Diwali 2023 esakal
संस्कृती

Diwali 2023 : कधी आहे दिवाळी? जाणून घ्या मुहूर्त आणि तारीख

दिवाळी हा आनंदाचा आणि प्रकाशाचा सण आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Diwali 2023 : दिवाळी हा दिव्यांचा आणि प्रकाशाचा सण आहे. हिंदू धर्मामध्ये दिवाळी हा सण अतिशय महत्वाचा आणि प्रमुख सण आहे. या सणाची सर्वजण मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात. भारतात दिवाळी हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.

हिंदू पचांगानुसार, दिवाळी हा सण कार्तिक महिन्याच्या अमावस्येला साजरा केला जातो. यंदाची दिवाळी ही ९ नोव्हेंबरपासून सुरू होणार असून ती १५ नोव्हेंबरला संपणार आहे.

पाच दिवस चालणारा हा दिवाळीचा सण वसुबारसपासून सुरू होतो या दिवशी गाय-वासरांची पूजा केली जाते. त्यानंतर, धनत्रयोदशीचा सण आहे. धनत्रयोदशीनंतर, नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनाचा सण साजरा केला जातो.

लक्ष्मीपूजनानंतर दिवाळी पाडव्याचा सण साजरा करतात. त्यानंतर शेवटच्या दिवशी भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा आणि जिव्हाळ्याचा सण असलेला भाऊबीज हा सण साजरा करण्यात येणार आहे. चला तर मग आपण जाणून घेऊयात,यावर्षी वसूबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, दिवाळी पाडवा आणि भाऊबीज कधी आहे ?

वसूबारस कधी आहे ?

वसूबारस या सणाने दिवाळीला सुरूवात होते. वसूबारसेच्या दिवशी गाई-वासराची पूजा केली जाते त्यांना गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला जातो. या वर्षी वसूबारसचा सण हा ९ नोव्हेंबर गुरूवारी आहे.

धनत्रयोदशी कधी आहे ?

धनत्रयोदशी या वर्षी १० नोव्हेंबरला अर्थात शुक्रवारी साजरी केली जाणार आहे. या दिवशी कुबेर देव, धन्वंतरी देव, माता लक्ष्मी आणि विष्णूंची पूजा केली जाते. धनत्रयोदशीचा शुभ मुहूर्त हा ५ वाजून ४७ मिनिटांनी सुरू होणार असून ७ वाजून ४३ मिनिटांपर्यंत हा शुभ मुहूर्त असणार आहे.

नरक चतुर्दशी कधी आहे ?

या वर्षी नरक चतुर्दशी १२ नोव्हेंबरला रविवारी आहे. मात्र, या तिथीची सुरूवात ११ नोव्हेंबरला दुपारी १ वाजून ५७ मिनिटांनी सुरू होणार आहे आणि या तिथीची समाप्ती दुसऱ्या दिवशी अर्थात १२ नोव्हेंबरला दुपारी २ वाजून ४४ मिनिटांनी होणार आहे.

नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे अभ्यंगस्नान करण्याचे विशेष महत्व आहे. ही परंपरा आजही पाळली जाते. उदया तिथीमुळे ही नरक चतुर्दशी दिवस १२ नोव्हेंबरला साजरी केली जाईल. नरकचतुदर्शीचा शुभ मुहूर्त हा सायंकाळी ५ वाजून ३१ मिनिटे ते रात्री ८ वाजून ३६ मिनिटांपर्यंत आहे.

लक्ष्मीपूजन कधी आहे ?

या वर्षी नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनचा दिवस हा एकाच दिवशी साजरा केला जाणार आहे. लक्ष्मीपूजन हे १२ नोव्हेंबरला रविवारी आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते. या दिवशी धान्य, पैसे, लक्ष्मी, गणपती यांची शुभ मुहूर्तावर पूजा केली जाते.

लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त १२ नोव्हेंबरला संध्याकाळी ५ वाजून ३१ मिनिटांनी ते रात्री ८ वाजून ३६ मिनिटांपर्यंत आहे.

बलिप्रतिपदा किंवा दिवाळी पाडवा कधी आहे ?

लक्ष्मीपूजना झाले की दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा साजरा केला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस आपल्याकडे अतिशय शुभ मानला जातो.

या वर्षी हा दिवस १४ नोव्हेंबरला मंगळवारी साजरा केला जाणार आहे. या दिवशी आवर्जून सोने खरेदी केली जाते. सूवासिनींकडून पतीचे औक्षण केले जाते. व्यापाऱ्यांसाठी नवीन वर्षाचा प्रारंभ याच दिवसापासून होतो. त्यामुळे, पाडव्याचे विशेष महत्व आहे. दिवाळी पाडव्याचा शुभ मुहूर्त हा ६ वाजून १४ मिनिटे ते ८ वाजून ३५ मिनिटांपर्यंत असणार आहे.

भाऊबीज कधी आहे ?

भाऊबीजचा सण हा बहीण-भावासाठी खास असतो. हा सण बहीण आणि भावाच्या नात्याल समर्पित असणारा सण आहे. हा सण यावर्षी १५ नोव्हेंबरला बुधवारी साजरा केला जाईल. भाऊबीजेचा हा सण कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी साजरा आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो.

भाऊबीजच्या दिवशी दिवाळी सणाची समाप्ती होते. भाऊबीजेचा शुभ मुहूर्त हा १ वाजून १० मिनिटे ते ३ वाजून २२ मिनिटांपर्यंत असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वडिलांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारच केले नाहीत; मृतदेह प्रिझर्व्ह करून ठेवला, मुंबईतील खळबळजनक घटना

Malvan Accident : दुचाकीच्या धडकेत भाजप नगरसेविकेसह चौघे जखमी, सरकारी दवाखान्यात एक्स रे मशीन बंद असल्याने संताप

LPG Cylinder Price: उद्यापासून गॅस सिलेंडर महागणार? महाराष्ट्रात आज कितीला मिळतो LPG, पाहा शहरनिहाय दर

Pradip Purnekar case: ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याच्या हत्येचा CCTV फुटेज समोर, ७ गोळ्या झाडल्याचा आवाज

Ayush Thite Organ Donation : सोलापूरच्या आयुषच्या हृदयाने रशियातील तीन वर्षांच्या चिमुकल्याला मिळणार नवजीवन; अवयवदानाने वाचणार चौघांचे प्राण

SCROLL FOR NEXT