Moon Eclipse Sakal
संस्कृती

Chandra Grahan 2023 : देशातलं पहिलंच ग्रहण कसं व कधी पाहाल? जाणून घ्या...

हे चंद्रग्रहण छायाकल्प प्रकारातलं आहे. हा प्रकार नक्की काय? जाणून घ्या...

वैष्णवी कारंजकर

या महिन्यांत होणारं चंद्रग्रहण छायाकल्प प्रकारचं आहे. उद्या म्हणजेच शुक्रवारी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी आशिया खंडामध्ये हे चंद्रग्रहण दिसणार आहे. याविषयीची सविस्तर माहिती जाणून घ्या. भारतातून दिसणारं हे या वर्षीचं पहिलंच चंद्रग्रहण आहे.

छायाकल्प चंद्रग्रहण म्हणजे काय?

या ग्रहणामध्ये चंद्र पृथ्वीच्या उपछायेतून जात असतो. त्यामुळे चंद्र किंचित अंधुक होतो. म्हणून त्याला छायाकल्प असं म्हणतात. या ग्रहणात चंद्राचा प्रवास पृथ्वीच्या दाट छायेतून न होता विरळ छायेतून होतो. यामुळे नेहमी डोळ्याने दिसू शकणारे ग्रहणाचे आविष्कार न दिसता चंद्राचे तेज काहीसे कमी झालेले दिसते. सूर्यप्रकाशामुळे पृथ्वीची शंक्वाकृती सावली अंतराळात पडलेली असते.

या सावलीचा मध्यभाग हा दाट छायेचा व भोवतालचा भाग विरळ छायेचा किंवा उपछायेचा असतो. चंद्र पृथ्वीच्या दाट छायेऐवजी विरळ छायेतून गेल्यास छायाकल्प किंवा मांद्य प्रकारचे ग्रहण घडते. या ग्रहणात चंद्राचे तेज किंचितसे कमी झालेले दिसते.

छायाकल्प चंद्रग्रहण कधी व कुठून दिसेल?

शुक्रवारी रात्री ८.४४ वाजता चंद्र पृथ्वीच्या विरळ छायेत शिरून ग्रहण सुरू होईल. जवळजवळ ४ तास १८ मिनिटांनी म्हणजे ६ मे रोजी पहाटे १.०१ वाजता चंद्र पृथ्वीच्या उपछायेतून बाहेर पडून ग्रहण सुटेल. हे ग्रहण अंटार्क्टिका, आशिया, रशिया व आफ्रिकेतून दिसेल. ग्रहण काळात जेथे आकाशात चंद्र दिसत असेल तेथील सर्व भागात ग्रहण दिसेल. पृथ्वीवरील जवळजवळ ५७ टक्के लोकांना हे ग्रहण दिसू शकेल.

चंद्रग्रहण कसे पाहावे?

या चंद्रग्रहणात चंद्र पूर्ण दिसतो, पण त्याचं तेज ४ ते ५ टक्क्यांनी कमी होतं. थोडासा काळपट दिसतो. नियमित निरीक्षण न करणाऱ्यांना कदाचित हा फरक कळणार नाही. पण आकाश ढगाळ नसेल, तर साध्या डोळ्यांनीही हे ग्रहण दिसेल. दुर्बिणीने पाहिल्यास उत्तम.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana Installment : लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट; जुलै महिन्याचा निधी जमा, असा चेक करा पेमेंट स्टेटस

MPSC Recruitment 2026 : MPSC चा मोठा निर्णय! औषध निरीक्षक भरती प्रक्रिया रद्द; पोलिसांच्या चौकशीनंतर फेरपरीक्षेची घोषणा, उमेदवारांना पुन्हा द्यावी लागणार परीक्षा!

Gajanan Devkate: सरकारच्या थकीत बिलांचा बळी, कार्यालयांचे उंबरठे झिजवले पण...; देवकातेंचा हृदयद्रावक अंत, सरकारविरोधात कंत्राटदारांचा संताप

Latest Marathi News Live Update : नाना पटोलेंचा सवाल; RSSवर गंभीर आरोप

Asaduddin Owaisi: आमचा धर्म ठरवणारे न्यायाधीश कोण?; हिजाबच्या निर्णयावर ओवैसी आक्रमक , उच्च न्यायालयाच्या निर्णयावर टीका

SCROLL FOR NEXT