Bhanu Saptami 2023 esakal
संस्कृती

Bhanu Saptami 2023 : आज भानुसप्तमी, या विशेष पूजेने मिळते त्वचा रोगांपासून मुक्ती

भानु सप्तमीला सूर्य उपासनेला विशेष महत्व आहे.

धनश्री भावसार-बगाडे

Puja Vidhi And Mantra : पंचांगानुसार प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सप्तमीला भानु सप्तमी असते. जून महिन्याची ही सप्तमी आज २५ जून ला आहे. आज सूर्य उपासनेला विशेष महत्व असते. धार्मिक मान्यता आहेत की, भानुसप्तमीला सूर्याच्या उपासनेने उत्पन्न, आयुष्य, सुख आणि समृद्धी यात वृद्धी होते. त्यामुळे विधीवत सूर्य देवाची उपासना करायला हवी. या भानुसप्तमीलाच अचला सप्तमी, सूर्यरथ सप्तमी, आरोग्य सप्तमीसुद्धा म्हटलं जातं.

पूजा विधी

  • पहाटे उठून पहिले सूर्यदेवाला नमस्कार करावा.

  • आंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकून आंघोळ करावी.

  • नंतर सूर्याला पाण्यात अक्षता, तिळ, मोहरी आणि दूर्वा घालून ते अर्पण करावे.

  • त्यानंतर ‘ॐ घृणि सूर्याय नमः' और “ॐ सूर्याय नमः” हा मंत्र म्हणत सूर्याला आवाहन करावे.

  • पंचोपचार करून सूर्याची पूजा करावी.

  • सूर्य चालिसा, स्तुती, स्तोत्र आणि सूर्य कवच याचे वाचन करावे.

  • आरती करून सुख, समृद्धीची प्रार्थना करावी.

  • यथा शक्ती गरीब, गरजूंना दान करावे.

  • इच्छापूर्तीसाठी उपवास धरावा.

धार्मिक महत्व

हिंदू धर्मात रविवार सूर्याला समर्पित असतो. या दिवशी सूर्याची विशेष पूजा उपासना केली जाते. त्वचा रोगांपासून मुक्तीसाठी सूर्य उपासना सांगण्यात येते. पुराणात असे सांगितले जाते की, श्रीकृष्णाच्या मुलाने सूर्य उपासना केली होती, ज्याचे फळ म्हणून साम्बची कुष्ठ रोगातून मुक्तता झाली. ज्योतिष्य देखील कुडलीतील सूर्य मजबूत करण्याचा सल्ला देतात. यामुळे करिअर आणि व्यवसायात इच्छित वृद्धी होते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२० लाखांचं पॅकेज, वर्क फ्रॉम; IT इंजिनिअरने आईला का संपवलं?

Pune Nashik Highway: पिंपळवंडीत तरुणाला मारहाण; कुकडी नदीच्या पुलावरून पडून २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Ujani Dam: “उजनी धरणात ११० टीएमसी पाणी, तरी भीमा नदी कोरडी! इंदापूरमध्ये पाणीटंचाईचे संकट”

माधुरी दीक्षितने डॉक्टर असलेल्या नेनेंसोबत लग्न का केलं? सोनाली बेंद्रेसमोर सांगितलं खरं कारण; म्हणाली- मी अशा माणसाशी लग्न केलंत जो...

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील वातावरण तापलं! इंडिया आघाडीच्या मोर्चाला सुरूवात, सर्वोच्च न्यायालयात दाखल करणार याचिका

SCROLL FOR NEXT