astro tips  esakal
संस्कृती

Astro Tips : नखं कापण्याबद्दल ही गोष्ट माहित आहे का? या दिवशी नखं कापल्याने होईल फायदा

नखं कापताना लोकांमध्ये दिवसाबाबत संभ्रमावस्था

सकाळ वृत्तसेवा

नखं स्वच्छ ठेवणे, ते वेळेवर कापणे फार महत्वाचे आहे. शरीराची स्वच्छता आपल्याला अनेक आजारांपासून दूर ठेवते. बाकीच्या भागांबरोबरच नखं कापून स्वच्छ ठेवण्याचाही सल्ला दिला जातो. मात्र, नखं कापताना लोकांमध्ये दिवसाबाबत संभ्रमावस्था आहे. बरेच लोक त्यांच्या सुट्टीच्या दिवशी नखं कापतात, परंतु वडिधाऱ्यांच्या मते, दिवसानुसार नखं कापणे हे शुभ आणि अशुभ यांचे लक्षण आहे. अशा वेळी कोणत्या दिवशी नखे कापल्याने फायदा किंवा तोटा होतो हे जाणून घेणे आवश्यक आहे.

सोमवार

शरीराचा संबंध मनाशी असतो.शरीराची क्रिया मनावरच चालते.सोमवार हा मनाचा कारक मानला जातो.अशा परिस्थितीत सोमवारी कोणी नखं कापली तर त्याची संकटांपासुम सुटका होण्यास मदत होते.

मंगळवार

अनेकजण मंगळवारी नखं कापणे टाळतात.मात्र या दिवशी नखं कापल्याने कर्जमुक्ती होण्यास मदत होते.

बुधवार

या दिवशी नखं कापल्याने धनप्राप्ती होण्याची शक्यता वाढते.बुधवारी नखं कापल्यास नोकरीत बुद्धिमत्तेद्वारे धनप्राप्ती होते.

गुरुवार

गुरु हा आध्यात्मिक ग्रह म्हणून ओळखला जातो. तो उपासना आणि अध्यात्माची प्रेरणा देतो. या दिवशी नखं कापल्यास सत्त्वगुणांची वाढ होते.

शुक्रवार

शुक्र प्रेम आणि कलाशी संबंधित आहे. शुक्रवारी नखं कापल्याने जवळचे मित्र किंवा कुटुंबीयांना भेटण्याची संधी मिळते. यासाठी तुम्हाला लांबचा प्रवास करावा लागू शकतो.

शनिवार

शनिवारी लोक नखं कापत नाहीत, परंतु या दिवशी नखं कापणे टाळावे. यामुळे मन कमकुवत होते आणि मानसिक समस्या उद्भवू शकतात.

रविवार

रविवारी सुट्ट्यांमुळे लोक नखे कापतात. तथापि, या दिवशी नखं चावणे टाळावे, कारण यामुळे रविवारचा दिवस वाया जाऊ शकतो ,कोणतेही काम होत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray Full Speech : मराठी, मुंबई, महाराष्ट्र अन् बाळासाहेब ठाकरेंचा किस्सा : राज ठाकरेंचं 25 मिनिटांचं प्रचंड आक्रमक भाषण

Raj Thackeray : ''ठाकरेंची मुलं इंग्रजी मिडियम शिकतात'' म्हणणाऱ्या फडणवीसांना राज ठाकरेंनी सुनावलं; म्हणाले, ''मी हिब्रूत शिकेन पण...''

Latest Maharashtra News Updates : लाडक्या बहिणीचं पोर्टल बंद, आता नव्याने नोंदणी होणार नाही - ठाकरे

Raj Thackeray: ''कानाखाली द्या पण व्हिडीओ काढू नका'' केडिया प्रकरणावर राज ठाकरेंनी मनसैनिकांना कोणता संदेश दिला?

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

SCROLL FOR NEXT