Astro Tips esakal
संस्कृती

Astro Tips : अंगठी कुठल्या बोटात घालावी? शास्त्रानुसार अंगठी घाला, जीवनात आनंदाचा वर्षाव होईल

कुठल्या बोटात नेमकी चांदीची अंगठी घालावी याबाबत आज आपण जाणून घेऊया.

सकाळ डिजिटल टीम

Astro Tips : अनेक महिलांना आणि पुरुषांना हातात किंवा गळ्यात दागिने घालण्याची हौस असते. सोन्याचे, चांदीचे, प्लॅटिनमचे असे वेगवेगळ्या धातूचे दागिणे परिधान केले जातात. या धातूंपैकी आपण चांदीच्या दागिन्यांविषयी बोलणार आहोत. कुठल्या बोटात नेमकी चांदीची अंगठी घालावी याबाबत आज आपण जाणून घेऊया.

पुराणात असे म्हटले आहे की चांदी धातूची निर्मिती भोलेनाथांच्या डोळ्यांतून झाली आहे. म्हणून ती परिधान केल्याने बरेच फायदे होतात. जिथे चांदी असेल तिथे वैभव मोठ्या प्रमाणावर वास करते. ज्योतिष्यांच्या मते, चांदी हा नऊ ग्रहांपैकी शुक्र आणि चंद्र यांच्याशी जोडलेला धातू आहे. चांदीचे शरीराला आरोग्यदायी फायदे देखील आहे.

चांदीची अंगठी कोणत्या बोटात घालावी ?

करंगळीमध्ये विधीपूर्वक अंगठी घालावी

कुठल्याही गुरुवारी दिवशी रात्री चांदीची अंगठी पाण्यात घालून ती रात्रभर त्यात ठेवा, दुसऱ्या दिवशी भगवान विष्णूच्या पायाजवळ अंगठी ठेवून त्याची पूजा करा. पूजा करून झाल्यानंतर त्या अंगठीला चंदन लावा, अक्षता चढवून दिवा दाखवून त्याची पूजा करा. त्यानंतर अंगठी उजव्या हाताच्या करंगळीत घालावी.

हातात चांदीची अंगठी परिधान करण्याचे फायदे

चांदीची अंगठी परिधान केल्याने शुक्र व चंद्राचा आपल्यावर प्रभाव राहातो. चेहऱ्याचे सौंदर्य वाढते आणि डाग दूर होतात. चांदीची अंगठी परिधान केल्याने डोक शांत राहाते. त्यामुळे तुमचे रागावरही नियंत्रण राहाते. (Astrology)

संधिवात, कफ, सांधे किंवा हाडे यांच्याशी संबंधित काही समस्या आल्यास चांदीची अंगठी परिणामकारक ठरते.

ज्या लोकांना चांदीची अंगठी आवडत नाही त्यांनी चांदीची चैन करून गळ्यात घालावी. हे शरीरात वात, कफ आणि पित्ताचा समतोल राखते. त्यामुळे कोणत्या ना कोणत्या कारणाने आपण आपल्या जीवनात चांदीचा वापर केला पाहिजे. त्याचे बरेच फायदे तुम्हाला अनुभवायला मिळतील.

डिस्क्लेमर - वरील लेख सामान्य माहितीवर आधारलेला असून सकाळ समुह याची पुष्टी करत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Politics: मतांसाठी उमेदवार घासत आहेत भांडी; पश्‍चिम बंगालमध्‍ये नवा फंडा; सभांपेक्षा मतदारांशी ‘जवळीक’ महत्त्वाची..

Registrar Dairy Department Transferred : रात्रीतून सुत्रे फिरली गोकुळच्या राजकारणाला नवे वळण, थेट दुग्ध विभागाच्या निबंधकांची उचलबांगडी; सभासद नोंदणी वाद भोवला

Vidhan Parishad Election: विधान परिषदेसाठी भाजपमध्ये 'ही' नावे चर्चेत, आमदारकीसाठी 'फिल्डिंग' लावायला सुरुवात, कुणाला मिळणार संधी?

India Petrochemical Duty Exemption : सरकारचा मोठा निर्णय ! ४० प्रमुख पेट्रोकेमिकल्सवरील आयात शुल्कात सूट,'या' उद्योगांना दिलासा

Latest Marathi News Live Update : गौतम अदानी अयोध्येत दाखल

SCROLL FOR NEXT