lizards Esakal
संस्कृती

Astro Tips: घरात पाल पडल्याने होतात 'या' 7 शुभ आणि अशुभ गोष्टी..

एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावर किंवा उजव्या हातावर पाल पडली तर मान-सन्मान मिळण्याची शक्यता असते.

सकाळ डिजिटल टीम

भविष्यातील संभाव्य घटनांची जाणीव करून देण्यासाठी निसर्गाने अनेक माध्यमे निर्माण केली आहेत, असे मानले जाते. पशु-पक्षी आणि प्राणी हे देखील त्या माध्यमांपैकी एक आहेत.

पशु-पक्षी, प्राणीही अनेक गोष्टींमधून आपल्याला भविष्यातील घडामोडींचे संकेत देतात. सध्या अशा गोष्टींवर पूर्णपणे विश्वास ठेवला जात नाही, परंतु शगुन शास्त्रामध्ये पशु-पक्षी इत्यादींकडून प्राप्त होणाऱ्या संकेतांचे वर्णन स्पष्टपणे आढळते. प्रत्येकाच्या घरात आढळणारी पाल देखील भविष्यातील अनेक घटनांबद्दल संकेत देते, असे मानले जाते. तुम्हाला फक्त ते संकेत समजून घेण्याची गरज आहे. 

पाल भविष्या काय घटना घडू शकतात यांचे संकेत देते चला तर मग बघू या याविषयीची सविस्तर माहिती या लेखाच्या माध्यमातून..

1 )पाल एखाद्या व्यक्तीच्या उजव्या बाजूवर पडून डाव्या बाजूने खाली उतरली तर पदोन्नती, धनलाभ होण्याची शक्यता असते.

2) एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावर किंवा उजव्या हातावर पाल पडली तर मान-सन्मान मिळण्याची शक्यता असते.

3) जर ती डाव्या हातावर पडली तर धनहानी होऊ शकते. 

4) नवीन घरात प्रवेश करताना घरमालकाला पाल मेलेली आणि माती लागलेली दिसली तर त्यात राहणारे लोक आजारी पडू शकतात. हा अपशकुन टाळण्यासाठी नियमानुसार पूजा करूनच नवीन घरात प्रवेश करावा.

5) जर पाल आवाज करताना दिसली तर आपल्या आपला एखाद्या जुन्या मित्र भेटू शकतो. सहवासानंतर पाल विभक्त होताना दिसली तर प्रिय व्यक्तीपासून विभक्त होण्याचे दुःख तुम्हाला सहन करावे लागेल.

6) पाल भांडताना दिसली तर ओळखीच्या व्यक्तीशी भांडण होण्याची शक्यता असते.

7) शकुन शास्त्रानुसार समजा तुम्हाला दिवसा जेवताना जर पाल चुकचुकण्याचा आवाज ऐकू आला तर लवकरच तुम्हाला काही शुभवार्ता मिळू नाही तर शुभ घटना घडू शकतात. मात्र, असं फार दुर्मिळ आहे, कारण पाल बहुतेकदा रात्री आवाज करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : ‘गोकुळ’च्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस

Poonam Shinde Death : कोल्हापुरात खराब रस्त्याने घेतला कर्त्या महिलेचा जीव; मोपेड घसरून पडल्यानंतर डंपरच्या चाकाखाली चिरडले डोके, मुलगी जखमी

IND vs JPN, T20I: भारत-जपानमधील ऐतिहासिक क्रिकेट सामन्यावर पडणार पावसाचं पाणी? नव्या ठिकाणी खेळण्यास टीम इंडिया सज्ज

Kerala Rain: केरळममध्ये पावसाचा हाहाकार; सहा जण वाहून गेले, पाच जणांचे मृतदेह सापडले

Pandharpur Murder: ५५ वर्षीय प्रेयसीने केला ७० वर्षीय प्रियकराचा खून; पंढरपुरातील खळबळजनक घटना; दीड महिन्यानंतर उलगडले खुनाचे रहस्य

SCROLL FOR NEXT