Pitru Paksha sakal
संस्कृती

Pitru Paksha 2024: पितृ पक्षाला सुरवात; श्राद्ध केल्यामुळे मिळतो माता-पिता, पूर्वजांचा आशीर्वाद

Pitru Paksha 2024: गेली चार दिवसांपासून पितृ पक्षाला सुरवात झाली आहे. या काळात भक्तिभावानुसार केलेल्या श्राद्धामुळे पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो.

सकाळ वृत्तसेवा

दीपक जोशी

Pitru Paksha 2024: गेली चार दिवसांपासून पितृ पक्षाला सुरवात झाली आहे. या काळात भक्तिभावानुसार केलेल्या श्राद्धामुळे पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो. त्यांच्या आत्म्याला शांती मिळत असल्याचे शास्त्र सागते. आप्तेष्टांचे निधन ज्या दिवशी झाले, त्याच तिथीला या पंधरा दिवसांत श्राद्ध करावे. मात्र, ज्याचे अजून वर्षश्राद्ध झालेले नाही, अशा व्यक्तीचे श्राद्ध शनिवारी (ता.२१) भरणी श्राद्ध करण्यात आले, तसेच अविधवा नवमी बुधवारी (ता. २५) करता येईल, याला अविधवा नवमी असेही म्हणतात. या दिवशी सुवासिनींना जेवण द्यावे, असे बाळासाहेब जोशी गुरुजी (गुरुधानोरा) लिंबेजळगावकर यांनी सांगितले.

बाळासाहेब जोशी गुरुजी म्हणाले, ज्या तिथीला आप्तेष्टांचे निधन झाले असेल त्याच तिथीला भाद्रपद पौर्णिमा (ता. १८) ते सर्वपित्री अमावास्या दोन ऑक्टोबर याकाळात त्यांचे श्राद्ध करावे. जर वरील पंधरवड्यात श्राद्ध करता आले नाही, तर मात्र ते सर्वपित्री अमावास्येला श्राद्ध करता येते. काही अडचणींमुळे योग्य तिथीवर श्राद्ध करणे शक्य नसेल तेव्हा अशा सर्वांनी सूर्य वृश्चिक राशीत जाईपर्यंत कोणत्याही योग्य तिथीला श्राद्ध करता येते. पितृदोष टाळण्यासाठी श्राद्ध करायलाच हवे, असा सल्ला ज्योतिषाचार्य दीपक जोशी यांनी दिला. २८ सप्टेंबरला श्राद्ध व माहालय नसल्याचे ज्योतिष अभ्यासक अशोककाका कुलकर्णी यांनी सांगितले. २९ तारखेच्या द्वादशीच्या दिवशी म्हणजे द्वादशीला मागील सर्व १२ दिवसांत राहिलेले श्राद्धाचे महालय घालता येत असल्याचे मनोज गुरुजी यांनी सांगितले.

या आहेत महालय तारखा

१८ ते २० यादरम्यान पौर्णिमा ते चतुर्थी श्राद्ध झाले.

पौर्णिमेच्या मंगळवारी (ता.१७) तिथीचे महालय १७ तारखेला न करता २१, २४, २९ सप्टेंबर व २ ऑक्टोबर या तिथीला करता येत असल्याचे वेदांताचार्य अभिजित कुलकर्णी यांनी सांगितले.

२८ सप्टेंबरला श्राद्ध नाही

२२ तारखेला पंचमी व षष्ठी एकत्र तिथी आहे. यामुळे दोन्ही तिथींचे श्राद्ध रविवारी करता येते. २३ तारखेला सप्तमी आहे. २४ तारखेला कालाष्टमी असली तरी याच दिवशी अष्टमीचे श्राद्ध करण्याचा उल्लेख दाते पंचागाने केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा,प्रकरण काय?

India Selection Committee: रोहित शर्माचा जवळचा मित्र घेणार अजित आगरकरची जागा? गुवाहाटीतील मिटिंगमधील अनुपस्थितीने चर्चेला उधाण

मुलाचं Instagram अकाउंट पालकांना थेट पाहता येतं का? Metaचे नियम काय?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावा लागणार का?

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

SCROLL FOR NEXT