Budh Gochar 2025 sakal
संस्कृती

Budh Gochar 2025 : बुधादित्य योगामुळे 'या' 5 राशींना होणार भरपूर धनलाभ, पाहा तुमची रास आहे का

Which zodiac signs will benefit from Budh Gochar 2025: या गोचरामुळे काही राशींसाठी शुभलाभ तयार होणार आहे. विशेषतः कर्क, कन्या आणि इतर तीन राशींना व्यवसाय, करिअर व आर्थिक पातळीवर सकारात्मक बदल अनुभवायला मिळतील.

Anushka Tapshalkar

5 Rashis to gain wealth from Budh Gochar 2025: बुध ग्रह 2025 मध्ये शुक्राच्या राशीत म्हणजेच वृषभ राशी मध्ये प्रवेश करणार आहे. बुध आणि सूर्य यांची वृषभमध्ये युती होऊन 'बुधादित्य योग' तयार होईल, जो अनेक राशींना विशेष लाभ देणारा ठरेल. हा योग 16 दिवसांपर्यंत राहणार असून त्यानंतर बुध मिथुन राशीत प्रवेश करेल आणि गुरुच्या सोबत युती करेल.

या गोचरामुळे काही राशींसाठी शुभलाभ तयार होणार आहे. विशेषतः कर्क, कन्या आणि इतर तीन राशींना व्यवसाय, करिअर व आर्थिक पातळीवर सकारात्मक बदल अनुभवायला मिळतील.

राशीनुसार बुध गोचराचा प्रभाव

वृषभ

बुध तुमच्या राशीत येत असल्याने उत्पन्नाचे मार्ग वाढतील. व्यवसायात यश मिळेल. सरकारी कामात अडथळे दूर होतील. प्रेमसंबंध दृढ होतील आणि विवाह व संतानप्राप्तीसाठी योग्य काळ आहे.

कर्क

तुमच्यासाठी हा काळ अत्यंत शुभ आहे. नवीन नोकरी किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी उत्तम वेळ. प्रेमसंबंध गोड होतील. कुटुंबाचा पाठिंबा मिळेल. निर्णय योग्य ठरतील आणि धनलाभ होईल.

सिंह

बुध गोचर करिअर व व्यवसायात भर घालेल. पदोन्नती किंवा नवीन संधी मिळतील. परदेशातील नोकरीसाठी अनुकूल वेळ आहे. धार्मिक व आध्यात्मिक प्रवृत्तीत वाढ होईल.

कन्या

बुध गोचर म्हणजे तुमच्यासाठी सुवर्णसंधी. सरकारी टेंडर, योजनांमध्ये यश मिळेल. संतानप्राप्तीचे योग आहेत. प्रेमसंबंध स्थिर होतील आणि प्रेमविवाहासाठी योग्य काळ आहे.

मकर

विद्यार्थ्यांसाठी अत्यंत लाभदायक काळ. प्रेमसंबंध गडद होतील. संतानप्राप्तीच्या दृष्टीने अनुकूल वेळ. समाजात प्रतिष्ठा वाढेल. बंधूंनी मदतीचा हात दिल्यास आश्चर्य वाटू नये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तीन लोकांसाठी पाकिस्तान मागतोय शांततेचा नोबल पुरस्कार, शहबाज शरीफ अन् आसिम मुनीरनंतर तो तिसरा व्यक्ती कोण?

Ambedkar Jayanti: बाबासाहेबांच्या पुतळ्यांवर आता मानाचे 'छत्र'! CM योगींची मोठी घोषणा; राज्यातील आंबेडकर पार्कांचेही होणार सौंदर्यीकरण!

LPG Gas Cylinder : एलपीजी गॅस सिलिंडरधारकांसाठी आनंदाची बातमी ! बुकिंग आणि डिलिव्हरीबाबत सरकारचा महत्त्वाचा निर्णय

आर माधवनने ओसाड रानात फुलवली नारळाची बाग, अनुभव सांगताना म्हणालेला...' प्रवासातील प्रत्येक गोष्ट '

Baramati Bypoll: अभिजीत बिचुकले अन् करुणा मुंडेही बारामतीच्या मैदानात! २३ उमेदवारांमध्ये रंगणार लढत, निवडणूक बिनविरोध नाहीच

SCROLL FOR NEXT