astrio tips  esakal
संस्कृती

Astro Tip : या दिवशी कर्ज घेणं पडेल महागात ; परतफेड करणं होईल अशक्य !

कर्जाचा हप्ता भरण्यासाठी मंगळवार हा सर्वात शुभ दिवस मानला जातो

सकाळ वृत्तसेवा

पुणे : आपल्या जीवनातील प्रत्येक गोष्टीचा संबंध ज्योतिषशास्त्राशी आहे. घरी काही चांगली घट़ना असो वा वाईट आपण पंचाग पाहतो. तो दिवस शुभ आहे की अशूभ हे पाहीले जाते. २४ तासातील कोणती वेळ शुभ हेही पाहीले जाते. तसेच कोणाकडून तरी उधार पैसे घेतानाही हे पाळावे लागते. नाहीतर याचे गंभीर परीणाम भोगावे लागतात.

एखाद्या मित्राकडून पैसे उधार घेताना आपण त्याला आपली अडचण सांगतो आणि पैसे घेतो. पण, जेव्हा द्यायची वेळ येते तेव्हा मात्र आपण टाळाटाळ करतो. आपल्याक़डे पैसे असतात, त्याला परत द्यायची इच्छाही असते. तरीही आपण ते परत देऊ शकत नाही. असे होण्याला काय कारण असते. याचा कधी विचार केला आहे का. नाही ना, चला मग जाणून घेऊयात पैसे उधार घेण्याबाबतीत ज्योतिष शास्त्रात काय नियम आहेत ते.

शास्त्रानुसार, सूर्यदेवतेला ऋण हरणारा म्हणजेच दु:ख दुर करणारा मानला जातो. सुर्याचा वार रविवार असल्याने त्यादिवशी कर्ज घेऊ नये.ज्योतिष शास्त्रात परिवर्तनशील आरोह (चर लग्न) शुभ मानला जात नाही. या काळात कोणालाही पैसे देणे अथवा घेणे टाळावे. कर्ज घेताना मूल, आद्रा, ज्येष्ठा, विशाखा, कृतिका, ध्रुव स्ग्नक आणि रोहिणी नक्षत्र पाहावे. संक्रांतीच्या दिवशी कर्ज घेऊ नये. या दिवशी घेतलेले कर्ज फेडणे अशक्य होते. वृद्धी योग, द्विपुष्कर योग, त्रिपुष्कर योग यामध्येही कर्ज घेऊ नये.

या दिवशी घेऊ नये कर्ज

ज्योतिष शास्त्रानुसार, आर्थिक व्यवहार करताना आठवड्यातील वारांना अधिक महत्त्व आहे. कर्ज घेण्यापूर्वी दिवस वार लक्षात ठेवावेत. ज्योतिषशास्त्रानुसार, शनिवारी कर्ज घेऊ नये. या दिवशी कर्ज घेतल्याने कर्जाचा अधिक बोजा होतो. शनिवार, मंगळवार आणि रविवारी कर्ज घेऊ नये.

जर तुम्ही आठवड्याच्या या 3 दिवसांत कर्ज घ्याल. तर, कर्जाची परतफेड करण्यात अनेक अडचणी येऊ शकतात. परंतु या दिवशी कर्ज फेड करणे शुभ मानले जाते. कर्जाचा हप्ता भरण्यासाठी मंगळवार हा सर्वात शुभ दिवस मानला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune MPSC Protest: पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पोलिसांचा दणका; ५१ विद्यार्थ्यांसह २९ खासगी शिकवणी चालकांना नोटिसा

नवरा-मुलीचा मृत्यू, समाजाचे टोमणे अन् डोळ्याला दुखापत; तरीही RAS मध्ये मिळवलं मोठं यश.... रोहिणी गुर्जर यांची जिद्दीची कहाणी

Maharashtra Weather : ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम, मात्र काही जिल्ह्यांत पावसाचा येलो अलर्ट; जाणून घ्या IMD चा अंदाज

Maharashtra Water Crisis: राज्यात पाणीकपात लागू! १६ ऑक्टोबरपासून १० टक्के कपात; जाणून घ्या सरकारचे नवे नियम

आजचे राशिभविष्य - 06 सप्टेंबर 2026

SCROLL FOR NEXT