diwali special rangoli esakal
संस्कृती

Diwali 2022 : लक्ष्मी पूजन आणि नरक चतुर्दशीच्या निमित्ताने काढा या सिंपल रांगोळ्या

सध्या हाताने रांगोळी काढण्यापेक्षा कोणत्या कोणत्या ना कोणत्या टेक्निक्सने रांगोळी काढायला प्राधान्य

सकाळ डिजिटल टीम

दिवाळी सुरू झाली आहे, संपूर्ण भारतात खूप आनंदाने आणि जल्लोषात दिवाळी साजरी केली जाते. घरोघरी तोरण बांधले जाते; घराबाहेर आकाशकंदील लावले जातात, पणात्यांनी अंगण सजवले जाते आणि दारोदारी रांगोळी काढली जाते.

आजकाल हाताने रांगोळी काढण्यापेक्षा सगळेच कोणत्या कोणत्या ना कोणत्या टेक्निक्सने रांगोळी काढायला प्राधान्य देते. मुळात ही रांगोळी काढायला सोपी आणि दिसायला देखील आकर्षक असते.यावर्षी लक्ष्मी पूजन आणि नरक चतुर्दशी च्या निमित्ताने तुम्ही ह्या सिंपल रांगोळ्या तुम्ही काढू शकतात.

१. लाल, गुलाबी, पिवळा, हिरवा आणि निळा ह्या ब्राईट रंगांमध्ये ही रांगोळी खूप सुंदर दिसते आहे. कमळाचे फूल काढून पुढे त्या कमळावर बोटांनीच लक्ष्मीची पावले काढली आहेत. ही रांगोळी तुम्ही छोट्याशा जागेतही काढू शकतात.

२. कमळाचे फूल हे लक्ष्मी देवीला प्रचंड आवडते; कमळाचे फूल काढून काड्या पेटीच्या कड्यांनी त्यावर स्टीपलिंग करून पुढे लक्ष्मी चे पावल काढू शकतात. आणि ह्या रांगोळीच्या आजूबाजूला तुम्ही दिवे देखील लावू शकतात.

३. घरातल्या ताटाच्या सहाय्याने दोन गोल काढून बाजूला मांगल्याचा प्रतीक असलेला कलश काढलेली रांगोळी खूप सुंदर आणि आकर्षक दिसते आहे. तिच्या मधोमध तुम्ही पणती देखील लावू शकतात.

४. जर घरापुढे मोठी रांगोळी काढण्यासाठी जागा नसेल तर ही आयताकृती पट्ट्याची रांगोळी तुम्ही काढू शकतात. मध्यभागी लक्ष्मी पूजन लिहून त्यावरती काही सौभाग्य अलंकार असलेली ही रांगोळी दिसायला खरच खूप आकर्षक आणि सुंदर आहे. तिच्या वरच्या बाजूला कलश काढला आहे आणि बाजूने संस्कार भारतीची रांगोळी काढू शकतात.

५. मध्यभागी एक गोल काढून आजूबाजूला पानांचा आकार काढून त्यात लक्ष्मी देवीचे सौभाग्य अलंकार काढू शकतात. यामुळे ही रांगोळी खूप आकर्षक आणि सुंदर दिसते आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: इंटरनॅशनल अशोक खरात! ९ महिने, ९७ गुन्हे, ६१ महिलांवर अत्याचार... ऑस्ट्रेलियात भारतीय वंशांच्या व्यक्तीचं कांड उघड

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या मंचावर ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना मानवंदना

Ujani Canal Tragedy: उजनी डाव्या कालव्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन फरशी कारागिरांचा बुडून मृत्यू

Narayangaon Protest: मिलिंद एकबोटे यांच्या मुस्लिमविरोधी वक्तव्याचा नारायणगावात तीव्र निषेध, कायदेशीर कारवाईची मागणी

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

SCROLL FOR NEXT