Dev Diwali 2023 esakal
संस्कृती

Dev Diwali 2023 : आज आहे देव दिवाळी, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्व

देव दिवाळी देशात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.

Monika Lonkar –Kumbhar

Dev Diwali 2023 : दिवाळी झाल्यानंतर सर्वांना वेध लागतात ते तुळशीच्या लग्नाचे. तुळशीच्या लग्नाला नुकतीच सुरूवात झाली आहे. सर्वत्र द्वादशी तिथीली तुळशीचे लग्न लावले जाते. त्यानंतर, सर्वांना वेध लागतात ते देव-दिवाळीचे.

देव दिवाळी आपल्या देशात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. सर्व सणांमध्ये सर्वात शुभ सण म्हणून देव दिवाळीला ओळखले जाते. या देव दिवाळीचे खास असे महत्व आहे.

कार्तिक महिन्यातील पौर्णिमेला हा देव दिवाळीचा सण साजरा केला जातो. आज देव दिवाळी असून याला कार्तिक पौर्णिमा (त्रिपुरी पौर्णिमा) असे ही म्हटले जाते. आज या देव दिवाळीचा शुभ मुहूर्त आणि तिथी यासंदर्भात आपण जाणून घेणार आहोत.

देव दिवाळी

या वर्षी देव दिवाळी ही २७ नोव्हेंबरला अर्थात आज साजरी केली जाणार आहे. या देव दिवाळीच्या पौर्णिमेच्या तिथीची सुरूवात ही रविवारी (२६ नोव्हेंबर) दुपारी ३ वाजून ५३ मिनिटांनी झाली असून या तिथीची समाप्ती सोमवारी (२७ नोव्हेंबरला) होणार आहे.

देव दिवाळीचा शुभ मुहूर्त

देव दिवाळी ही सोमवारी अर्थात २७ नोव्हेंबरला साजरी केली जाणार आहे. या देव दिवाळीचा शुभ मुहूर्त हा सोमवारी संध्याकाळी ५ वाजून ८ मिनिटांनी सुरू होणार असून संध्याकाळी ७ वाजून ४७ मिनिटांपर्यंत हा मुहूर्त असणार आहे. या कालावधीमध्ये तुम्ही देव दिवाळीची पूजा आणि दीपदान करू शकता.

देव दिवाळीचे महत्व काय?

हिंदू धर्मामध्ये देव दिवाळीचे खास महत्व आहे. वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून देव दिवाळीचा सण साजरा केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार, देव दिवाळीच्या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासूर या राक्षसाचा पराभव केला होता.

भगवान शंकराचा हा विजयोत्सव साजरा करण्यासाठी सर्व देवी-देवता तीर्थक्षेत्र वाराणसीमध्ये पोहचले होते. तिथे या सर्व देवी-देवतांनी मातीचे असंख्य दिवे प्रज्वलित केले होते. त्यामुळे, या उत्सवाला प्रकाशाचा उत्सव असे ही म्हटले जाते.

त्यामुळे, देव दिवाळीला अनेक जण मंदिरांमध्ये जाऊन दिवे प्रज्वलित करतात. तसेच, नदीच्या घाटांवर जाऊन दिवे प्रज्वलित करून ते पाण्यात वाहिले जातात. या दिवशी दिव्यांचे खास महत्व असते.

देव दिवाळीच्या दिवशी घरामध्ये, अंगणात आवर्जून दिवे लावले जातात. दिव्यांची आरास केली जाते. या दिवशी दीपदान करण्याचे खास महत्व आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs NZ: पाकड्यांशी भिडायला किवींनी संघात १, २ नव्हे तर ३ बदल केले, पण पावसाने सगळे गणितच बिघडवले! आता पुढचे समीकरण काय?

Pune Traffic : सायलेन्सर व ड्रिंक ॲण्ड ड्राईव्हविरोधात वाहतूक शाखेची कारवाई; ३४८ बुलेटस्वरांकडून तीन लाख ३४ हजार रुपयांचा दंड वसूल

Trump Tariff: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर डोनाल्ड ट्रम्प भारताकडून किती टॅरिफ आकारणार? हा कर फक्त १५० दिवसांसाठी का लादला?

२०२४ ला डेटिंगची चर्चा, २०२५ मध्ये नातं जगजाहीर; आता शिखर धवनने आयरिश प्रेयसीसोबत लग्न केलं, सोफी शाइन आहे तरी कोण? पाहा फोटो

रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले; तासन् तास उशिरा धावतात पॅसेंजर गाड्या; प्रवाशांमध्ये असंतोषाचे वातावरण

SCROLL FOR NEXT