chandra grahan 2022 esakal
संस्कृती

Chandra Grahan 2023 : वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण उद्या, या मंत्रांचा जप करा; दोष अन् रोगराई दूर होईल

वर्षातील पहिले चंद्रग्रहण शुक्रवार, 5 मे रोजी रात्री 08:46 वाजता सुरू होईल आणि रात्री 01:02 वाजता ग्रहण समाप्त होईल

सकाळ डिजिटल टीम

Chandra Grahan 2023 : वर्षातील पहिले चंद्रग्रहण उद्या म्हणजेच ५ मे रोजी, वैशाख महिन्याच्या पौर्णिमेला, बुद्ध पौर्णिमेच्या वर्षातील पहिले चंद्रग्रहण लागणार आहे. मात्र, हे ग्रहण नसून उपसावली आहे. जरी आपल्याला भारतात ते बघायला मिळणार नसले तरी ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून ते खूप खास मानले जाते. वर्षातील पहिले चंद्रग्रहण शुक्रवार, 5 मे रोजी रात्री 08:46 वाजता सुरू होईल आणि रात्री 01:02 वाजता ग्रहण समाप्त होईल.

चंद्रग्रहणाची पौराणिक कथा तुम्हाला माहितीये काय?

चंद्रग्रहण नेहमी पौर्णिमेलाच होते. पौराणिक कथेनुसार, जेव्हा राहू-केतू पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला गिळण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्याला चंद्रग्रहण म्हणतात. ग्रहणाच्या ९ तास आधी सुतक कालावधी सुरू होतो. जे धार्मिक आणि ज्योतिषाच्या दृष्टीकोनातून अशुभ मानले जाते. म्हणूनच चंद्रग्रहणाच्या काळात काही कामे करण्यास मनाई आहे. पण काही कामे अशी आहेत, जी केल्याने या काळात तुम्हाला ग्रह दोषांपासून मुक्ती मिळते. (Chandra Grahan)

चंद्रग्रहणाच्या वेळी या मंत्रांचा जप करा

- ॐ श्रीं ह्रीं क्लीं श्री सिद्ध लक्ष्म्यै नम: 

हा वैभव लक्ष्मीचा मंत्र आहे, या मंत्राचा १०८ वेळा जप केल्यास मां लक्ष्मीची कृपा व्यक्तीवर राहते.

- ॐ ह्रीं बगलामुखी सर्व दुष्टानाम वाचं मुखम पदम् स्तम्भय,

चंद्रग्रहणाच्या वेळी बागलमुखी मातेच्या मंत्राचा जप करू शकता. असे केल्याने शत्रूपासून मुक्ती मिळते. (Astrology)

- चंद्रग्रहणाच्या वेळी धार्मिक मंत्रांचा जास्तीत जास्त जप करा आणि देवाचे स्मरण करा. तुम्ही गायत्री मंत्र, महामृत्युंजय मंत्र किंवा इतर मंत्रांचा जप करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

Latest Marathi News Live Update : कंत्राटदाराने जीवन संपवल्याने सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

SCROLL FOR NEXT