ashadi wadi 2023 sant dyaneshwar maharaj palkhi at velhe pune culture wari warkari  sakal
संस्कृती

Ashadi Wari 2023 : हरिनामाचा जयघोष करीत करीत माउलींच्या पालखी वाल्ह्यात मुक्कामासाठी पाेहाेचली ...

अध्यात्म-विज्ञानाचा संगम; पादुकांना आज नीरास्नान

विलास काटे

वाल्हे : टाळमृदंगाचा गजर आणि हरिनामाचा जयघोष करीत करीत माउलींच्या पालखी सोहळ्याने हिरव्यागार निसर्गाच्या साथीत सकाळची अल्हाददायक वाटचाल करीत दुपारी पावणे दोनच्या सुमारास वाल्ह्यात मुक्कामासाठी थांबला. येथील समाजआरतीमध्ये वारीच्या शिस्तीचे दर्शन लाखो भाविकांना घडले.

पहाटे माऊलींच्या पादुकांवर रुद्राभिषेक प्रमुखविश्वस्त योगेश देसाई यांच्या हस्ते झाली. त्यानंतर सोहळा जेजुरीतून वाल्हेच्या दिशेने मार्गस्थ झाला. दरम्यान अनेक भाविक पहाटेपासुनच कुलदैवत खंडेरायाचे आणि कडेपठार येथील खंडोबाचे दर्शन करण्यासाठी गडावर गेले. कुलदैवताचे दर्शन करुन भाविक दिंडीसोबत चालत होते.

जेजुरीतील औद्योगिक भागातून मार्गस्थ होताना खिंडीमध्ये सकाळच्या न्याहारीसाठी वारकरी थांबले.ठिकठिकाणी रस्त्यावर,टेकडीवर वारकरी दही धपाटे,शेंगदाणा चटणी, भजी, खारमुरे, पोहे यांचा आस्वाद घेत होते. न्याहारी झाल्यावर सोहळा दौंडज मार्गे वाल्हेकडे निघाला. वाल्हे ग्रामस्थांनी सोहळ्यात जोरदार स्वागत केले. दौंडजवळ रेल्वे आणि वारकऱ्यांचा सोहळा जाताना अध्यात्म आणि विज्ञान संगम पाहायला मिळाला.

दरम्यान एक वाजता माउलींची पालखी वाल्हे तळावर पोचली. यावेळी पालखी मधोमध ठेवण्यात आली. यावेळी सोहळाप्रमुख अॅड. विकास ढगे, प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, सहायक विश्वस्त सुधीर पिंपळे, प्रशांत

सुरू, मालक बाळासाहेब आरफळकर उपस्थित होते. त्यानंतर हरविलेल्या आणि सापडलेल्या वस्तूंची यादी वाचण्यात आली. आवश्यक त्या सूचना दिल्यानंतर राजाभाऊ चोपदार यांनी चोप उंचावताच शांतता पसरली. आरतीनंतर पालखी सोहळा विसावला. यावेळी वारीतील शिस्तीचे दर्शन घडले.

दरम्यान, दिवसभर चालल्याने थकलेल्या लोकांना अनेक दानशूर लोकांनी मोफत पाणी बॉटल वाटप केले. देवस्थानच्यावतीने उष्मा संकटाच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी प्रतिसाद दिल्याने वारक-यांची तहान भागली.

वारीविषय़ी...

वाल्हे तळावर हवेमुळे मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज रविवारी माउलींच्या पादुकांना नीरास्नान पालखी सातारा जिल्ह्यात प्रवेश करणार रस्त्याचे तात्पुरत्या स्वरूपात रुंदीकरण केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ambadas Danve: राज्याच्या डोक्यावर 9 लाख कोटींचं कर्ज, देवाभाऊंच्या 200 कोटींच्या जाहिराती, सगळं भगवान भरोसे...

ED summons : ऑनलाईन बेटिंग अ‍ॅप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा अन् सोनू सुदला ईडीचं समन्स,'या' तारखेला होणार चौकशी, अडचणी वाढणार?

Pune Crime : काल बापाने न्यायालयात एन्काउंटरची भीती केली व्यक्त, आज कृष्णा आंदेकर पोलिसांनी शरण; आयुष कोमकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट

IND vs PAK: जय शाह यांचा पाकिस्तानला दणका; आशिया कपवर बहिष्काराची दिलेली धमकी, आता तोंडावर आपटण्याची वेळ

Sharad Pawar : 'देवाभाऊं'नी महाराजांचे नाव घेऊन बळीराजाकडे ढुंकून पाहिले नाही: शरद पवार

SCROLL FOR NEXT