Astro Tips Esakal
संस्कृती

Astro Tips: राहू दोष तुमचे जीवन कठीण करत आहे का? हे विशेष रत्न धारण करा

कुंडलीत जर राहू दोष असेल तर अशा वेळेस अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

सकाळ डिजिटल टीम

कुंडलीत जर राहू दोष असेल तर अशा वेळेस अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यांपासून मुक्त होण्याचा तसा कोणताही मार्ग नाहीये, पण हा राहुदोष सुटण्यासाठी तुम्ही ह्या रत्नाची अंगठी घालू शकतात. राहू आणि केतू हे ज्योतिष शास्त्रात सर्वात क्रोधित ग्रह मानले जातात. असे म्हटले जाते की, राहु-केतू जर कोणावर रागावले तर त्याचा नाश व्हायला वेळ लागत नाही.  यामुळेच लोक आपल्या कुंडलीतून राहू आणि केतूचे दोष दूर करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतात. 

गोमेद रत्न राहू दोषापासून रक्षण करते.

ज्योतिषशास्त्रानुसार, कुंडलीतील विविध दोष दूर करण्यासाठी प्रत्येक ग्रहासाठी एक विशेष रत्न घालण्याचा सल्ला दिला जातो.  राहू ग्रहासाठी असेच एक खास रत्न म्हणजे गोमेद रत्न. असे म्हटले जाते की जेव्हा कुंडलीत राहूची स्थिती कमकुवत होते, तेव्हा व्यक्तीवर त्याचे दुष्परिणाम होऊ लागतात. त्यामुळे त्याची सर्व कामे खोळंबतात आणि सुरू असलेले काम बिघडते. अशा स्थितीत दोष दूर करण्यासाठी व्यक्तीने गोमेद रत्न धारण करावे. हे रत्न धारण केल्याने कुंडलीत राहूची वक्री कमी होते.

गोमेद रत्न कधी धारण करावे?

ज्योतिषांच्या मते, जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत बुध, शुक्र आणि राहू या ग्रहांचा संयोग असेल तर त्याने यातून सुटका मिळण्यासाठी गोमेद रत्न धारण करावे.  हे धारण केल्याने शुभ परिणाम प्राप्त होतात आणि वाईट परिणाम दूर होतात.

'या' राशीसाठी खूप फायदेशीर

धार्मिक शास्त्रांमध्ये राहू ग्रहाला मकर राशीचा स्वामी मानण्यात आला आहे. अशा परिस्थितीत ज्या लोकांची राशी मकर आहे, त्यांनी आपल्या कुंडलीत राहूची स्थिती मजबूत करण्यासाठी आणि त्याचे वाईट प्रभाव कमी करण्यासाठी गोमेद रत्न धारण करावे. 

'या' व्यवसायातल्या व्यक्ती हे रत्ने घालू शकतात

वकिली किंवा न्यायिक कामात गुंतलेल्यांसाठी गोमेद रत्न धारण करणे शुभ मानले जाते. असे केल्याने त्यांच्या कारकिर्दीची गाडी वेगाने धाव घेते. त्याचबरोबर राजकारणात सक्रिय असलेल्या लोकांनीही गोमेद घालणे फायदेशीर मानले जाते. याशिवाय मिथुन, तूळ, कुंभ किंवा वृषभ राशीच्या लोकांसाठी गोमेद रत्न घालण्याचा सल्ला दिला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुझ सामुद्रधुनी'वरून इराणमध्येच पडले दोन गट; लष्कर आणि सरकारमध्ये बिनसलं, जगावर पुन्हा इंधन संकटाचं सावट

Corruption : बढाईखोर राजा आणि मूर्ख माकडाची लाचकथा; स्टिंग ऑपरेशनने सत्य समोर

Latest Marathi News Update: २०४७ पर्यंतच्या पाणी नियोजनासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार

ODOP: हातमागाची जादू! बाराबंकीचे स्टोल आणि गमछे देश-विदेशात ठरताहेत फॅशन स्टेटमेंट

पाकिस्तानातील गँगस्टर महाराष्ट्रातील तरुणांना कसं जाळ्यात ओढायचे? तपासातून धक्कादायक खुलासा, Modus Operandi समोर...

SCROLL FOR NEXT