Buri Nazar Upay esakal
संस्कृती

Buri Nazar Upay : तुम्हाला कोणाची दृष्ट तर लागली नाही ना, कसं ओळखाल? जाणून घ्या तज्ज्ञांकडून

दृष्ट लागणं म्हणजे काय, ते खरं असतं का आणि खरं असेल तर उपाय काय, जाणून घेऊया.

धनश्री भावसार-बगाडे

Home Remedies For Evil Eye By Panchangkarte Gaurav Deshpande :

दृष्ट लागणे, नजर लागणे हा शब्द आपण व्यवहारात वावरताना बऱ्याचदा ऐकत असतो. विशेषतः लहानमुलांच्या बाबत याचा वारंवार वापर होताना दिसतो. अमुक यांची नजर लागली म्हणून बाळाने खाणं सोडलं वगैरे किंवा जर कोणतं काम होत नसेल तर त्या कामालाच कोणाची तरी नजर लागली आहे अशा प्रकारचे वाक् प्रचार वापरले जातात.

दृष्ट किंवा नजर खरंच लागते का? दृष्ट लागणे म्हणजे काय असते? आणि जर खरंच नजर लागत असेल तर त्यावर उपाय काय आहेत हे सर्वच आपण जाणून घेऊया.

Buri Nazar Upay

खगोलशास्त्र, ज्योतिषशास्त्र अभ्यासक पंचांगकर्ते गौरव देशपांडे यांनी सांगितले की, दृष्ट लागणे ही संकल्पना फक्त हिंदू संस्कृतीत किंवा भारतातच नाही तर इतर देशांमधील संस्कृतीतही मानली जाते.

दृष्ट लागणे म्हणजे नेमके काय?

आपल्याला माहिती आहे की, जसा आपण विचार करतो तसे परिणाम दिसतात. जर आपण सकारात्मक विचार केला तर त्याचे सकारात्मक परिणाम आपल्याला मिळतात. थोरामोठ्यांचे आशीर्वाद घ्यावे असं का म्हणतात? कारण त्यांच्या शुभ विचारांचे परिणाम आपल्याला सकारात्मक मिळतात.

त्यामुळे जसे शुभ विचारांचे परिणाम शुभ होतात तसे अशुभ विचारांचे परिणामही अशुभ होतात. जर कोणी मत्सराने, द्वेषाने एखाद्या व्यक्तीविषयी विचार केला तर त्या नकारात्मक विचारांचाही परिणाम त्या व्यक्तीला भोगावा लागतो.

Buri Nazar Upay

याचा त्रास कोणाला होतो?

या नकारात्मकतेचा त्रास प्रत्येकच व्यक्तीला होतो असं नाही. जे लोक जास्त सेंसेटिव्ह असतात, किंवा लहान मुलं जे फारसे बहिर्मुख नसतात अशांना हा नजर दोषाचा त्रास जास्त होत असल्याचं दिसून येतं.

दृष्ट कोणाची लागते?

आपण बऱ्याचदा कोणाला तरी दोष देत असतो की, अमुक एका व्यक्तीची दृष्ट लागते. ती व्यक्तीच असा विचार करते, असं म्हटलं जातं. पण ज्या व्यक्तीचं नाव घेतलं जात असतं तिलाच माहित नसतं की, त्याची दृष्ट लागते.

Buri Nazar Upay

ज्योतिष्यशास्त्र काय सांगते?

ज्योतिषशास्त्रात असे काही योग सांगितले आहेत ज्याला विष घटी / विष नाडिका असं म्हटलं आहे. त्या योगावर जर कोणाचा जन्म झाला तर त्या व्यक्तीला जन्मतः असे काही वैशिष्ट्य असते की, जर त्या व्यक्तीने कोणाविषयी नकारात्मक विचार केला तर त्याचे परिणाम भोगावे लागतात.

दृष्ट लागते म्हणजे नेमकं काय होते?

प्रत्येक सजीवाला एक ऑरा म्हणजे वलय असतं. जे विज्ञानही मान्य करते. या ऑरावर दुसऱ्याच्या चिंतनाचा, विचारांचा, सहवासाचा परिणाम होत असतो. असा परिणाम होऊन आपला ऑरा डिस्टर्ब होणे म्हणजेच दृष्ट लागणे.

Buri Nazar Upay

दृष्ट काढणे म्हणजे काय?

हा ऑरा अॅफेक्ट होऊ नये म्हणून जे करतो त्याला दृष्ट काढणे म्हणतात. त्यामुळे जर तुम्ही बघितलं असेल की, घरातली आजी किंवा कोणी थोर मोठे दृष्ट काढतात तेव्हा ते एका विशिष्ट पद्धतीने दृष्ट काढत असतात. ते ज्या पद्धतीने हात फिरवतात त्यात आपला पुर्ण ऑरा कव्हर करणे आवश्यक असते. याला ऑरा प्युरीफिकेशन प्रोसेस म्हणतात.

दृष्ट काढण्याची शास्त्रशुद्ध पद्धत कोणती?

दृष्ट काढण्यासाठी सैंधव मीठ/जाड मीठ, पिवळी मोहरी या दोन गोष्टींमध्ये ऑरा प्युरीफिकेशनचे मोठे सामर्थ्य आहे.

आंघोळ करतानाही जर हे मीठ पाण्यात टाकले तर आपल्याला जास्त फ्रेश वाटते कारण ती ऑरा क्लीनिंग प्रोसेस आहे.

दृष्ट लागली हे कसं ओळखावे?

  • डोकं जड होणे

  • डोकं दुखायला लागणे

  • नकारात्मक विचार वाढणे

  • भूक मंदावणं

  • खूप प्रयत्न करूनही काम होत नाही. अशावेळी आपला ऑरा अॅफेक्ट झालेला असतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Clash: मिरजेत दोन गटात राडा; तणाव नियंत्रणात, स्वतः एसपी उतरले रस्त्यावर

Himachal Pradesh Bus Landslide : हिमाचल प्रदेशातील बिलासपूरमध्ये भीषण दुर्घटना; बसवर दरड कोसळून १८ जणांचा मृत्यू!

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणीची आत्महत्या! वडील महावितरणमध्ये वरिष्ठ अधिकारी; अभ्यासात हुशार, घरची स्थिती चांगली, बहीणही मेडिकललाच, तरी केली उचलले टोकाचे पाऊल

विद्यापीठाच्या युवा महोत्सवात मानपानावरून कुलगुरुंसमवेत वाद; स्टेजवर बोलावून मानमान न दिल्याने अधिसभा व व्यवस्थापन परिषदेचे सदस्य सत्कार न स्विकारताच परतले

मोठी ब्रेकिंग! सोलापुरातील समर्थ सहकारी बॅंकेच्या व्यवहारावर ‘आरबीआय’चे निर्बंध; काय आहेत निर्बंध, वाचा...

SCROLL FOR NEXT