ashadi wari 2023 sant tukaram maharaj palkhi at varvand culture maharashtra sakal
संस्कृती

Ashadi Wari 2023 : नाम गजरात सोहळा वरवंडमध्ये दाखल

रस्त्यावर दुतर्फा रांगोळ्या काढत ग्रामस्थांकडून पालखीचे स्वागत

राजेंद्रकृष्ण कापसे : सकाळ वृत्तसेवा

वरवंड : आजची वाटचाल कमी अंतराची असली तरी सोसाट्याचा वारा सुटल्याने धूळ उडत होती. त्याचा परिणाम चालणाऱ्या वारकऱ्यांवर झाला. तरीही श्रीहरीचे गोडवे गात, संत तुकाराम महाराज यांची पालखी वरवंड येथे विसावली. दरम्यान, गुरुवारी रात्री यवत मुक्कामी म्हातारबुवा दिंडी यांचे कीर्तन झाले. तर खेडेकर दिंडीच्या वतीने जागर केला. श्रीमहालक्ष्मी मंदिरात पहाटे अभंगाची पंचपदी देहूकरांनी म्हटली.

आजची वाटचाल यवत ते वरवंड अशी कमी अंतराची होती. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास सोहळा वरवंडच्या दिशेने मार्गस्थ झाला. पाऊणे दहा वाजता चौघडा, भांडगाव फाटा येथे पोहोचला.. महामार्गापासून सुमारे अर्धा किलोमीटर गांव आहे. सोहळा आत गेल्यावर ग्रामस्थ आनंदित झाले होते.

रस्त्याच्या कडेने रांगोळ्या काढल्या होत्या. सर्वत्र स्वच्छता होती. पालखी रथातून खांद्यावर घेत श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिरात सकाळी सव्वादहा वाजता पालखी पोचली.

आरतीनंतर पिठले भाकरीचा नेवैद्य दाखविण्यात आला. त्यानंतर सोहळ्यातील वारकरी, मानकरी यांच्या जेवणाच्या पंगती बसल्या. त्यानंतर सोहळा चौफुला येथे विसाव्याला पोचला. यावेळी परिसरातील १०- १२ गावातील नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.

सावलीसाठी पेट्रोलपंपाचा आधार

आजच्या या वाटचालीत रस्त्याच्या कडेला पूर्वी झाडे होती. वारकरी त्याचा सावलीसाठी आधार घेत. परंतु रुंदीकरणात झाडे तोडली. मार्गावर वृक्ष नसल्याने वारकऱ्यांनी सावलीसाठी येथील पेट्रोल पंपांचा आधार घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yashasvi Jaiswal ला यष्टिरक्षण का करावसं वाटतंय? हे भलतंय खूळ डोक्यात येण्याचं कारण, घ्या जाणून...

Successful Investment: बाबो! ही महिला चक्क पार्किंगमधून कमावते लाखो रुपये; नेमका काय आहे बिझनेस?

अंतराळात तयार होणार स्कॉच व्हिस्की! कुणाला प्यायला मिळणार? ‘स्पेस पफिन’ मिशन नेमकं काय?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींसह INDIA आघाडीचे ८ नेते सुप्रीम कोर्टाच्या दिशेने रवाना; याचिका दाखल करणार

FDA Action: खाद्यतेलाच्या साठ्यांवर छापा, 'एफडीए'च्या कारवाईत १.२८ कोटींचा साठा जप्त

SCROLL FOR NEXT