panchang google
संस्कृती

Panchang 1st august : या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.१२:४२ ते दु.०१:५८ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

नमिता धुरी

सूर्यसिद्धांतीय देशपांडे दैनिक पंचांग १ ॲागस्ट २०२२

पंचांगकर्ते : ’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडे

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक १ ॲागस्ट २०२२

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक श्रावण १० शके १९४४

सूर्योदय ०६:१४ वाजता होईल, सूर्यास्त -१९:०६ वाजता होईल. चंद्रोदय - ०९:०३ वाजता तर प्रात: संध्या - स.०५:०८ ते स.०६:१४ वाजता आणि सायं संध्या -  १९:०६ ते २०:१३ वाजता होईल. अपराण्हकाळ - १३:५७ ते १६:३२, प्रदोषकाळ - १९:०६ ते २१:१८, निशीथ काळ - २४:१८ ते २५:०२, राहु काळ - ०७:५२ ते ०९:२८, यमघंट काळ - ११:०५ ते १२:४१ या वेळेत असतील. श्राद्धतिथी  चतुर्थी श्राद्ध असेल.

सर्व कामांसाठी दु.०२:०७ प.शुभ दिवस आहे. कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.१२:४२ ते दु.०१:५८ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. या दिवशी मुळा खाऊ नये. या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.

लाभदायक

  • लाभ मुहूर्त - १५:५३ ते १७:३०

  • अमृत मुहूर्त-- १७:३० ते १९:०६

  • विजय मुहूर्त— १४:५३ ते १५:४२

पृथ्वीवर अग्निवास दिवसभर. बुध मुखात आहुती आहे. शिववास क्रीडेत , काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४४

  • संवत्सर - शुभकृत्

  • अयन - दक्षिणायन

  • ऋतु - वर्षा(सौर)

  • मास - श्रावण

  • पक्ष - शुक्ल

  • तिथी - चतुर्थी(२६:१९ प.नं.पंचमी)

  • वार - सोमवार

  • नक्षत्र - पूर्वाफाल्गुनि(१४:४२ प.नं.उत्तराफाल्गुनि)

  • योग - परिघ(१८:३८ प.नं.शिव)

  • करण - वणिज(१४:०७ प.नं. भद्रा)

  • चंद्र रास - सिंह(२०:५६ नं.कन्या)

  • सूर्य रास - कर्क

  • गुरु रास - मीन

विशेष :- भद्रा १४:०७ ते २६:१९, वैनायकी गणेश चतुर्थी, श्रावणी सोमवार व्रत(सायंकाळी शिवपूजन करणे), शिवामुष्टि-तांदूळ, गणपती व त्रिपुरभैरवीस कापसाचे पोवते वाहणे, रवियोग १४:४२ प.

या दिवशी पाण्यात चमचाभर दूध टाकून स्नान करावे. शिव कवच स्तोत्राचे पठण करावे. ‘सों सोमाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा. शंकरास श्रीखंडाचा नैवेद्य दाखवावा. सत्पात्री व्यक्तीस तांदूळ दान करावे.

दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दूध प्राशन करून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ :- मिथुन, सिंह, तुळ, वृश्चिक, कुंभ, मीन या राशिंना रा.०८:५६ प. चंद्रबळ अनुकूल आहे.

©️सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईची धावपळ नकोशी! मुंबई सोडून हिमाचलमध्ये शिफ्ट होणार यामी गौतम-आदित्य धर? पण नक्की कारण काय?

Iran Missile Range : इराणच्या एकाच घोषणेमुळे अमेरिकेला भीती; ब्रिटनमधून बी-१ बॉम्बर विमाने परत बोलावली

Sujay Vikhe Patil: दुष्काळात शेतकऱ्यांना मदत महत्त्वाची; जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्यामागे हाच हेतू : माजी खासदार सुजय विखे पाटील

Wide बॉलवर Six! क्रिकेटच्या इतिहासात असे विचित्र प्रथमच घडले; पाकिस्तानी गोलंदाजाने बाऊन्सर टाकला तो थेट सीमापार Video Viral

Latest Marathi News Live Update : मराठवाड्यात पदवीधर मतदार संघाच्या प्रारूप यादीमध्ये उद्धव ठाकरेंचे नाव

SCROLL FOR NEXT