Aachary Chanakya  esakal
संस्कृती

Chanakya Niti: 'या' गोष्टींना चुकूनही लाथ मारू नका; अन्यथा आयुष्यातील आनंद निघून जाईल!

आचार्य चाणक्य यांनी नीतिशास्त्रातील एका श्लोकात सांगितले आहे की, काही गोष्टींना पाय लावणं म्हणजे लाथ मारणे अशुभ ठरतं.

सकाळ डिजिटल टीम

Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांनी अनेक दैनंदिन बाबींचा उलगडा आपल्या नीतिशास्त्रात केला आहे. आजही त्यांनी मांडलेली मतं तंतोतंत लागू होतात. त्यामुळे आचार्य चाणक्य यांच्या नीतिशास्त्रातील गोष्टींवर लोकांचा विश्वास बसतो. आचार्य चाणक्य यांनी जीवनात शांतता आणि यशस्वी जीवनाबाबतही उलगडा केला आहे. आचार्य चाणक्य यांनी नीतिशास्त्रातील एका श्लोकात सांगितले आहे की, काही गोष्टींना पाय लावणं म्हणजे लाथ मारणे अशुभ ठरतं. या गोष्टींना लाथ मारल्यामुळे माणसाचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते. जीवनातील सुख-शांती नष्ट होते. चला तर मग आज समजून घेऊ या, कोणत्या आहेत त्या गोष्टी ज्याला आयुष्यात कधीच लाथ मारू नये.

● घरातील मुली:

हिंदू धर्मात घरातील मुलींना देवीचे रूप मानले जाते. मुलीला लाथ मारणे म्हणजे देवीला लाथ मारण्यासारखे आहे. मुलीला चुकून पाय किंवा लाथ लागली तर तिची माफी मागावी. असं न केल्यास तुमच्या आयुष्यात अडचणी येऊ शकतात.

● अग्नी:

आचार्य चाणक्य म्हणतात की, आगीवर पाय ठेवणे अशुभ आहे. शुभ कार्यात अग्नीची पूजा केली जाते. अनेक पूजाविधींमध्ये अग्नीला साक्षी ठेवलं जातं. अशा स्थितीत अग्नीवर पाय ठेवल्याने अशुभ परिणाम मिळतात.

● वृद्ध व्यक्ती:

ज्येष्ठांचा कायम आदर केला पाहिजे, असं सांगितलं जातं. चरणस्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा. त्यांना चुकूनही पाय किंवा लाथ मारू नये. त्यांना पाय लावल्याने मोठे पाप लागते, असं बोललं जातं. ज्या घरात वडीलधाऱ्यांचा आदर केला जात नाही, त्या घरात सुख-समृद्धी येत नाही. अशा घरात माता लक्ष्मीही वास करत नाही आणि रागावून निघून जाते.

● गाय:

गायीला हिंदू धर्मात पूजनीय स्थान आहे. अशा स्थितीत गायीला पाय किंवा लाथ मारल्याने मनुष्याला पाप लागतं. म्हणून गाय घराबाहेर तुमच्या अंगणात आल्यावर तिला हाकलून देऊ नका, तिला भाकर द्या आणि गायीच्या पाठीला स्पर्श करून आशीर्वाद घ्या.

गुरू:

धार्मिक ग्रंथांमध्ये गुरूला आई-वडिलांपेक्षा वरचे स्थान दिले आहे, अशा स्थितीत गुरूंचा अनादर हा ईश्वराचा अनादर मानला जातो. चाणक्याच्या मते, गुरुंचा नेहमी आदर केला पाहिजे. त्यांचे चरण स्पर्श करून आशीर्वाद घ्यावा. कोणत्याही शुभ कार्यापूर्वी गुरुंचा आशीर्वाद घेतल्याने व्यक्तीला प्रत्येक कार्यात यश मिळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT