Hindu Rituals
Hindu Rituals esakal
संस्कृती

Hindu Rituals : सासरी निघालेल्या मुलीला चुकूनही देऊ नका 'या' भेट वस्तू, संसाराला लागेल ग्रहण

सकाळ डिजिटल टीम

Auspicious Gift for Bride In Marathi : मुलीचा संसार कायम सुख-समृद्धीने भरलेला, कशाचीच कमी पडू नये असं प्रत्येक माता-पित्याला वाटत असतं. त्यासाठी ते आपल्या मुलीला यथाशक्ती वस्तू भेट देत असतात. मुलगी सासरी निघताना तिला काही भेट वस्तू दिल्या जातात. ही परंपरा फार जूनी आहे. प्रत्येक धर्मानुसार या वस्तू बदलत असतात. शक्य त्या सर्व शुभ वस्तू ते मुलीला यावेळी देतात.

पण शास्त्रात काही अशुभ भेटवस्तूंविषयीही सांगितले आहे. आज आपण त्या वस्तू कोणत्या हे जाणून घेऊया.

पाठवणी करताना या वस्तू मुलीला देऊ नका

लोणचं - मुलीची पाठवणी करताना तिला गोड पदार्थांबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ दिले जातात. त्यात लोणचं कधीही देऊ नये. यामुळे त्या नववधूच्या संसारिक जिवनात अडचणी आणू शकते. त्यामुळे लोणचं न देणेच योग्य ठरते.

झाडू - बऱ्याचदा आई-वडिल मुलीच्या प्रत्येक सुखाची, सोयीची काळजी घ्यायची म्हणून घरात लागणाऱ्या बारीकसारीक वस्तूंपासून मोठमोठ्या वस्तूंपर्यंत सर्व देतात. अशात चुकूनही पाठवणीच्या वेळी मुलीला झाडू देऊ नका. किंवा साफसफाई संदर्भातली कोणतीही वस्तू देऊ नये. यामुळे तिच्या आयुष्यात दुःख कोसळू शकतं.

सूई किंवा तशा टोकदार वस्तू - मुलीला संसार देताना किचनमधल्या वस्तूही दिल्या जातात. यात सूई, चाकू, सुरी, कात्री अशा टोकदार वस्तू कधीही देऊ नये. असं मानलं जातं की, हे केल्याने त्यांच्या वैवाहिक आयुष्यात कटूता येते.

चाळणी - अशीच एक वस्तू म्हणजे पीठ चाळायची चाळणी. ही चाळणी चुकूनही देऊ नये. फक्त पाठवणीच्याच वेळी नाही तर विवाहित मुलीला चाळणी कधीही भेट देऊ नये.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT