Astro Tips for Money google
संस्कृती

Astro Tips for Money : हे उपाय केल्याने घरात येईल पैसाच पैसा

असे मानले जाते की लसूण तुमच्या सभोवतालची वाईट नजर देखील नष्ट करतो.

नमिता धुरी

मुंबई : आनंदी जीवन कोणाला आवडत नाही ? जीवनात आनंदी राहण्यासाठी प्रत्येकजण कठोर परिश्रम करतो. खरं तर कठोर परिश्रमाशिवाय आपण आयुष्यात कुठेही यश मिळवू शकत नाही. पण तरीही काही ज्योतिषीय उपायांचा अवलंब करून तुम्ही जीवनातील काही समस्यांवर मात करू शकता. त्या उपायांबद्दल जाणून घेऊ या. (Astro Tips for Money)

१. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार घराच्या किंवा कामाच्या ठिकाणी मुख्य दारावर लसूण लावल्याने नकारात्मक शक्तींचा नाश होतो आणि सौभाग्य प्राप्त होते. असे मानले जाते की लसूण तुमच्या सभोवतालची वाईट नजर देखील नष्ट करतो.

२. जर तुमच्या हातात पैसा टिकत नसेल तर 2-3 लसूण पाकळ्या लाल कपड्यात गुंडाळून पर्स किंवा पैशाच्या लॉकरमध्ये ठेवा. दर शनिवारी हा उपाय करा. असे केल्याने पैशांची कमतरता दूर होईल.

3. तुमची तब्येत बिघडत असेल तर तुम्ही स्वयंपाकघरात हळदीसोबत लसणाच्या काही पाकळ्या ठेवाव्यात. असे केल्याने तुमचे आरोग्य सुधारू शकते.

४. जर तुम्हाला घरात पैसे आणायचे असतील, तर तुम्ही लसणाच्या काही पाकळ्या काही सुक्या कच्च्या हळदीच्या मुळाशी आणि काही अख्खा तांदूळ गुंडाळून तुमच्या मनी लॉकरमध्ये किंवा तुम्ही ज्या खोलीत पैसे ठेवता त्या खोलीत लटकवू शकता. असे केल्याने पैसे येऊ लागतील.

५. जर तुमचा व्यवसाय चांगला चालत नसेल आणि सतत तोटा होत असेल तर दुकानाच्या किंवा ऑफिसच्या मुख्य दारात नवीन लाल कपड्यात 5 ते 7 लसणाच्या पाकळ्या बांधून ठेवा. असे केल्याने व्यवसायात भरभराट होते.

६. जर तुमच्या घरात वारंवार भांडणे होत असतील तर लसणाच्या 2 पाकळ्या मोहरी आणि मिरचीसोबत शनिवारी किंवा मंगळवारी संध्याकाळी जाळून टाका. असे केल्याने घरातील वातावरण चांगले राहील आणि कलह व तणावाचे वातावरण संपेल.

७. लाल कपड्यात लसणाच्या 2 पाकळ्या बांधून घराच्या उत्तर दिशेला जमिनीखाली बांधल्यास सुख-समृद्धी आणि ऐश्वर्य वाढू शकते.

८. जर तुम्हाला तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा वाटत असेल तर लसणाच्या कळ्या घराच्या चार कोपऱ्यांमध्ये ठेवाव्यात. दर आठवड्याला ठेवलेल्या लसणाच्या कळ्या बदला. असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा कायमची दूर होईल.

10. ज्या लोकांना रात्री भयानक स्वप्न पडतात, त्यांनी रात्री उशीखाली लसणाच्या 2 पाकळ्या ठेवाव्यात. दुसऱ्या दिवशी सकाळी चौकाचौकात लसूण फेकून द्या. असे केल्याने भयानक स्वप्ने थांबतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: मोदींच्या भाषणानंतर सोनं 1,600 रुपयांनी महाग; चांदी 2 महिन्यांच्या उच्चांकावर; काय आहे ताजा भाव?

रितेश देशमुखने चक्क देव्हाऱ्यात ठेवलीये महाराजांशी संबंधित ती गोष्ट, ऐकून विकी कौशलही झाला भावुक; काय आहे ती वस्तू?

NEET UG 2026 Exam Cancelled: ९ वर्षांत १६ हून अधिक परीक्षा रद्द! २०१७ मध्ये स्थापन झाल्यापासून NTA का अन् कशी अपयशी ठरत आहे?

Leopard Captured : चाकणला मर्सिडीज बेंज कंपनीतील बिबट्या अखेर पिंजऱ्यात जेरबंद

Metro 13 : मिरा-भाईंदर ते वसई-विरार मेट्रो १३ ला प्रतीक्षा मंत्रिमंडळाच्या मान्यतेची

SCROLL FOR NEXT