Astro Tips for Money sakal
संस्कृती

Astro Money Tips: या दिवसात कर्ज घेणे टाळाच नाही तर..

पैसे उधार घेणे सोपे आहे पण त्यांची परतफेड करणे तितकेचं कठीण आहे.

सकाळ डिजिटल टीम

ज्योतिष शास्त्रानुसार पैशांशी संबंधित व्यवहारांसाठी काही खास दिवस आणि वेळ ठरवण्यात आल्या आहेत.जर तुम्ही चुकीच्या दिवशी कुणाकडून पैसे उधार घेत असाल किंवा कर्ज घेत असला तर तुमच्यासाठी अडचणीचे ठरू शकते. या दिवसांत घेतलेल्या कर्जाचे ओझे लवकर उतरत नाही. त्यामुळे कर्जाचे व्यवहार करताना 'हे' ज्योतिष नियम काळजीपूर्वक लक्षात ठेवावे.

माणसाच्या आयुष्यात अनेक चढ-उतार येतात आणि कधी कधी अशी परिस्थिती येते की पैसे उधार घ्यायची इच्छा नसली तरी तुम्हाला तुमच्या नातेवाईकांकडून, मित्रांकडून, किंवा बँकेकडून पैसे उधार घ्यावे लागतात.

पैसे उधार घेणे सोपे आहे पण त्यांची परतफेड करणे तितकेचं कठीण आहे. कारण जेव्हा तुम्ही उधार घेतलेले पैसे परत करू शकत नाही तेव्हा समस्या अधिकच बिकट होते. एक एक पैसे जोडूनही तुम्ही कर्जाची परतफेड करू शकत नाही किंवा कधी कधी तर अशी परिस्थिती येते की तुम्हाला कर्जापेक्षा जास्त व्याज द्यावे लागते.

ज्योतिष शास्त्रानुसार हे सर्व का घडते तर याचे कारण असे की तुम्ही आर्थिक व्यवहार करताना दिवस आणि नियम लक्षात घेतलेले नसतात.

चला तर मग आजच्या लेखात आपण हे जाणून घेण्याचा प्रयत्न करु या की ज्योतिष शास्त्रानुसार आठवड्यातील कोणत्या दिवशी पैशाशी संबंधित व्यवहार करू नयेत.

या दिवसात कर्ज घेणे तुमच्यासाठी जड जाऊ शकते आणि तुम्ही कर्जाच्या ओझ्याखाली दबू शकता.

कर्जाचे व्यवहार करताना या गोष्टी विशेष लक्षात ठेवा.

1) सूर्यदेव ऋणी मानला जातो त्यामुळे रविवारी कर्ज घेऊ नका.

2) ज्योतिष शास्त्रात चर आरोह शुभ मानला जात नाही. त्यामुळे या चढत्या काळात कोणालाही पैसे देणे टाळावे.

3) कर्ज घेताना मूल, आद्रा, ज्येष्ठ, विशाखा, कृतिका, ध्रुव संगनक नक्षत्र आणि रोहिणी नक्षत्र लक्षात ठेवावे.

4) संक्रांतीच्या दिवशी कर्ज घेऊ नये. या दिवशी घेतलेले कर्ज फेडणे कठीण होते. वृद्धी योग, द्विपुष्कर योग, त्रिपुष्कर योग यामध्येही कर्ज घेऊ नये.

5) आठवड्यातील काही दिवसांत कर्ज घेणे खूप जास्त असू शकते ज्योतिष शास्त्रात असे सांगितले आहे की आर्थिक व्यवहार करताना आठवड्यातील वेळेला विशेष महत्त्व असते. कर्ज घेण्यापूर्वीचे दिवस लक्षात ठेवणे आवश्यक आहे.


6) ज्योतिषशास्त्रानुसार, चुकूनही शनिवारी कर्ज घेऊ नये. या दिवशी कर्ज घेतल्याने माणूस अधिकच कर्जात अडकतो.


7) शनिवार सोबतच मंगळवार आणि रविवारी देखील कर्ज घेऊ नये.


8) जर तुम्ही आठवड्याच्या या 3 दिवसांत कर्ज घेत असाल तर तुम्हाला कर्जाची परतफेड करण्यात अडचणी येऊ शकतात.


9) परंतु या दिवसांत कर्ज फेडणे चांगले मानले जाते. कर्जाचा हप्ता भरण्यासाठी मंगळवार हा सर्वात शुभ दिवस आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: हा व्हिडिओ खास आहे... नातं रक्ताचं नव्हतं, पण... जंगलात वाजली शहनाई, CRPF जवानांनी निभावलं वधूच्या भावाचं कर्तव्य

Ashadhi Wari 2025 : बंधुभेटीच्या सोहळ्याने अवघे वैष्णव भावुक; संत ज्ञानेश्वर महाराज-संत सोपानदेवांच्या भेटीचा सोहळा अनुभवण्यासाठी गर्दी

Satara Crime : धोमच्या चोरीप्रकरणी एकास अटक; नवनाथ दत्त मंदिरातील दानपेटी फोडून रोख रक्कम लंपास

Public Health Corruption: आरोग्य खात्यात साहित्य खरेदीत गैरव्यवहार; आमदार डाॅ. राहुल पाटील यांचा विधानसभेमध्ये आरोप

Latest Maharashtra News Updates : सीमाप्रश्‍नी तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षपदी धैर्यशील माने यांची नियुक्ती, महाराष्ट्र सरकारकडून प्रसिद्धीपत्रक जारी

SCROLL FOR NEXT