Chaturmas 2024 esakal
संस्कृती

Chaturmas 2024 : चातुर्मास म्हणजे काय, तो कधी सुरू होणार? 'या' काळात काय करावे अन् काय करू नये? घ्या जाणून

Chaturmas 2024 : चातुर्मासामध्ये भगवान विष्णू निद्रासनात जातात. या दिवसांमध्ये त्यांची पूजा, आराधना करणे अतिशय शुभ मानले जाते.

Monika Lonkar –Kumbhar

Chaturmas 2024 : हिंदू पंचागानुसार, वर्षभरातील सर्व एकादशींपैकी आषाढी एकादशी ही सर्वात मोठी आणि महत्वाची एकादशी मानली जाते. आषाढ महिना हा अतिशय शुभ अन् पवित्र मानला जातो. आषाढी एकादशीपासूनच पवित्र असा चातुर्मास सुरू होता. चातुर्मासामध्ये भगवान विष्णू निद्रासनात जातात. या दिवसांमध्ये त्यांची पूजा, आराधना करणे अतिशय शुभ मानले जाते.

परंतु, हा चातुर्मास सुरू झाल्यानंतर कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. कारण, या काळात भगवान विष्णू आणि इतर देव झोपी जातात, अशी धार्मिक मान्यता आहे. या काळात कोणतेही शुभ कार्य जरी होत नसले तरी, नामजप, ध्यान, पठण, आणि आत्मनिरीक्षणासाठी हा काळ खूप चांगला मानला जातो.

या शिवाय, चातुर्मासात दान करण्याचेही विशेष असे महत्व आहे. हा चातुर्मास म्हणजे नक्की काय? हा चातुर्मास कधी समाप्त होईल आणि या काळात काय करावे अन् करू नये? त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

यंदा चातुर्मास कधीपासून सुरू होणार?

यंदा चातुर्मास आजपासून अर्थात आषाढी एकादशीपासून (१७ जुलै) सुरू होणार असून तो १२ नोव्हेंबर (मंगळवार) २०२४ पर्यंत असणार आहे. या तब्बल ११८ दिवसांच्या काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. या चातुर्मासाचा प्रारंभ आषाढी एकादशीपासून सुरू होतो आणि कार्तिकी एकादशीला (देवउठणी एकादशीला) संपतो.

चातुर्मास म्हणजे नक्की काय?

हिंदू पंचांगानुसार चातुर्मास हा चार महिन्यांचा कालावधी आहे. या काळात भगवान विष्णू आषाढी एकादशीपासून ते कार्तिकी एकादशीपर्यंत म्हणजे तब्बल चार महिन्यांच्या काळात निद्रासनात जातात. ते क्षीरसागरात योगनिद्रा करण्यासाठी जातात आणि या काळात संपूर्ण विश्वाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी ही भगवान शंकराकडे सोपवतात. थोडक्यात सांगायाचे झाल्यास, चातुर्मास हा भगवान विष्णूंचा निद्राकाळ आहे.

चातुर्मासाचे महत्व काय?

चातुर्मासामध्ये भगवान विष्णू संपूर्ण जगाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी भगवान शंकरावर सोपवून योगनिद्रेमध्ये जातात. त्यामुळे, चातुर्मासात येणाऱ्या श्रावण महिन्यात भगवान शंकरांची पूजा अर्चना केली जाते. हा श्रावण महिना भगवान शंकरांना अतिशय प्रिय मानला जातो. असे म्हटले जाते की, जो भक्त या महिन्यात खऱ्या मनाने भगवान शंकरांची आणि विष्णूंची पूजा करतो, त्याच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात.

चातुर्मासाचे नियम काय आहेत?

चातुर्मासात काय करावे आणि करू नये? असा प्रश्न अनेकांना पडतो. खरे तर चातुर्मासात सकाळी लवकर उठून सूर्यदेवाची पूजा करावी, असे सांगितले जाते. तसेच, या चार महिन्यांमध्ये सात्विक अन्नाचे सेवन करावे.

तसेच, या काळात जास्तीत जास्त दान करावे. कारण, या दिवसांमध्ये दान करणे हे अतिशय शुभ मानले जाते. शिवाय, या काळात दही, लोणची, हिरव्या भाज्या आणि मुळा खाणे टाळावे. चातुर्मासात गृहस्थापना, विवाह इत्यादी शुभ कार्ये करू नयेत.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Political: सत्तेचा नवा अध्याय, की महायुती?; सातारा जिल्हा परिषदेवर भाजपने दावा केल्याने वाढली रंगत; कोण कोणासोबत, याची उत्सुकता!

Latest Marathi News Update : मुंबई पालिकेच्या दुसऱ्या सभेत विरोधी नगरसेवक आक्रमक

Brain Activity After Death : मृत्यूनंतर ऐकू येतात 'हे' भयानक शब्द, डॉक्टरांच्या संशोधनात थक्क करणारी माहिती समोर

नव्या मालिकेची नवी सुरुवात! 'लक्ष्मीनिवास' फेम अभिनेत्री साकारतेय मुख्य भूमिका; सोबतीला आहेत हे कलाकार; प्रोमो व्हायरल

तुमचे आई-वडील कोण हे आम्हीच ठरवायचं का? SIR प्रकरणी याचिकेवर CJI सूर्यकांत यांची नाराजी

SCROLL FOR NEXT