Bhaubeej Diwali 2022 Esakal
संस्कृती

Bhaubeej Diwali 2022 : यंदा कधी आहे भाऊबीज?

भाऊबीजेला हिंदीत भाईदूज असं म्हणतात. 

सकाळ डिजिटल टीम

भाऊबीज हा सण कार्तिक शुद्ध द्वितीया (यमद्वितीया) या दिवशी असतो. हा दिवाळीतला चौथा आणि शेवटचा दिवस असतो. भाऊबीज  हा बहीण-भावाच्या नातेसंबंधाचा धागा दृढ करणारा दिवस. वसुबारसपासून सुरू झालेल्या दिवाळीची भाऊबीजेला सांगता होते. या सणाला हिंदीत भाईदूज असं म्हणतात. 

भाऊ बहिणीच्या गोड नात्याला उजाळा देणारा दिवाळीतला सण म्हणजे भाऊबीज. 

यंदा भाऊबीजेचा सण 26 ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी भाऊ बहिणीच्या घरी जातो. बहीण भावाला ओवाळते आणि भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. त्यानंतर दोघे एकमेकांना भेटवस्तू देतात. 

भाऊबीज सण साजरा का केला जातो काय त्यामागची आख्यायिका?

यमराजाला एक बहीण होती तिचे नाव यमुना होते. तिला यमराज हे प्रेमाने यमे असे म्हणायचे . एके दिवशी ह्या युमुनाने यमराजला सांगितले कि तू माझ्या घरी ये तू माझ्या घरी कधीच येत नाही . त्यामुळे तू मला वचन दे कि तू माझ्या घरी नक्की येशील .

त्यावर यम हा चिंतेत पडला . आणि विचार करू लागला कि मी ज्याच्या घरी जातो त्या घरातील एकाचे प्राण घेऊन येतो. परंतु जर मी यमे च्या घरी गेलो तर तिच्या घरातील एकाचे तरी प्राण मला घ्यावे लागतील . आणि म्हणून मी एवढ्या दिवसा पासून तुझ्या घरी येत नहोतो . पण आता तू मला वचन मागितले. आणि मी हे वचन तुला देतो कि मी नक्की तुझ्या घरी येईल .

यमराज म्हणाले आता मी तुला वचन दिलेय म्हटल्यावर मला यावंच लागेल . तू काळजी नको करुस तू सांगितलेल्या दिवशी मी तुझ्या घरी येतो . त्या नंतर ठरल्या प्रमाणे शेवटी तो दिवस उजाडला . आणि यमराज यमुनेच्या घरी जायला निघाला .

यमुनाने पण भाऊ यम येणार आहे म्हणून पूर्ण घर छान सजवले , दारा बाहेर रांगोळी काढली , दिवे लावले छान रोषणाई केली . तेवढ्यात यमराज हे तिच्या घरी आले आणि त्यांनी यमुनाने केलेली तयारी बघितली . आणि त्यांना सजवलेले घर, दिवे , हे सगळे बघून त्यांचे पण प्रसन्न झाले . आणि ते आनंदी झाले .

त्यानंतर यमुनाने त्यांचा पाहुणचार केला , आणि औक्षण केले. आणि यमराजाने तिच्या ताटात भेट वस्तू दिली . आणि विचारले माग तुला काय आशीर्वाद हवाय.

त्यावर यमुना म्हणाली ह्या दिवशी जी बहीण भावाला ओवळेल त्या भावाला तू अपमृत्यू पासून वाचवशील . त्या भावाचे रक्षण करशील त्याच बरोबर तिच्या घरावरील संकट दूर करशील असा आशीर्वाद यमे ने मागितला आणि तो यमराजाने तिला दिला . आणि यमराजाने स्वतः आशीर्वाद दिल्यामुळे त्यांना तिच्या घरातील एका हि माणसाचे प्राण ही घेता आले नाही .

म्हणून त्या दिवसापासून भाऊबीज सण साजरी करण्याची प्रथा सुरु झाली आणि तो दिवस होता कार्तिक शु २ चा यम द्वितीयेचा . म्हणून हा दिवस भाऊबीज म्हणून साजरी केला जातो .

ह्या दिवशी प्रत्येक बहीण आपल्या भावाला ओवाळते आणि भावाच्या दीर्घ आयुष्य लाभो यासाठी मनापासून प्रार्थना करते . त्याचे आरोग्य चांगले राहो तो आनंदी राहो अशी प्रार्थना देवाकडे करते . अश्या ह्या लाडक्या बहीण भावाच्या नात्याचा सण म्हणजेच भाऊबीज.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI SuryaKant Statement : नवी मुंबई विमानतळ नामकरावरून सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे महत्वपूर्ण वक्तव्य; "धमक्या दिला तर कारवाई"

India Squad vs Afghanistan: नव्या दमाचा कसोटी संघ; वन डे संघातही प्रयोग, रोहित शर्मा, हार्दिक यांचा....

Mumbai News: दादर स्थानक बनणार अधिक सुरक्षित, वेगवान ! ३४ वर्षे जुनी सिग्नल प्रणाली बदलली

Nagpur Truck Accident: विटा घेऊन जाणारा ट्रक पलटी; तीन मजुरांचा जागीच मृत्यू, तीन जखमी

Latest Marathi News Live Update : काँग्रेसमधील अंतर्गत कलहाला कंटाळून सुधाकर भारसाकळे यांचा तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा

SCROLL FOR NEXT