Career Vastu Tips google
संस्कृती

Career tips : करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी करा हे ७ उपाय

काही सोप्या वास्तू उपायांच्या साहाय्याने घरातील वास्तुदोष दूर करून तुम्ही यश मिळवू शकता.

नमिता धुरी

Career Vastu Tips : आजच्या युगात आपण ज्या क्षेत्रात करिअर करतो, त्यात खडतर आव्हाने आणि स्पर्धा असतात. यामध्ये अनेकांना मेहनत करूनही यश मिळत नाही. केवळ काही लोकच त्यांच्या करिअरमध्ये यशस्वी होऊ शकतात. प्रत्येकाला आपल्या करिअरमध्ये यश मिळवायचे असते. काही सोप्या वास्तू उपायांच्या साहाय्याने घरातील वास्तुदोष दूर करून तुम्ही यश मिळवू शकता.

१. हिंदू धर्मात केळीच्या रोपाला वास्तुशास्त्रातही खूप महत्त्व दिले गेले आहे. घराच्या मुख्य दरवाजाजवळ केळीचे रोप लावल्यास करिअरमधील अडचणी दूर होतात. काम सोपे होते, मेहनतीचे योग्य फळ मिळते. कामाला प्रतिष्ठा मिळते.

२. तुमचा काम करण्याचा लॅपटॉप आणि स्मार्टफोन कामाच्या ठिकाणी आग्नेय दिशेला ठेवा. इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी हे योग्य ठिकाण आहे.

३. कामाला बसताना पाय दुमडून बसू नका. ज्या खुर्चीवर बसून तुम्ही काम करणार आहात त्या खुर्चीचा मागचा भाग उंच असावा. करिअरमधील प्रगतीसाठी या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत.

४. यशासाठी आत्मविश्वास आवश्यक आहे. तुमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी तुम्ही घराच्या पूर्व दिशेला किंवा कामाच्या ठिकाणी पूर्व दिशेला धातूचा सिंह ठेवू शकता. सिंह हे धैर्य आणि आत्मविश्वासाचे प्रतीक मानले जाते. पितळी सिंह असेल तर उत्तम.

५. काम करताना तुमचा चेहरा पूर्व किंवा उत्तर दिशेला असावा. कामात यश आणि प्रगतीसाठी हे शुभ मानले जाते.

६. ऊर्जेशिवाय तुम्ही कोणतेही काम करू शकत नाही. करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी तुमच्यासाठी चांगली ऊर्जाही महत्त्वाची आहे. यासाठी तुम्ही तुमच्या टेबलावर क्वार्ट्ज क्रिस्टल ठेवू शकता.

७. कुठेही काम करत असताना खुर्चीच्या मागे भिंत असेल तर चांगले आहे, पण त्यामध्ये दरवाजा किंवा खिडकी नसावी.

(सूचना : या लेखात दिलेल्या सूचना आणि माहिती सामान्य गृहितकांवर आधारित आहे. आम्ही त्याची पुष्टी करत नाही. त्यांची अंमलबजावणी करण्यापूर्वी कृपया संबंधित तज्ज्ञांशी संपर्क साधावा.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET ते TET... 2024 मध्येच कायदा आला, तरी पेपरफुटी थांबली नाही; सरकारकडे उत्तर आहे का? नवीन कायदा कशासाठी? Fact Explained...

Gokul Politics : गोकुळ दूध संघात नवा ट्विस्ट! 'त्या' सहानुभूतीवरून शौमिका महाडिक यांच्यावर 410 सभासदांचा घणाघात; कोल्हापूरच्या राजकारणात नक्की काय घडतंय?

Latest Marathi News Live Update : शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी लोकसभेत विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी

Rojgar sangam Portal: कंपन्या थेट प्रोफाइल पाहून करणार शॉर्टलिस्ट; १० वी पास ते पदवीधरांना एका क्लिकवर मिळणार सरकारी नोकरी

Abhijit Dipake Arrest Claim : आज रात्री आम्हाला अटक होणार... अभिजीत दिपके यांचा मोठा दावा; तिसरी चूक करु नका, सरकारला थेट इशारा

SCROLL FOR NEXT