Astro Tips sakal
संस्कृती

Astro Tips : यंदाच्या दिवाळीत माता लक्ष्मी प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाहीत?; हे उपाय करा!

दिवाळीला माता लक्ष्मी घराघरात प्रवेश करते. तिचे समाधान झाले तर ती त्या घरात राहते

सकाळ वृत्तसेवा

दिवाळीला माता लक्ष्मी घराघरात प्रवेश करते. तिचे समाधान झाले तर ती त्या घरात राहते

पूणे : प्रत्येकालाच आयुष्यात कधी ना कधी आर्थिक अडचणींचा सामना करावाच लागतो. त्यामुळे असे लोक दिवाळीची आतूरतेने वाट पाहच असतात. लोकांना काही जास्त करायला जमले नाही तरी माता लक्ष्मी घरात यावी यासाठी ते दिवाळीला पूजा करतात.

दिवाळीला माता लक्ष्मी घराघरात प्रवेश करते. तिचे समाधान झाले तर ती त्या घरात राहते. त्यामुळे दिवाळीच्या आधी लोक घर, स्वच्छ करून रंगवून घेतात. ज्यामुळे लक्ष्मीची कृपा आपल्यावर कायम राहील, या भावनेने लोक पूजा करतात.

मातेला प्रसन्न करण्यासाठी केवळ पूजा करून चालणार नाही. देवी लक्ष्मीच्या कृपेने सुख-समृद्धी मिळवायची असेल तर शास्त्राशी संबंधित काही उपाय करावेत. जर तुमच्यावर माता लक्ष्मीची कृपा असेल तर तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासणार नाही. देवी लक्ष्मीला प्रसन्न कसे करायचे याचे काही उपाय जाणून घेऊया.

हे उपाय देतील धनलाभ

शास्त्रात शंखाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे दिवाळीत लक्ष्मीसोबतच शंखाची पूजा करावी. शंख देवी लक्ष्मीशी संबंधित असल्याने पूजनीय आणि शुभ मानले जाते. माता लक्ष्मीच्या पूजेच्या ठिकाणी शंख ठेवून त्याची नियमित पूजा केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते.

लक्ष्मीची कृपा आपल्यावर होऊन आर्थिक संकट दूर होण्यासाठी तुरटीचा तुकडा घेऊन एका भांड्यात ठेवा. हे भांडे कोणाच्याही नजरेस पडणार नाही. अशा ठिकाणी ठेवा. यामुळे निश्चितच आर्थिक अडचणी दूर होतील.

दिवाळीत किंवा इतरवेळी रोज सकाळी घराचे दरवाजे आणि खिडक्या उघड्या ठेवा. सकाळच्या वेळी सकारात्मक उर्जा घरात येते. त्यामुळे घरातील वातावरणही शांत वाटते. या उपायाने घरातील व्यक्तींना धनलाभ होतो.

जर तूमच्या देवघरात देवी अन्नपूर्णेची मूर्ती नसेल. तर, नरक चतूर्थी दिवशी तिची स्थापना करणे भाग्यकारक ठरेल. तिची रोज पूजा करावी. ज्याच्या घरात देवी अन्नपूर्णा आहे त्यांच्या घरात कशाचीही कमी नसते.

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणताही गोष्टींचे समर्थन करत नाही. उपाय करण्यापूर्वी ज्योतिष्य तज्ञ्जांचा सल्ला आवश्यक घ्यावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT