Aajache Panchang | Daily Panchang in Marathi sakal
संस्कृती

Panchang 9 August 2022: लाल वस्त्र परिधान करणे आज शुभ ठरेल

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:५६ ते दु.०३:३८ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

सकाळ डिजिटल टीम

पंचांगकर्ते:’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडे-9823916297

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक ९ ॲागस्ट २०२२

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक श्रावण १८ शके १९४४

आज सूर्योदय ०६:१६ वाजता तर सूर्यास्त १९:०२ वाजता होणार. आज चंद्रोदय १६:४८ वाजता तर प्रात: संध्या स.०५:०९ ते स.०६:१६ दरम्यान होणार. सायं संध्या १९:०२ ते २०:११ दरम्यान आहे तर अपराण्हकाळ १३:५७ ते १६:३१ दरम्यान आहे. आज प्रदोषकाळ १९:०२ ते २१:१७ दरम्यान असणार तर निशीथ काळ हा २४:१८ ते २५:०३ दरम्यान असणार. राहु काळ १५:५१ ते १७:२६ दरम्यान आहे तर यमघंट काळ हा ०९:२९ ते ११:०५ दरम्यान आहे.

आज श्राद्धतिथी हा द्वादशी त्रयोदशी श्राद्ध आहे. सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे. कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:५६ ते दु.०३:३८ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. विशेष म्हणजे आज मसूर खावू नये आणि लाल वस्त्र परिधान करावे.

लाभदायक

  • लाभ मुहूर्त-- ११:०५ ते १२:४०

  • अमृत मुहूर्त-- १२:४० ते १४:१५

  • विजय मुहूर्त— १४:४८ ते १५:३९

पृथ्वीवर अग्निवास १४:२३ प. शनि मुखात आहुती आहे. शिववास कैलासावर , काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४४

  • संवत्सर - शुभकृत्

  • अयन - दक्षिणायन

  • ऋतु - वर्षा(सौर)

  • मास - श्रावण

  • पक्ष - शुक्ल

  • तिथी - द्वादशी(१४:२३ प.नं.त्रयोदशी)

  • वार - मंगळवार

  • नक्षत्र - मूळ(०९:५३ प.नं.पूर्वाषाढा)

  • योग - विष्कंभ(२२:४१ प.नं.प्रीती)

  • करण - बालव(१४:२३ प.नं. कौलव)

  • चंद्र रास - धनु

  • सूर्य रास - कर्क

  • गुरु रास - मीन

विशेष:- भौमप्रदोष (कर्जनिवृत्तिसाठी), मंगळागौरी पूजन, भौमव्रत, विष्णूंना कापसाचे पोवते वाहणे, दधित्यागव्रतारंभ, दृश्य अगस्तितारा उदय, मोहरम

या दिवशी पाण्यात हिंग चूर्ण टाकून स्नान करावे. गणेश कवच स्तोत्राचे पठण करावे. ‘अं अंगारकाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा. गणपतीस गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. सत्पात्री व्यक्तीस मसूर दान करावे. दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना गुळ खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- मिथुन, कर्क, तुळ, धनु, कुंभ, मीन या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

©️सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

www.deshpandepanchang.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: ट्रम्पच्या धमकीनंतर शेअर बाजार लाल! Adani आणि Tata शेअर फोकसमध्ये; कोणते शेअर्स घसरले?

Asian Boxing Championship 2026 मीनाक्षी, जास्मिनची उपांत्य फेरीत धडक; आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत वाटचाल

Amravati News: खारी येथे आगीत तीन घरे जळून खाक; घरातील साहित्य जळाले, कुटुंबे आली उघड्यावर

Badminton Camp: राज्यस्तरीय बॅडमिंटन प्रशिक्षण शिबिर; ३५ वर्षांचा यशस्वी प्रवास, तीन टप्प्यांत सराव

Vidarbha News: पोपटांनी मक्याची कणसे केली फस्त; शेतकरी त्रस्त, सकाळीच करतात पिकावर हल्ला

SCROLL FOR NEXT