ashadi wari 2023 sant tukaram maharaj palkhi reach at wakhari pandharpur sakal
संस्कृती

Ashadi Wari 2023 : संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा ऊन सावलीच्या खेळात वाखरीत पोहोचला

ऊन सावलीत सुखद वाटचाल

राजेंद्रकृष्ण कापसे

वाखारी : पंढरपूरची विठाई जननी अठ्ठावीस युगे विटेवर उभी आहे. तिच्या दर्शनासाठी आतुर झालेले जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा ऊन सावलीच्या खेळात वाटचाल करत वाखरीत पोहोचला आणि रिंगणाच्या खेळात रमेलेले वारकरी मंगळवारी रात्री वाखरीत विसावले.

पंढरीसी जावें ऐसें माझें मनीं।

विठाई जननी भेटे केव्हां ॥

न लगे त्याविण सुखाचा सोहळा ।

लागे मज ज्वाळा अग्निचिया ॥

तुका म्हणे त्याचे पाहिलिया पाय ।

मग दुःख जाय सर्व माझें ॥

यंदा पावसाने देखील मोठी ओढ दिली आहे. परिणामी सोहळ्यात सुरवातीला गर्दी कमी होती. परंतु पाऊस नसला तरी वारी चुकवायची नाही किमान दोन- चार दिवस तरी वारीत गेलेच पाहिजे अशा भावनेने वारकरी वारीत सहभागी झाल्याने मागील चार दिवसांपासून हळूहळू सोहळ्यात गर्दी वाढत गेली.

दरम्यान, पिराची कुरोलीत सकाळी सहा वाजता पादुकांना अभिषेक करण्यात झाला. काकड आरती झाली. सात वाजता मालक देहूकरांच्या वतीने पालखी समोर कीर्तन झाले. सकाळी सव्वा नऊ वाजता कीर्तन संपले.

दरम्यान पालखी रथ सुंदरअशा फुलांनी सजवला होता. संत तुकाराम महाराज यांची प्रतिमा रथावर लावलेली होती. दुपारी बारा वाजता सोहळा मार्गस्थ झाला. दुपारी साडेबारा वाजता सोहळा पुणे - पंढरपूर या मुख्य रस्त्यावर आला. ग्रामस्थ मुख्य रस्त्यापर्यंत निरोप द्यायला आले होते.

वाडी कुरोली येथे पहिला विसावा

सोहळा वाटचाल करीत सेवा रस्त्याने सोहळा भंडीशेगावला साडेतीन वाजता दुपारचा विसावा घेतला. बाजीराव विहीर उभे रिंगणस्थळी नगारखाना पाच वाजता पोचला. नगारखाना व अश्व त्यामागील दिंड्या व रथ उड्डाणपूल उतरून थांबला.

रथामागील दिंड्या उड्डाणपुलावर होत्या. काका चोपदार व अन्य चोपदारांनी उभे रिंगण लावले. यावेळी संस्थानचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी दोन्ही अश्व रथाच्या दिशेने धावले. रथामागील २५ दिंड्यापर्यत पोचला.

रथातील पादुकांचे दर्शन घेऊन नगारखान्या जवळ अश्व पोचले. रिंगणानंतर हरिपाठाचे अभंग सुरू होते. सहा वाजता माऊलींच्या पालखीतील उडीचा खेळ संपला.

तेही याच मार्गाने पुढे जाऊ लागले. पुढे काही वेळ दोन्ही पालखी मधील दिंड्यामधील एकमेकांच्या सोबत चालत होते. त्यावेळी, ज्ञानोबा तुकाराम असा जयघोष सुरू होता. संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास सोहळा मुक्कामी विसावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT