vastu tips for curtain at home  
संस्कृती

Vastu Tips : घरामध्ये कोणत्या दिशेला कोणत्या रंगाचा पडदा लावावा?, काय सांगते वास्तूशास्त्र

घराला रंगरंगोटी करताना रंगांची निवड अत्यंत काळजीपूर्वक केली जाते.

सकाळ डिजिटल टीम

वास्तुशास्त्रात केवळ योग्य दिशांचे महत्त्व सांगितले नाही तर घराच्या भिंती आणि पडद्यांच्या रंगांचेही महत्त्व सांगितले आहे. वास्तुशास्त्रानुसार, घरातील किचन, बेडरूम आणि पूजाघराला जितके महत्त्व आहे, तितकेच घरातील पडद्यांच्या रंगांनाही आहे. या रंगांचा आपल्या जीवनावर प्रभाव पडत असतो. त्यामुळे घराला रंगरंगोटी करताना रंगांची निवड अत्यंत काळजीपूर्वक केली जाते. (vastu tips for curtain at home)

वास्तुशास्त्रातही या रंगांबद्दल सांगण्यात आले आहे. याशिवाय घरातील पडदे, चादरी, उशा आणि बेड कव्हर हेही भिंतींच्या रंगानुसार असावेत असे वास्तुशास्त्रात सांगण्यात आले आहे. यासंदर्भातील अधिकची माहिती एका वास्तु सल्लागार यांनी दिली आहे. त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार घरी कोणते पडदे लावावेत हे आपण आज पाहणार आहोत..

दक्षिण दिशा

घरातील पडदे आणि त्यांचा रंग आपल्या अनेक समस्या दूर करू शकतो असे वास्तुशास्त्राचे मत आहे. त्यामुळे आपल्या घरातील दिशांनुसार पडद्यांचा रंग निवडला पाहिजे. जर कुटुंबात वाद होत असेल किंवा घरातील लोकांमध्ये आपसात दुरावा निर्माण होत असेल तर अशा परिस्थितीत व्यक्तीने घराच्या दक्षिण दिशेला लाल रंगाचे पडदे लावावेत. असे मानले जाते की लाल पडद्याचा वापर केल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम वाढते आणि घरात शांतता येते.

उत्तर दिशा

शास्त्रानुसार, घराच्या पडद्यांचा रंग निवडल्यास व्यक्ती आर्थिक संकटातूनही मुक्त होऊ शकते. जर एखाद्या व्यक्तीची आर्थिक स्थिती चांगली नसेल तर त्या व्यक्तीने घराच्या उत्तर दिशेला निळे पडदे लावावेत. वास्तुशास्त्रानुलार असे केल्यास त्या घरातील सदस्य कर्जमुक्त होतो आणि घरात पैसा येऊ लागतो. निळा रंग समृद्धी आणि आरामाचा रंग मानला जातो.

पश्चिम दिशा

अनेकांना मेहनत करूनही कष्टाचे योग्य फळ मिळत नाही. जर तुमच्यासोबतही असे होत असेल तर तुम्ही तुमच्या घराच्या पश्चिम दिशेला पांढरे पडदे लावा. यामुळे तुम्हाला मेहनतीचे योग्य ते फळ मिळेल, असा वास्तुशास्त्राचा विश्वास आहे. पांढरा रंग हा शांतीचे प्रतिक असणारा रंग मानला जातो. याशिवाय जर तुमची बेडरूम वायव्य किंवा पश्चिम दिशेला असेल तर तुम्ही तुमच्या बेडरूमच्या खिडक्या किंवा दारांवर क्रीम किंवा पांढरे पडदे वापरू शकता.

पूर्व दिशा

वास्तुशास्त्रानुसार, अनेक लोक नोकरीच्या शोधात भटकत राहतात, परंतु त्यांना त्यात यश मिळत नाही. जर एखाद्या व्यक्तीसोबत असे होत असेल तर त्याने घराच्या पूर्व दिशेला हिरव्या रंगाचे पडदे लावावेत. हिरवा रंग वाढीचे आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते. वास्तुशास्त्रासोबतच हा रंग ज्योतिषशास्त्रातही शुभ मानला जातो. घरामध्ये या रंगाचे पडदे वापरल्याने घरातील वातावरण प्रसन्न राहते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US reduces tariff for India : मोठी बातमी! अमेरिकेने भारतावरील टॅरीफ कमी केला; ट्रम्प यांची घोषणा

Manipur Government Formation : भाजपकडून मणिपूरमध्ये सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग!, 'NDA'चे सर्व आमदार दिल्लीत दाखल

Apple Valentine Offer : ‘अ‍ॅपल’ने लाँच केली ‘व्हॅलेंटाईन डे’ स्पेशल फेस्टिव्ह कॅशबॅक ऑफर!

Rohit Shetty Firing Case : रोहित शेट्टीच्या घरावर गोळी झाडणारा अकोल्याचा; बिश्नोई टोळीच्या शुभम लोणकरने सोशल मीडियावर स्वीकारली जबाबदारी

Mohol Leopard News : मोहोळ शहरा नजीक आढळलेले बिबट्या सदृश्य प्राणी हे बिबटे नसून मार्जर कुळातील रान मांजर वनविभागाचा निर्वाळा

SCROLL FOR NEXT