भारतीय सिंधू सभा युवा, आलवसा फाउंडेशन, प्रसाद फाउंडेशन, आरपीआय युवक आघाडी आदी या उपक्रमात सहभागी होणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ujjwal Nikam: उज्ज्वल निकम यांना भाजपकडून मुंबई उत्तर-मध्यमधून उमेदवारी जाहीर; पुनम महाजन यांचा पत्ता कट

Shashikant Shinde: मार्केट FSI घोटाळा प्रकरणी शशिकांत शिंदेंवर गुन्हा दाखल; निवडणुकीच्या तोंडावर कारवाईची शक्यता

Latest Marathi News Live Update: पुण्याचे माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांचे दीर्घ आजाराने निधन

Hemant Soren : हेमंत सोरेन यांना धक्का! ईडी कोर्टाने फेटाळला जामीन अर्ज; काय आहे प्रकरण?

Lok Sabha Election : ....म्हणून श्रीकांत शिंदेंना लोकसभेत पाठवणे गरजेचे; रामदास आठवलेंचे उल्हासनगरात आवाहन

SCROLL FOR NEXT