Budh Grah sakal
संस्कृती

Budh Grah: कुंडलीत बुध शुभ असेल तर पैसा टिकून राहील, या संकेतावरून जाणून घ्या बुध ग्रहाची स्थिती

बुध हा ग्रह बुद्धिमत्ता, व्यवसाय, वाणी आणि धनाचा कारक मानला जातो. जेव्हा तुमच्या कुंडलीत बुध ग्रह अशुभ असतो तेव्हा व्यक्तीला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.

सकाळ डिजिटल टीम

Astrology Tips: बुध हा ग्रह बुद्धिमत्ता, व्यवसाय, वाणी आणि धनाचा कारक मानला जातो. जेव्हा तुमच्या कुंडलीत बुध ग्रह अशुभ असतो तेव्हा व्यक्तीला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.

Astrology Tips For Mercury Planet: ज्योतिषशास्त्रात एकूण 9 ग्रहांना तटस्थ ग्रह मानले जाते. बुध ग्रहाबद्दल बोलायचे तर, तो कन्या आणि मिथुन राशीचा ग्रह आहे. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत बुध ग्रह अशुभ असेल तर त्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. याउलट ज्या लोकांच्या कुंडलीत बुध ग्रह बलवान असेल, त्यांना व्यवसाय, शिक्षण, नोकरीमध्ये भरपूर यश मिळते. पण बुध ग्रहाच्या अशुभ प्रभाव येण्यापूर्वीच व्यक्तीला काही संकेत मिळू लागतात.

हे पुर्वसंकेत आधीच ओळखून तुम्ही तुमचे होणारे नुकसान टाळू शकता. चला तर मग आज बघू या बुध ग्रह अशुभ असण्याची नेमके संकेत कोणते असतात आणि त्याला बलवान करण्यासाठी कोणते उपाय करावे याविषयीची सविस्तर माहिती.

बुध ग्रह अशुभ असताना प्रामुख्याने ही चिन्हे दिसुन येतात.

आपल्या उत्पन्नापेक्षा आपल्याकडून जास्त खर्च होणे आणि नंतर मग कर्जात बुडणे, तुमच्या आयुष्यातील या सर्व गोष्टी कुंडलीत बुधाची अशुभ स्थिती दर्शवत असतात.

जर तुम्ही हळूहळू कर्जाच्या ओझ्याखाली दबत असाल तर बुध ग्रह कमकुवत होण्याचे लक्षण आहे.

बुध ग्रहाचाही त्वचेशी संबंध आहे. त्यामुळे तुम्हाला जर का काही त्वचेशी निगडित आजार झाला तर तो तुमच्या

कुंडलीत बुध ग्रहाची अशुभ स्थिती दर्शवत असतो.

ज्या व्यक्तीच्या कुंडलीत बुध ग्रह अशुभ स्थितीत असतो, त्यांची बोलण्याची क्षमताही हळूहळू कमी होऊ लागते. तो आपला मुद्दा नीट कुणासमोर मांडू शकत नाही किंवा आपले मत कुणाला नीट समजून देखील सांगु शकत नाही.

ज्या व्यक्तीच्या कुंडलीत बुध बलवान असतो, त्याला त्याच्या कार्यक्षेत्रात भरपूर यश मिळते. परंतु बुध जेव्हा कमजोर असतो तेव्हा त्याला शिक्षण, नोकरी आणि व्यवसायाशी संबंधित क्षेत्रात खूप मेहनत करूनही यश मिळत नाही

आता बघू या बुध आपल्या कुंडली मजबूत होण्यासाठी कोणते उपाय करावे याविषयीची माहिती...

बुध ग्रहाची देवता गणपती हा मानला जातो. कुंडलीत बुध ग्रह बलवान होण्यासाठी प्रत्येक बुधवारी नियमानुसार गणपतीची पूजा करावी आणि पूजा झाल्यानंतर मनोभावे गणपतीला दुर्वा अर्पण कराव्यात.

कुंडलीत बुध ग्रह अशुभ असताना ज्योतिषी पन्ना रत्न घालण्यास सांगतात.

'ओम बुधाय नमः' या मंत्राचा दररोज १०८ वेळा जप केल्याने बुध ग्रहही बलवान होतो.

हिरवी मूग डाळ, साखर किंवा छोटी वेलची गरीब आणि गरजूंना दान करावी. असे केल्याने बुध आपल्या कुंडली मजबूत होण्यासाठी मदत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Will MS Dhoni Play IPL 2027? महेंद्रसिंग धोनी पुढच्या वर्षी पिवळ्या जर्सीत दिसेल का? ऋतुराज गायकवाडचं उत्तर, नेमकं काय म्हणाला?

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नईचे आव्हान संपुष्टात! गुजरातची Qualifier 1 साठी दावेदारी; आता एका जागेसाठी चार संघांमध्ये स्पर्धा

Abhijeet Dipke: दिल्लीत पोहोचताच पोलीस तिहार जेलमध्ये टाकतील... ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपकेंना भीती सतावतेय

Congress politics : ‘कॉक्रोच जनता पक्ष’ हा असंतोषाचा इशारा; काँग्रेसला नव्याने उभारी देण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे सीबीआय ताब्यात; मुलासाठी प्रश्नपत्रिका खरेदीचा आरोप

SCROLL FOR NEXT