astro tips  esakal
संस्कृती

Astro Tips : मुलं अभ्यास करत नाहीत; स्टडीरूममध्ये करा हे बदल

पालक आणि शिक्षक यांच्या सततच्या त्रासाला कंटाळून मुल नकारात्मक होतात

सकाळ वृत्तसेवा

पुणे : काही मुले अधिक मेहनत न करता परीक्षेत चांगल्या प्रकारे यश संपादन करतात. तर, काही मुले नेहमीच अभ्यास करतात परंतु परीक्षांमध्ये ते चांगल्या मार्कांनी पास होत नाहीत. यासाठी पालक मुलांना जबाबदार धरतात.मुलांना वेगवेगळ्या क्लासला घालून त्यांची गुणवत्ता सुघारण्याचा प्रयत्न केला जातो. पण, मुळात घरातच नकारात्मक उर्जा असेल तर त्याचा परिणाम मुलांवर आणि त्यांच्या अभ्यासावर होतो.

वास्तुशास्त्र तज्ञांच्या मते, आपल्या घरातील सकारात्मक-नकारात्मक उर्जा मुलाच्या शिक्षणाच्या बाबतीत मोठी भूमिका बजावते. या उर्जेचा मुलांच्या शरीर आणि मनावर अधिक प्रभाव पडतो. घराची वास्तु त्यांचे भविष्य घडविण्याकरिता उपयोगी ठरते.

वास्तुतील दोषांकडे लक्ष न दिल्याने मुलं अभ्यासापासून दुर पळतात. नेहमीच कारणे देऊन अभ्यास टाळतात. यामुळे पालक आणि शिक्षक यांच्या सततच्या त्रासाला कंटाळून मुल नकारात्मक होतात. यामुळेच मुलांच्या स्टडीरूममध्ये केलेले काही बदल मुलांची अभ्यासातील रूची वाढवतात. मुलांच्या अभ्यासाच्या रूमबद्द्ल वास्तूशास्त्रातील नियम काय सांगतात, याबद्दल जाणून घेऊयात...

कोणत्या दिशेला असावे स्टडी टेबल

स्टडीरुममध्ये असलेले अभ्यासाच्या टेबलचे तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे. मुलांच्या अभ्यासाच्या टेबलवर जास्त पुस्तके ठेवू नका. तुम्ही पुस्तकांसाठी वॉर्डरोब किंवा शेल्फ बनवू शकता. वॉर्डरोबची जागा ईशान्य किंवा पूर्वेला असावी हे लक्षात ठेवा.

या गोष्टी आजच बदला

स्टडी टेबलावर पूर्वेकडे तोंड करून देवी सरस्वतीचे चित्र ठेवा.तसेच स्टडी टेबलवर क्रिस्टलचा ग्लोब देखील ठेवा. शूज आणि चप्पल स्टडी रूममध्ये ठेवू नयेत.स्टडीरूमच्या पुर्व, उत्तर किंवा दक्षिण दिशेला मेणबत्ती लावल्याने मुलाचे मन अभ्यासात गुंतून राहते. त्यांची बौद्धिक क्षमता वाढते. स्टडी टेबल समोर आरसा लावू नका. त्यामुळे मुलांचे लक्ष विचलित होते.

मुलांना नवीन गोष्टी आवडतात.त्यामुळेच मुले त्यांच्या जुन्या खेळण्यांशी कमी खेळतात. एखादे नवीन खेळणे त्यांच्याकडे येताच ते मोठ्या आवडीने त्याच्याशी खेळू लागतात. मुलाच्या अभ्यासाच्या खोलीत बदल करून त्याचे मन पुन्हा अभ्यासात गुंतते, त्यामुळेच मुलांच्या स्ट़डीरूममध्ये बदल करणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat: ७५ वर्षांसंबंधीचं 'ते' विधान भागवतांनी नेमकं का केलं? संघाकडून स्पष्टीकरण, विरोधकांचा मोदींवर रोख

Manchar News : काय सांगता! वृद्ध महिलेचे घरच गेले ‘चोरीला’; न्यायासाठी धावपळ सुरू

Latest Marathi News Updates : चौथ्या दिवशीही शक्तीपीठाची मोजणी शेतकऱ्यांनी रोखली, पोलिसांसोबत वाद

Palghar News: वसई-विरारमध्ये नालासोपाऱ्यात अमली पदार्थांचा पर्दाफाश, 12 आरोपी अटक

IND vs ENG 3rd Test: 'चेंडू'वरून रामायण! शुभमन गिलचं वाद घालणं चुकीचं नव्हतं; अम्पायरने काय केले, ते वाचाच...

SCROLL FOR NEXT