astrology news  esakal
संस्कृती

Astrology Jyotish Upaay: वाईट स्वप्नामुळे झोप येत नाही? ज्योतिष शास्त्रातले हे उपाय करा

रात्री झोपण्यापूर्वी हनुमान चालिसाचा पाठ करूनच झोपावे

सकाळ वृत्तसेवा

ज्योतिष टिप्स: रात्री झोपताना अनेकांना वाईट आणि भितीदायक स्वप्ने पडतात. ह्या स्वप्नांनी काहींना इतका त्रास होतो की परत झोपण्याचीही भीती वाटते. ज्योतिष शास्त्रात या समस्येवर उपाय सांगितला आहे.

सर्वात महत्वाचे

१. उत्तर आणि पश्चिमेकडे डोके ठेवून झोपू नका.

२. रात्री झोपण्यापूर्वी हात पाय धुवा

३. वाईट स्वप्नांपासून मुक्ती मिळवण्यासाठी तीन मोराची पिसे डोक्याजवळ ठेवा.

भीतीदायक स्वप्नांसाठी ज्योतिष उपाय:

रात्री झोपताना अनेकांना स्वप्न पडतात. जे नैसर्गिक आहे. ही स्वप्ने चांगली आणि वाईट दोन्ही असू शकतात. पण रात्री झोपताना व्यक्तीला नेहमी वाईट आणि भीतीदायक स्वप्ने पडत असतील तर ती चिंतेची बाब आहे. यामुळे व्यक्ती घाबरते आणि त्याला जाग येते. शास्त्रानुसार झोपेत स्वप्ने येण्याची अनेक कारणे आहेत. ही स्वप्ने भविष्यातील घटना दर्शवतात.

परंतु वाईट आणि भयानक स्वप्ने पाहिल्यानंतर, व्यक्ती इतकी घाबरते की त्याला झोप येत नाही आणि यामुळे तो तणावग्रस्त होतो. यापासून मुक्ती मिळवण्यासाठी ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत. या उपायांबद्दल जाणून घ्या.

हे उपाय तुम्हाला वाईट स्वप्नांपासून मुक्त करतील

जर तुम्हाला रात्री भयानक स्वप्न पडत असतील आणि या त्रासामुळे झोपेच्या आधी हातपाय धुवावेत. नंतर एका आसनात बसून या मंत्राचा १०८ वेळा जप करा.

"वर्णस्य दक्षिणे तु कुक्कुटो नाम वै द्विज:। तस्य स्मरण दुःस्वप्नः सुखदो भवेत् ।"

छोट्याशा तुरटीमध्ये मोठ्या समस्यांचे समाधान दडलेले असते. रात्री भयानक स्वप्न पडत असल्यास झोपताना काळ्या कपड्यात थोडी तुरटी टाकून बांधून घ्या. ते तुमच्या डोक्याजवळ किंवा पलंगाखाली ठेवा. यामुळे भीतीदायक स्वप्ने पडत नाहीत.

काही लोकांच्या मनात भीती असते आणि ते विनाकारण अज्ञात भीतीने त्रस्त असतात. अशा लोकांना रात्री झोपतानाही भयानक स्वप्न पडतात. अशा व्यक्तीने रोज सकाळी हनुमानजींची पूजा करावी आणि पूजेमध्ये हनुमान चालिसाचा पाठ करावा. रात्री झोपण्यापूर्वी हनुमान चालिसाचा पाठ करूनच झोपावे.ज्योतिषशास्त्रानुसार झोपण्यापूर्वी तीन मोराची पिसे डोक्याखाली ठेवा. अशाने वाईट स्वप्न पडत नाहीत.वाईट आणि भयानक स्वप्नांमुळे, व्यक्ती घाबरते आणि यामुळे झोपेमध्ये व्यत्यय येतो. जर तुम्हाला शांत झोप हवी असेल तर वास्तुनुसार उत्तर आणि पश्चिमेकडे डोके ठेवून झोपू नये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT