ashadi wari 2023 police warkari pandharpur jejuri culture maharashtra sakal
संस्कृती

Ashadi Wari 2023 : ‘खाकी’तील सेवेकरी; माउलींचे वारकरी

वारीच्या ड्युटीवरील पोलिसांमध्ये नम्रता अन् विनयशीलतेची प्रचिती

शंकर टेमघरे -सकाळ वृत्तसेवा

जेजुरी : ‘माउलीऽ कडेने चाला’, ‘माउलीऽ पुढे ट्रॅफिक जाम आहे, गाडी आडवी घालू नका’, ‘माउलीऽ रांगेत उभे राहा, ढकलाढकली करू नका’, ‘माउलीऽ रस्त्यात नका दुकान लावू’, हे शब्द कुण्या वारकऱ्यांचे नाहीत. तर, पोलिसांचे आहेत. विनंती करणारे. प्रेमळ. आश्वासक. विश्वास नाही ना बसत!

पण, हे वास्तव दिसतंय, पंढरीच्या वाटेवर. अन्य वेळी कामाचा भाग म्हणून कडक भाषेत प्रसंगी ‘पोलिसी खाक्या’ दाखवणारे पोलिस पंढरीच्या वाटेने चालताना आपोआपच विनयशील होतात. ‘माउलीमय’ होऊन जातात. काही पोलिसांना वारीचा जणू लळाच लागतो. गेली अनेक वर्ष पंढरीच्या वारीसाठी असलेल्या बंदोबस्ताच्या ड्यूटीची मागणी करत सात्विकतेच्या भक्तिमेळ्यात ते ‘माउली` होऊन जातात.

वारीला लाखो भाविक असतात. इतक्या मोठ्या संख्येने वारकरी चालत असल्याने सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा म्हणून पोलिस यंत्रणा कार्यरत असते. वारीच्या परंपरेत त्यांचा हस्तक्षेप नसतो. वारीच्या नियंत्रणाची जबाबदारी चोपदारांवर असते.

कधी निघायचे, कधी थांबायचे, किती वाजता निघायचे, याचे निर्णय ते घेतात. तसेच व्यवस्थापनाचा भाग संस्थान कमिटी करते. त्यामुळे वारीत चालणाऱ्या दिंड्यांतील वारकऱ्यांना पोलिस बंदोबस्ताची गरज नसते. वारकऱ्यांत स्वयंशिस्त मूळतः असते. परंतु इतका मोठा गर्दीचा प्रवाह चालताना काळजी म्हणून पोलिस सोबत राहतात.

वाटचालीत परिसरातील भाविक दर्शनासाठी येतात, त्या गर्दीवर नियंत्रण राहावे आणि वाहतूक व्यवस्था हाताळण्यासाठी पोलिसांची गरज असते. त्यामुळे निष्ठावान वारकऱ्यांबाबत त्यांनाही आत्मीयता असते. वारीत सात्त्विक, विनयशील विचारांचे अनुकरण पोलिसही करतात. ‘माउली, माउली’ म्हणण्याचे संस्कार वारकऱ्यांच्या सहवासातूनच त्यांच्यात येतात. त्यामुळे एरवी ड्युटीचा भाग म्हणून स्वभावात आलेला कडकपणा वारीच्या वाटेवर गळून पडतो,

विनयशीलता वाढते. सात्विकता, विनयशीलता, संयमी भूमिका वारकरी जगत असतात. त्यामुळे लाखो भाविक अठरा-वीस दिवस गुण्यागोविंदाने नांदतात. एका कुटुंबाप्रमाणे राहतात. कोणी तक्रार करीत नाही. त्यामुळेच या मार्गावर सहिष्णुता जगते. पोलिस वारीच्या ड्युटीच्या काळात वारकऱ्यांमधील भाव जगतात. म्हणून प्रभावित होऊन काही पोलिस वारीच्या बंदोबस्ताची ड्यूटी मागून घेतात. काही पोलिस तर अठरा दिवसांची ड्यूटी मागून पंढरीचे वारकरी होतात.

वारी काळात त्याच्याभोवतीचे वलय आणि कामानुसार त्यांचा स्वभावही चटकन कसा बदलतो, हे वारीतील बंदोबस्तावरील पोलिसांकडे पाहिले की लगेच जाणवू लागते. हे सारे बदल केवळ संतसंगतीमुळेच शक्य होतात, त्यामुळेच `सेवेलागी सेवक झालो, तुमच्या लागलों निज चरणा,` या संत वचनाची अनुभूती वारीत पोलिसांची सेवा पाहताना येते.

वारीमध्ये ड्युटी करताना समाधान मिळते. दररोज माउलींचे दर्शन होते, वारकऱ्यांची सेवा करताना मिळणारे आत्मिक समाधान मिळते. यंदाचे चौदावे वर्ष असून, वारीसमवेत सुरक्षेची सेवा करतो.

- आनंद भोसले, सातारा

आळंदीत ड्युटीला असताना माउलींच्या सेवेची मिळत होती. मात्र, त्यानंतर अन्यत्र बदली झाल्यानंतरही आळंदीत ड्युटीसाठी बोलावले जाते, त्यावेळी आनंद वाटतो, यापूर्वी केवळ आळंदीत सेवा करायला मिळत होती. मात्र, यंदा पालखी सोहळ्यात नीरेपर्यंत ड्यूटी मिळाली आहे. त्यामुळे अधिक समाधान लाभले आहे.

- राहुल काळे, वेल्हा पोलिस ठाणे, जि. पुणे

मागीलवर्षी सातारा जिल्ह्यात पालखी आली तेव्हा बंदोबस्त केला.यंदा दुसरे वर्ष आहे. रथासोबत बंदोबस्त करताना आनंद वाटतो. बंदोबस्तावेळी कष्ट झाले तरी क्षीण वाटत नाही. ऊर्जा मिळते.

-दीपाली खाडे, कोल्हापूर

दिवेघाटातून रथासोबत सासवडपर्यंत धावत यावे लागले. पहिला दिवस असल्याने थोडा त्रास झाला. मात्र आजच्या वाटचालीत वारकर्‍यांसोबत खूप आनंद वाटला. बाकीच्या गोष्टीचा विसर पडतो. माऊलीमय झाल्यासारखे वाटते.

- आशा नाडेकर, कोल्हापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: पावसाने पुन्हा दाखवला ‘आपला जोर’! रेल्वे रुळांवर ११ इंच पाणी; प्रवासी अडकले अन् स्टेशनवर मोठी गर्दी

India Squad For Asia Cup 2025: आशिया चषकासाठी भारतीय संघ जाहीर; सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील १५ शिलेदार, पूर्ण लिस्ट

China-India: चीनचे परराष्ट्र मंत्री दिल्लीहून इस्लामाबादला जाणार; नेमकं कारण काय?

Video : 'मी सांगितलेला होमवर्क केलास काय रे?' पंतप्रधान मोदींनी अंतराळवीर शुभांशु शुक्लांशी साधला संवाद, मिळालं एकदम भारी गिफ्ट..

Viral Video : प्रियकरासोबत जाण्याचा प्लॅन चॅटजीपीटी मुळे धुळीस; महिलेला कोसळले रडू, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT