Astrology news  esakal
संस्कृती

Astrology: का करत नाहीत घरी पिंपळाच्या झाडाची लागवड? जाणून घ्या जोतिष टिप्स

पिंपळाच्या झाडाला पवित्र आणि आदरणीय झाडाचे स्थान

सकाळ वृत्तसेवा

हिंदू धर्मात पिंपळाचे झाड महत्त्वपूर्ण मानले जाते. त्याला एक आदरणीय स्थान आहे. धार्मिक श्रद्धेनुसार, देवता पिंपळाच्या झाडावर राहतात. परंतु असे असूनही, घरी पिंपळाचे झाड लावणे अशुभ मानले जाते. पिंपळाचे झाड घरात लावू नये असे बऱ्याचदा तुम्ही ऐकले असेल. यामुळे घरात बर्‍याच समस्या येतात. फक्त मोठी माणसेच नव्हे तर ज्योतिष आणि वास्तुशास्त्रानुसार पिंपळाचे झाड घरात लावू नये. पण, पिंपळाची पूजा करणे खूप शुभ मानले जाते. पिंपळाच्या झाडाला पवित्र आणि आदरणीय झाडाचे स्थान आहे.

पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याचे फायदे:

१. व्यक्तीला मोक्षाची प्राप्ती होते.

२. झाडाजवळ दिवा लावला आणि पाणी दिले तर भगवान शनिदेवांचे आशीर्वाद मिळतात.

पुराणामध्ये पिंपळाच्या झाडाबद्दल बरेच धार्मिक महत्त्व सांगितले गेले आहे. परंतु तरीही ते घरी लावणे अशुभ मानले जाते.

का लावू नये घरी पिंपळाचे झाड:

ज्योतिषशास्त्राच्या मते, पिंपळाच्या झाडापासून घरी अशुभपणाचा वास वाढतो, त्या घरातल्या माणसांची प्रगती खुंटते, घरात वाईटाचे सावट येते, सतत समस्या उद्भवतात.

जर घरी पिंपळाचे झाड असेल तर काय करावे

घरी कधीही स्वतःहून झाड लावू नये पण नैसर्गिकरीत्या घरी ते उगवले तर ते कापू नये, ते मुळासह उपटून मंदिरात किंवा धार्मिक ठिकाणी ठेवावे, आणि ह्या झाडाची नेहमी पूजा करावी.पिंपळाच्या झाडाला कोणत्याही प्रकारचा दोष किंवा अशुभ प्रभाव नाही. तुळशी आणि केळीसारख्या पिंपळाच्या झाडाचेही धार्मिक महत्त्व हिंदू धर्मात मोठे आहे, पिंपळाचे झाड हे एक पूजनीय वनस्पती आहे. पिंपळाच्या झाडाला विश्व वृक्ष, चैत्य वृक्ष आणि वासुदेव म्हणूनही ओळखले जाते. असा विश्वास आहे की पिंपळाच्या झाडाचा प्रत्येक भाग अगदी पानांमध्येही देवता राहतात. जो माणूस पिंपळाच्या झाडाची नियमितपणे पूजा करतो, त्याला पाणी देतो आणि धूप लावतो, त्याला देवतांबरोबर पित्रांचाही आशीर्वाद मिळतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT