Ashadi Wari 2023
Ashadi Wari 2023 sakal
संस्कृती

Ashadi Wari 2023 : रिमझिम सरींनी वारकरी सुखावले; रांगोळीच्या पायघड्यांवरून पालखीचा सोलापूरमध्ये प्रवेश

विलास काटे

नातेपुते : टाळ-मृदंगाचा गजर... ज्ञानोबा-तुकारामचा जयघोष...अन रणरणत्या उन्हात विठुरायाचे गोडवे गात पंढरीच्या दिशेने निघालेल्या माऊलींच्या पालखीचा दळभार पुणे, सातारा जिल्ह्यातील वाटचाल संपवून सोलापूर जिल्ह्यात पोहोचला.

रांगोळीच्या पायघड्या, भव्य स्वागतकमानी उभारून सोलापूर जिल्ह्यात मोठ्या उत्साहात वैष्णवांचे स्वागत करण्यात आले. पालखी सोहळा नातेपुतेमध्ये आल्यावर रिमझिम पाऊस झाला. यामुळे उष्म्याने हैराण झालेले वारकरी हर्षौल्लीत झाले. बरडमध्ये पहाटेची पूजा प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांच्या हस्ते झाली. माउलींच्या सोहळ्याने सकाळी साडेसहा वाजता बरडकरांचा निरोप घेतला. साडेसातच्या सुमारासच ऊन लागायला सुरुवात झाली.

बरडनंतर रस्ता रुंदीकरणामुळे काही काळ दिंड्यांच्या ट्रक थांबविल्या जात होत्या. सकाळी साडेआठच्या सुमारास पालखी सोहळा साधुबुवाच्या ओढ्याजवळ आला. रथातून पालखी साधुबुवांच्या समाधी मंदिरात नेण्यात आली. तेथे अॅड. संपतराव कुंभारगावकर यांचे प्रवचन झाले. त्यानंतर त्यांच्या वतीने परिसरात बाजरीच्या भाकऱ्या आणि आमटीची न्याहरी वारकऱ्यांना देण्यात आली. त्यानंतर सव्वानऊच्या सुमारास येथील विसावा संपवून सोहळा मार्गस्थ झाला.

‘आम्ही दैवाचे दैवाचे । दास विठुरायाचे ।’, असे विठुरायाचे गोडवे गात वारकरी नेटाने वाटचाल करीत होते. मजल दरमजल करीत साडेदहाच्या सुमारास सोहळा धर्मपुरी आला. यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, रणजित नाईक निंबाळकर, रणजितसिंह मोहिते पाटील यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत करीत रथाचे सारथ्य केले.

पालखी सोहळा दुपारच्या विसाव्यासाठी धर्मपुरी कॅनॉलजवळ थांबला. यावेळी परिसरातील भाविकांनी माउलींच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. परिसराला जत्रेचे स्वरूप आले होते. दोन तासांच्या विसाव्यानंतर पुन्हा सोहळा चालू लागला.

साडेचारच्या सुमारास सोहळा शिंगणापूर फाटा येथे आला तेथे विसावा घेऊन पालखी सोहळा नातेपुते तळावर विसावला. सोहळा नातेपुते येथे सायंकाळी आला तेव्हा रिमझिम पाऊस सुरू झाला अन् वारकरी पावसामुळे आनंदून गेले.

दिवसभरात...

  • धर्मपुरी कॅनॉलजवळील वारकऱ्यांना उन्हापासून संरक्षण मिळावे, यासाठी मंडप उभारले

  • रस्ता रुंदीकरणामुळे वाहतूक सुरळीतपणे सुरू

  • सकाळच्या टप्प्यात उन्हाचा चटका अधिक

सोहळ्यातील आज पहिले गोल रिंगण

माउलींच्या पालखी सोहळ्यात पहिले उभे रिंगण चांदोबाच्या लिंबाजवळ झाले. तर पहिले गोल रिंगण शनिवारी (ता. २४) पुरंदवडे येथे होणार आहे. रिंगण स्थळाची विश्वस्तांनी पाहणी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: Ram Naik: "विक्रमी संख्येने मतदान करा," पंतप्रधान मोदींचे मराठीतून आवाहन

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 20 मे 2024

IPL 2024: अखेर साखळी फेरीची सांगता झाली अन् दुसऱ्या क्रमांकाची रस्सीखेच हैदराबादानं जिंकली

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

SCROLL FOR NEXT