teeth sakal
संस्कृती

Astro Tips: दातांची अशी ठेवण असलेले लोकं असतात खूप नशीबवान; नेहमी आनंदी राहतात

हत्तीच्या बाबतीत असे म्हटले जाते की त्याचे खाण्याचे आणि दाखवण्याचे दात वेगळे असतात, ते दाखवणारे दात मौल्यवान असतात.

सकाळ डिजिटल टीम

जसे कुंडली बघून, हात बघून, चेहरा बघून, तसच एखाद्याचे दात बघूनही अनेकदा काही तर्क लावले जातात. एखाद्या व्यक्तीचे दात त्याची ठेवण सांगते की तो व्यक्ती नक्की कसा आहे. कोणत्या प्रकारच्या दातांमागे कोणते रहस्य लपलेले आहे? हत्तीच्या बाबतीत असे म्हटले जाते की त्याचे खाण्याचे आणि दाखवण्याचे दात वेगळे असतात, ते दाखवणारे दात मौल्यवान असतात. माणसांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर त्यांचे दात फक्त खाण्यासाठीच उपयोगाचे नाहीत तर त्यावरून त्याची परिस्थिती देखील कळते. 

अशा महिला भाग्यवान असतात..

ज्या महिलांचे दात टोकदार, सरळ आणि पांढरे आणि एकमेकांत मिसळलेले असतात, त्या भाग्यवान असतात.

१६ वर आणि १६ खाली आणि दुधासारखे पांढरे दात असलेल्या महिला पतीला अधिक प्रिय असतात.

अगदी लहान दात असलेल्या महिलांचे जीवन वेदनादायक असते.

ज्या महिलांच्या खालच्या जबड्यात जास्त दात असतात, त्यांना आईचे सुख मिळत नाही.

उग्र आणि वाकड्या दात असलेल्या स्त्रियांचे वैवाहिक जीवन तणावपूर्ण असू शकते.

पांढर्‍या हिरड्या असलेल्या महिला कुशाग्र असतात, त्या आपल्या स्वार्थासाठी कूटनीतीचा अवलंबही करू शकतात.

जर वेगवेगळे दात असतील आणि त्यांच्यामध्ये काही अंतर असेल तर अशा महिला श्रीमंत असतात.

दातावर दात असलेल्या महिला घराचे नेतृत्व करतात आणि कुटुंबात त्यांचे स्थान खूप महत्वाचे आहे.

गुळगुळीत, चिकट आणि पांढरे दात असलेल्या स्त्रियांना राजेशाही सुख मिळते.

मोठे दात असलेल्या पुरुषांमध्ये ही गोष्ट असते.

मोठे दात असलेल्या पुरुषांकडे भरपूर पैसा असतो.

ज्याचे दात सरळ रेषेत उंच आणि गुळगुळीत असतात, तो श्रीमंत असतो.

ज्यांचे दात आतील बाजूस झुकलेले असतात त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो.

काळे आणि खडबडीत दात असलेल्या लोकांचे जीवन दुःखी असते.

३२ दात असलेले पुरुष खूप भाग्यवान असतात ते आयुष्याचा आनंद लुटतात.

ज्यांना एकूण ३० दात असतात ते श्रीमंत असतात पण ३० पेक्षा कमी दात असलेले लोक जीवनात अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते.  

ज्या लोकांचे दात पडण्याची गती हळू असते ते दीर्घकाळ जगतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jantar Mantar Protest: 'जंतर-मंतर'चा इतिहास काय? आंदोलनाचं ठिकाण कधीपासून बनलं, त्यापूर्वी काय व्हायचं; आता तीन पर्याय कोणते?

Shivsena UBT Leader Resign: ठाकरे गटाला मोठा धक्का! बड्या नेत्यानं तडकाफडकी दिला राजीनामा

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींसह INDIA आघाडीचे ८ नेते सुप्रीम कोर्टाच्या दिशेने रवाना; याचिका दाखल करणार

सर, मला अन् मित्राला वडा पाव हवाय; शाळकरी मुलाची विनंती, तुकाराम मुंढे काय म्हणाले ऐका... Video Viral

Yashasvi Jaiswal ला यष्टिरक्षण का करावसं वाटतंय? हे भलतंय खूळ डोक्यात येण्याचं कारण, घ्या जाणून...

SCROLL FOR NEXT