Peepal Tree Benefits sakal
संस्कृती

Astro Tips For Marriage : खुप प्रयत्न करुनही लग्न जुळत नाही? पिंपळाचं झाड करू शकते मदत, जाणून घ्या कसं?

जर लग्न कार्यात अडी अडचणी येत असेल तर पिंपळाचं वृक्ष तुमची मदत करू शकते.

सकाळ डिजिटल टीम

Astro Tips For Marriage : पौराणिक काळापासून पिंपळाच्या झाडाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हिंदू ग्रंथामध्ये पिंपळाच्या झाडाला देव वृक्ष म्हटले जाते. असं म्हणतात पिंपळाच्या झाडावर ब्रह्मा, विष्णु आणि महेश निवास करतात. यासोबतच पिंपळाच्या झाडावर शनि देवाचाही वास असतो.

ब्रह्म पुराणच्या एका प्रसंगात सांगितल्याप्रमाणे शनिदेव स्वयं म्हणतात की शनिवारच्या दिवशी जे व्यक्ति नियमित पिंपळाच्या झाडाची पुजा करणार त्यांना कार्यसिद्धी होणार आणि त्यांचे कष्ट दूर होणार. पण तुम्हाला माहिती आहे का जर लग्न कार्यात अडी अडचणी येत असेल तर पिंपळाचं वृक्ष तुमची मदत करू शकते. जाणून घ्या कसं? (Astro Tips For Marriage peepal tree help to get rid of all problems of marriage read story)

शनिवारी एका कलश मध्ये दूध आणि थोडे तीळ पिंपळाच्या झाडाला अर्पण केले आणि ऊँ नमो भगतवे वासुदेवाए नम: हा जाप केला तर तुमच्या आयुष्यात सुख समृद्धीसह विवाहात येणाऱ्या अडचणी दूर होतील.

प्रत्येक शनिवारी स्नान केल्यानंतर पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे. यासोबतच सरसोचे तेलाने दिवा लावावा आणि पिंपळाच्या झाडाला पाच प्रदक्षिणा मारावी. यामुळे शनिदोष दूर होते आणि विवाहाचे योग जुळून येतात.

शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला गुळ आणि दूध एकत्र करुन अर्पण करावे यामुळे तुमच्या सर्व मनोकामना पुर्ण होतात आणि त्यानंतर पिंपळाच्या झाडाला स्पर्श करत परिक्रमा करावी.

शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला दोन्ही हातांनी स्पर्श करत 108 वेळा 'ऊँ नम: शिवाय' मंत्राचा जाप करावा. अशात कुंडलीतील ग्रह दोष दूर होतात आणि लग्नाचा योग जुळून येतो.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : दोन दिवसांत निर्णय घ्या, नाहीतर पाणीत्याग... जरांगेंचा निर्धार! मुसळधार पावसामुळे मुंबईत मराठा आंदोलकांचे हाल

Latest Marathi News Updates : जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्या मोर्चा; सकल मराठा समाज, मराठी भाषकांतर्फे आयोजन

Chandrashekhar Bawankule: काँग्रेसने केला ओबीसींवर अन्याय : बावनकुळे; महायुती सरकारनेच मराठा समाजाला दिला न्याय

Nagpur Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण, युवकाचा मृत्यू; एका आरोपीला जलालखेडा पोलिसांकडून अटक

Weekend Breakfast Recipe: वीकेंडला बनवा खास, सकाळी नाश्त्यात आस्वाद घ्या बीट ओट्स थालीपीठचा

SCROLL FOR NEXT